पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल 3 डिसेंबरला, कोणत्या राज्यात कधी मतदान? तारखा जाहीर!

Elections 2023: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची  विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Oct 2023 12:40 PM
Assembly Election Date Updates: पाच राज्यात आठ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्राची जबाबदारी

Assembly Election Date Updates: पाच राज्यात   17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत. 

Election Commission Press Conference:  17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार

Election Commission Press Conference:   पाच राज्यांमध्ये 8.2 कोटी पुरुष मतदार आहेत. 17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे.  

Assembly Election Date Updates:  आठ राज्यात सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार

Assembly Election Date Updates: मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि  और तेलंगणामध्ये 3.17 कोची मतदार मतदान करणार आहेत.  

Election Commission Press Conference: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू

Election Commission Press Conference:  निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. राजीव कुमार म्हणाले, आज आपण सर्वजण निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी आलो आहोत.

 Lok Sabha Election:  लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार करणारी निवडणूक

 Lok Sabha Election:  2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार करणा-या असतील त्यामुळे अतिशय रंजक निवडणूक असणार आहे. या पाच राज्यासाठी काँग्रेस, भाजप, तेलंगणा राष्ट्रीय समितीसह सर्वच पक्ष या निवडणुकीत आपली ताकद लावताना दिसणार आहेत.  

Election Commission:  नोव्हेंबरचा किंवा डिसेंबर महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता

Election Commisssion:  साधारण नोव्हेंबरचा दुसरा आठवडा किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचे वेळापत्रक  काय असणार याची उत्सुकता सर्वांना आहे.  

पार्श्वभूमी

 Election Commission Press Conference: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची  विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. आज निवडणुकीच्या (Assembly Election) तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) आज  दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जरी  ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) सेमीफायनलच आहे.


2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून  मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाच्या निवडणुका या लोकसभेबरोबरच होणार असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे.  या पत्रकार परिषदेत या पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर ( Mizoram and Telangana Election) होण्याची दाट शक्यता आहे.  साधारण नोव्हेंबरचा दुसरा आठवडा किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचे वेळापत्रक  काय असणार याची उत्सुकता सर्वांना आहे. 


पाचपैकी दोन राज्यात काँग्रेसची सत्ता


सध्या पाच राज्यांपैकी राजस्थान आणि छत्तीसगड ( Chhattisgarh, Rajasthan Election) दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. लोकसभेच्या निवडणुकापूर्वी  या राज्यातून काँग्रेसला किती मतदान होणार याची चाचणी या निवडणुकांमध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशची (Madhya Pradesh Election) निवडणूक देखील चर्चेत आहे. कारण भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केंद्रातील बड्या नेत्यांना भाजपने रिंगणात उतरवले आहे. शिवराजसिंह चौहान यांचे तिकिट अद्याप जाहीर झालेले नाही त्यामुळे त्यांच्याबाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. शिवराजसिंह चौहान हे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का हे भाजपने जाहीर केलेले नाही.  भाजपला ही राज्यं आपल्याकडे ठेवण्यात यश येतं का याचं उत्तर देणारी ही निवडणूक असेल. 


लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार करणारी निवडणूक


या निवडणुका 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्श्वभूमी तयार करणा-या असतील त्यामुळे अतिशय रंजक निवडणूक असणार आहे. या पाच राज्यासाठी काँग्रेस, भाजप, तेलंगणा राष्ट्रीय समितीसह सर्वच पक्ष या निवडणुकीत आपली ताकद लावताना दिसणार आहेत. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.