Bihar Election Result 2025 RJD Winner List: बिहारचा रणसंग्राम एनडीएनं (NDA) एकतर्फी जिंकत 2025च्या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळवलं आहे. 243 पैकी तब्बल 202 जागा मिळवत भाजप, जेडीयू आणि लोजप या पक्षांनी एनडीएला स्पष्ट बहुमत मिळवून दिलं. या निवडणुकीत एनडीएनं जोरदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

भाजपला 89 जागा, तर जेडीयूला 85 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागलं, तर तेजस्वी यादव यांच्या राजदला (RJD) 25 जागा मिळाल्या. आता बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्री पदावर अंतिम निर्णय घेण्यासाठी एनडीएच्या नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये महागठबंधनने 243 ही जागा लढवल्या होत्या. यात राष्ट्रीय जनता दलाने 143, काँग्रेसने 61, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने 20 आणि विकसनशील इंसान पार्टीने 12 जागांवर उमेदवार उभे केले होते. यामध्ये राष्ट्रीय जनता दलाला मिळालेल्या जागांची संख्या आणि विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे आहे.

बिहारमधील आरजेडीच्या विजयी उमेदवारांची यादी- (RJD Winning Candidates List Bihar Election 2025)

क्र.विधानसभा मतदारसंघविजेते उमेदवारपक्ष
1ढाका फैसल रहमानराजद
2बिस्फीआसिफ अहमदराजद
3रानीगंज अविनाश मंगलाराजद
4मधेपुरा चंद्रशेखरराजद
5महिषीगौतम कृष्णराजद
6पारूशंकर प्रसादराजद
7रघुनाथपुर ओसामा शाहाबराजद
8मढौरा जितेंद्र कुमार रायराजद
9गढखा सुरेंद्र रामराजद
10परसा करिश्माराजद
11राघोपुर तेजस्वी प्रसाद यादवराजद
12उजियारपूरआलोक कुमार मेहताराजद
13मुरवारणविजय साहूराजद
14मटिहानीनरेंद्र कुमार सिंह उर्फ बोगो सिंहराजद
15साहेबपुर कमालसत्तानंद संबुद्धा उर्फ लालण जीराजद
16फतुहा डॉ. रमणंद यादवराजद
17मनेरभाई बिरेंद्रराजद
18ब्रह्मपुरशंभुनाथ यादवराजद
19जेहनाबादराहुल कुमारराजद
20मखदूमपूरसुबेदार दासराजद
21गोहअमरेंद्र कुमारराजद
22बोधगयाकुमार सर्वजीतराजद
23टेकारीअजय कुमारराजद
24वारसलीगंजअनीताराजद
25चकाईसवित्री देवीराजद

टीप- निकाल येण्यास सुरुवात होत आहे, विजयी उमेदवार यादी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करत राहा...

इतर महत्त्वाच्या बातम्या

Bihar Results 2025 : तेजस्वी यादव लढले पण करिश्मा मोदी-नितीश कुमारांचाच; NDA च्या विजयाची 15 कारणे, महागठबंधन का हरले? पराभवाची 15 कारणे

Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव