पाटणा : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा, जनशक्ती जनता दलाचे संस्थापक माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. जनशक्ती जनता दलाचे प्रमुख असलेल्या तेज प्रताप यादव यांना बिहार विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केंद्रानं सुरक्षा वाढवली आहे. आता तेज प्रताप यादव यांना सीआरपीएफचं संरक्षण असेल.  

Continues below advertisement

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हीआयपी प्रोटोकॉलनुसार ही सुरक्षा देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षेसंदर्भात सुरक्षा यंत्रणांकडून एक रिपोर्ट देण्यात आला होता.  त्यानंतर केंद्रानं त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. तेज प्रताप यादव यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानं आता त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात असतील. 

सरकारला मिळालेला रिपोर्ट

तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षेसंदर्भात सुरक्षा यंत्रणांकडून केंद्रीय गृह मंत्रालयाला माहिती देण्यात आली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. तेज प्रताप यादव यांनी देखील सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती.  

Continues below advertisement

तेज प्रताप यादव यांच्या मागणीनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना वाय कॅटेगरीची सुरक्षा देण्यात आली आहे. आता तेज प्रताप यादव यांना सीआरपीएफच्या जवानांचं संरक्षण असेल. तेज प्रताप यादव यांना केंद्रानं सुरक्षा दिल्यानं चर्चा सुरु झाल्या आहेत. 

वाय प्लस सुरक्षा म्हणजे काय?

वाय प्लस कॅटेगरीमध्ये एकूण 11 सुरक्षा रक्षक असतात. आर्म्ड फोर्सचे  कमांडो तैनात असतात. त्यापैकी 5 जवान घराच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. याशिवाय ही सुरक्षा तीन शिफ्टमध्ये दिली जाते. के अलावा तीन शिफ्टों में सुरक्षा दी जाती है.

तेज प्रताप यादव स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात

लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांना राजद मधून काढून टाकलं आहे. त्यामुळं तेज प्रताप यादव यांनी  जनशक्ती जनता दलाची स्थापना केली आहे. त्यांच्या पक्षाचे 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते स्वत: महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.  

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला झालं असून पुढील टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान झालं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 11 नोव्हेंबरला 122 जागांवर मतदान होईल. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 64.66 टक्के मतदान झालं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.