Rajendra Raut : आमचा पक्ष मोठा झाला होता, अंतर्गत नाराजगीतून माझा पराभव झाल्याचे मत बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी व्यक्त केले. राजेंद्र राऊत यांनी महायुतीककडून शिवसेना शिंदे गटाकडून बार्शी विधानसभेची (Barshi Assembly Constituency) निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यानंतर आज राजेंद्र राऊत यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बार्शीतील जनतेने अफाट प्रेम केलं आहे. मात्र, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याच्यात दुरुस्ती करणार असल्याचे राऊत म्हणाले.
महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मांडली पराभवाची कारणे
बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे पराभूत उमेदवार राजेंद्र राऊत यांनी चिंतन मेळावा घेतला. यावेळी राजेंद्र राऊत यांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी महायुतीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचा राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी राजेंद्र राऊत यांचा 6 हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पराभवाची कारणे मांडली. आमचा पक्ष मोठा झाला होता, अंतर्गत नाराजीतून माझा पराभव झाल्याचे राऊत म्हणाले.
माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याच्यात दुरुस्ती करणार
बार्शीतील जनतेने अफाट प्रेम केलं, मात्र माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याच्यात दुरुस्ती करणार असल्याचे राऊत म्हणाले. महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत, त्यामुळे कामाच्या पद्धतीत दुपटीने वाढ करणार असल्याचे राऊत म्हणाले. तालुक्याच्या हिताच्या गोष्टी पूर्ण करणार, रात्रीचा दिवस करून तालुक्यातील जनतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राऊत म्हणाले.
दिलीप सोपल हे 7 व्यांदा आमदार बनून विधानसभेवर
बार्शी विधानसभा मतदारसंघातील लढत यावेळी रंगतदार झाली. पुन्हा एकदा मैदानही तेच होते आणि उमेदवारही तेच होते. राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. संपूर्ण राज्याचं या लढतीकडं लक्ष लागलं होतं. मात्र, यावेळी बार्शीत परिवर्तन झालं आहे. राजेंद्र राऊतांना पराभूत करत दिलीप सोपल यांनी बार्शीचं मैदान मारलं आहे. या निवडणुकीत दिलीप सोपल हे 6 हजार मतांहून अधिक मतांनी वियजी झाले. विशेष म्हणजे दिलीप सोपल हे 7 व्यांदा आमदार बनून विधानसभेवर गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या: