Bhusawal Vidhan Sabha Constituency: यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) खऱ्या अर्थाने रंजक ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात रणधुमाळी दिसून येत आहे, त्यामुळे जनता कोणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे आता अवघ्या जनतेचं लक्ष लागलंय. राज्यातील 288 जागांपैकी भुसावळ (Bhusawal Vidhan Sabha Constituency) मतदारसंघाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी भुसावळ विधानसभा जागा 12 व्या क्रमांकावर आहे. ही जागा दीर्घकाळापासून भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातून संजय सावकारे आणि राजेश मानवतकर यांच्यात थेट लढत होणार आहे. यंदा या निवडणूकीची रंजक झलक पाहायला मिळणार आहे.


दोन महायुती आमनेसामने


भुसावळ विधानसभा मतदारसंघ - जळगाव जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे. कारण भुसावळमध्ये भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्यात थेट लढत होणार आहे. गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात कमालीचा फरक पडला आहे. जुने पक्ष नव्या नेतृत्वाखाली आणि नवीन पक्ष जुन्या नेतृत्वाखाली कमांडवर आहेत. मात्र, यावेळी राज्यात दोन महायुती आमनेसामने येणार असून, त्यात महायुती आणि महाविकास आघाडी निर्माण झाली आहे.


सावकारेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकारण बदलले


केळींसाठी देशभरात प्रसिद्ध असलेली भुसावळ विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपचे संजय वामन सावकारे यांच्याकडे आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. 2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रवादीने येथून निवडणूक जिंकली होती. पण, 2014 मध्ये येथील राजकारणाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलले. 2019 मध्ये संजय वामन सावकारे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील राजकारण बदलले. सावकारे भाजपच्या तिकिटावर गेल्या दोन वेळा येथून निवडणूक जिंकत आहेत.


गेल्या निवडणुकीत काय झाले?


भुसावळ विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, संजय वामन सावकारे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार मधु राजेश मनवटकर उभे होते, तर राष्ट्रवादीचे जगन देवराम सोनवणे त्यांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीत भाजपचे संजय यांना एकूण 81,689 मते मिळाली. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी मधु राजेश मनवटकर यांना 28,675 मते मिळाली. राष्ट्रवादीचे जगन देवराम तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 20,245 मतांवर समाधान मानावे लागले.


महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा कोणाच्या हाती जाणार?


महाराष्ट्रात (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागा जिंकण्यासाठी 145 जागांचे बहुमत आवश्यक आहे. भुसावळ  (Bhusawal) विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 17 व्या क्रमांकावर आहे. 


हेही वाचा>>>


Muktainagar Vidhan Sabha Constituency: मुक्ताई नगरमध्ये खडसे राखणार का गड? की चंद्रकांत पाटलांचा विजय होणार? कोण उधळणार विजयाचा गुलाल?