Baramati vidhansabha Election Sharmila Pawar : आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप बारामती विधानसभा मतदारसंघाचे (Baramati vidhansabha Election) शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या आई शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी केला आहे. मतदारांना घडाळ्याचे शिक्के असलेल्या स्लीप वाटण्यात येत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आम्ही याची तक्रार करणार असल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले. बारामतीतील बालक मंदिरातील मतदान केंद्रामध्ये हा प्रकार होत असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी लगावलाय. 


शर्मिला पवार या मतदान केंद्रात गेल्या होत्या. बाहेर येऊन त्यांनी अजित पवार गटाच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघाची राज्यभर चर्चा होत आहे. कारण या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युग्रेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. या चुलत्या पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, तसेच दमदाटी केली जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केलाय. 


बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष


लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आपल्या पुतण्याला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती, त्यानंतर आता शरद पवारांनी बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलं आहे. अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी या जागेवर भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा विक्रमी 1,65,265 मतांनी पराभव केला होता.आता अजित पवार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत. अशा स्थितीत किमान आपला आधीचा विक्रम कायम राखण्याचा दबाव त्यांच्यावर असणार आहे. अशातच लोकसभेप्रमाणे विधानसभा देखील चुरशीची ठरणार आहे. युगेंद्र पवार अजित पवारांचा विक्रम मोडणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


Baramati Assembly constituency: बारामतीत पुन्हा पवार विरूध्द पवार! दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला, अजितदादांना पुतण्या युगेंद्र देणार टफ फाईट