Beed Lok Sabha Election Result 2024 Updates: बीड : लोकसभा निवडणूक निकालासाठी (Lok Sabha Election Result 2024) संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशाचा नवा पंतप्रधान कोण? याचं उत्तर पार्श्वभूमीवर अवघ्या काही तासांतच मिळणार आहे. अशातच लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) निकालाच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी (Beed Police) अनोखी कार्यपद्धती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी सोशल मीडियावरची देखरेख वाढवली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास ग्रुप अॅडमिनवर बीड पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाची सर्व स्तरांतून चर्चा सुरू आहे.
4 जूनच्या मतमोजणीच्या दिवशी बीड जिल्ह्यातील सोशल मीडिया अंडर पोलीस सर्व्हीलांस असणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर व्हाट्सअॅप ग्रुपवर जर आक्षेपार्ह पोस्ट आढळून आली, तर ग्रुप ॲडमिनवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, निवडणूक निकालानंतर डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विजयी उमेदवारासाठी मिरवणूक काढायची असल्यास परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. कोणालाही विनापरवानगी मिरवणूक काढता येणार नाही, असं बीड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर ओन्ली ॲडमिन अशी सेटिंग करून घेण्यात यावी, असं आव्हान बीड पोलिसांनी जिल्हातील नागरिकांना केलं आहे.
बीड लोकसभा निवडणुकीसाठी मोठा संघर्ष झाला. विशेषतः जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे आता मतमोजणी अवघ्या 24 तासांवरती येऊन ठेपली असताना बीड पोलिसांनी सोशल मीडियावर देखरेख वाढवली आहे. विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुपवर जर आक्षेपार्ह्य पोस्ट केल्याचं आढळून आलं, तर थेट ग्रुप ॲडमिनवर कारवाई करण्याचा निर्णय बीड पोलिसांनी घेतला आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं सोशल मीडियावरील सक्रिय 205 जणांना ताकीद देण्यात आली आहे. प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास संबंधित ग्रुप अॅडमिन कारवाई करण्यात येणार असून तशी समज पोलिसांकडून देण्यात आली आहे.
बीडमध्ये बजरंग सोनावणे विरुद्ध पंकजा मुंडे सामना
बीड लोकसभा मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्या लोकसभेचा सामना रंगला होता. लोकसभा प्रचारादरम्यान, बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेले आरोप आणि बीडमध्ये झालेली अटीतटीची लोकसभेची लढत याकडे सुरूवातीपासूनच सर्वांचं लक्ष लागल होतं. आता निकाल अवघ्या काही तासांवर आला असून लवकरच बीडमध्ये गुलाल कोण उधळणार याचा निकाल समोर येणार आहे.