Continues below advertisement


Bihar Assembly Election Exit Poll Result 2025 : बिहारमधील दोन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच रुद्र रिसर्च अॅण्ड अॅनालिटिक्स, पुणे यांनी आपला एग्झिट पोल (Rudra Research Exit Poll) जाहीर केला.त्यात एनडीए आघाडी स्पष्टपणे आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. 6 नोव्हेंबरला फेज-1 आणि 11 नोव्हेंबरला फेज-2 चे मतदान पार पडल्यानंतर 16 हजारांहून अधिक मतदारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.


Rudra Research Exit Poll : सर्वेक्षणाची पद्धत


संस्थेने Stratified Random Sampling पद्धतीचा वापर केला. 26 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष भेटीद्वारे मतदारांशी संवाद साधण्यात आला. तसेच मतदार, राजकीय विश्लेषक, नेते, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक घटकांशी चर्चा करून ग्राउंड इंटेलिजन्सही गोळा करण्यात आला.


Bihar Election Update : आघाडीवार मतदानाचे चित्र


एग्झिट पोलनुसार बिहारमध्ये काट्याची टक्कर दिसत असली तरी अंतिमत: एनडीए सत्ता स्थापन करेल असं चित्र आहे. त्यानुसार मतांची टक्केवारी खालीलप्रमाणे असू शकते,


NDA – 43 %


MGB – 40 %


Jan Suraj – 7 %


Others – 10 %


एनडीए महागठबंधनापेक्षा तीन टक्के पुढे आहे. जनसुराज पक्षाने घेतलेले 7% मते स्पर्धेवर थेट परिणाम करत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.


पक्षनिहाय मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे


RJD – 24 %


BJP – 19 %


JDU – 18 %


Congress – 9 %


Jan Suraj – 7 %


LJP (RV) – 4 %


CPIML – 3 %


VIP – 1.5 %


HAM – 1 %


RLM – 1 %


इतर – 10 %


या टक्केवारीतून RJD सर्वाधिक मतदान मिळवणारा पक्ष असून BJP आणि JDU जवळजवळ समसमान पातळीवर आहेत.


आघाडीवार जागांची शक्यता


NDA – 140 ते 152


MGB – 84 ते 97


Others – 4 ते 6


एनडीए आघाडीने स्पष्ट बहुमत ओलांडत सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असल्याचे एग्झिट पोलनं दाखवले आहे.


पक्षनिहाय जागांची अंदाजे संख्या


BJP – 69 ते 73


JDU – 58 ते 62


RJD – 58 ते 62


Congress – 17 ते 19


LJP (RV) – 9 ते 11


CPIML – 7 ते 10


HAM – 3 ते 5


VIP – 1 ते 2


इतर – 4 ते 6


भाजप सर्वाधिक जागांच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे, तर RJD आणि JDUही मजबूत आकडे गाठतील अशी शक्यता आहे.


प्रदेशनिहाय मतदानाचे चित्र


Bhagalpur – NDA 45%, MGB 42%


Darbhanga – 43% / 41%


Kosi – 42% / 41%


Magadh – 41% / 37%


Munger – 42% / 42%


Patna – 44% / 40%


Purnea – 37% / 38%


Saran – 44% / 42%


Tirhut – 46% / 40%


एकूण राज्यभरात एनडीएचा सरासरी मतांश 43% तर महागठबंधनाचा 40% आहे.


प्रदेशनिहाय जागांचे अंदाज (एनडीए आणि महागठबंधन)


Bhagalpur – 10 / 2


Darbhanga – 16 / 13


Kosi – 6 / 7


Magadh – 18 / 7


Munger – 11 / 10


Patna – 27 / 16


Purnea – 8 / 15


Saran – 15 / 9


Tirhut – 35 / 13


एकूण: NDA 146 – MGB 92 – Others 5


एनडीएच्या बहुमताची मुख्य कारणे


1. जातीय समीकरणातील अचूक गणित


चिराग पासवान (LJP-RV) आणि उपेंद्र कुशवाहा (RLM) यांच्या एनडीएमध्ये पुनरागमनामुळे दलित, ओबीसी आणि ईबीसी मतांची एकजूट एनडीएला फायद्याची ठरली.


2. महिला मतदारांचा स्पष्ट कल


कन्या उत्थान, उद्यमिता योजना, सायकल योजना, मदत अनुदाने आणि महिलांच्या खात्यातील थेट आर्थिक मदत यामुळे महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात एनडीएच्या बाजूने कल दाखवला.


3. मोदीनीतीश यांची संयुक्त लोकप्रियता


केंद्रातील मोदी आणि राज्यातील नीतीश अशी जोडगोळी मतदारांना आकर्षक वाटत असल्याचे सर्वेक्षण म्हणते.


4. व्यवस्थित बूथ व्यवस्थापन


एनडीएने जागावाटपातील स्पष्टता, बूथपर्यंत पोहोचणारे संघटन आणि मजबूत समन्वय साधला.


5. महागठबंधनातील अंतर्गत तणाव


जागावाटपातील नाराजी, मर्यादित सभा, संघटनातील कमतरता आणि नेतृत्वातील गोंधळ यामुळे महागठबंधन मागे पडल्याचे निरीक्षण.


6. 'सुशासन विरुद्ध जंगलराज' कथानक


एनडीएचे विकासकेंद्रित नॅरेटिव्ह ग्रामीण भागात प्रभावी ठरल्याचे सर्वेक्षणाने सांगितले.


प्रशांत किशोर फॅक्टर


जनसुराज पक्षाला मिळालेली 7% मते स्पर्धेत फरक करणारी आहेत. ते जागा जिंकण्यापेक्षा व्होट स्प्लिटर आणि इश्यू मेकर म्हणून अधोरेखित होत आहेत.


रुद्र रिसर्च अॅण्ड अॅनालिटिक्सच्या एग्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए 140 ते 152 जागांसह स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. महिला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद, जातीय समीकरणातील बदल, आणि मोदीनीतीश यांची संयुक्त लोकप्रियता हे घटक निर्णायक ठरत असल्याचे सर्वेक्षणाने स्पष्ट केले. महागठबंधनाला मतांची वाढ दिसत असली तरी त्याचे जागांमध्ये रूपांतर कमी दिसते. बिहारची जनता पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास दाखवताना दिसत असल्याचे चित्र आहे.


ही बातमी वाचा: