Kagal Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur District Assembly Constituency) सकाळी सात वाजल्यापासून उत्साहात मतदानाचा प्रारंभ झाला आहे. पहिल्या दोन तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District Assembly Constituency Election)
सर्वाधिक मतदान कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदवलं असून त्या ठिकाणी 8.78 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कागलला कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय विद्यापीठ समजलं जाते. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक हायहोल्टेज लढत असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. 


पालकमंत्र्यांकडून दमदाटी होत असल्याचा घाटगेंचा आरोप 


कागल मतदारसंघांमध्ये सकाळपासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी बोगस मतदानाचा आरोप केला आहे. कागल शहरामध्ये आणि पिराचीवाडीमध्ये बोगस मतदानाचा प्रकार झाला असून तो प्रकार आपल्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडल्याचा आरोप समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलं आहे. मुश्रीफ असंविधानिक पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील घाडगे यांनी केला. पालकमंत्र्यांकडून दमदाटी होत असल्याचा आरोप घाटगे यांनी केला आहे. घाटगे यांनी प्रशासनाला सुद्धा इशारा देत बोगस मतदानाचा प्रकार होऊ देऊ नये असं म्हटलं आहे. घाटगे यांनी सांगितले की कागल शहरातील एका मतदान केंद्रावर आपल्या कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. पिराचीवाडी गावामध्ये देखील आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटीचा प्रकार घडला, याचा निषेध करत असल्याचे समरजित घाटगे यांनी म्हटलं आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती


1) कोल्हापूर दक्षिण


भाजपचे अमल महाडिक विरुद्ध काँग्रसचे ऋतुराज पाटील 


2) कोल्हापूर उत्तर 


शिवसेना  शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर 


3) करवीर 


काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके


4) हातकणंगले 


काँग्रेसचे राजूबाबा आवळे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार अशोकराव माने 


5) इचलकरंजी 


भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाचे मदन कारंडे


6) शिरोळ 


काँग्रेसचे गणपतराव पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर


7) कागल 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे विरुद्ध अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ  


8)  चंदगड 


अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर विरुद्ध भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील


9) राधानगरी 


शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे केपी पाटील विरुद्ध अपक्ष ए. वाय. पाटील


10) शाहुवाडी 


जनसुराज्यचे विनय कोरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर 


इतर महत्वाच्या बातम्या