नवी मुंबई : राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले संदीप नाईक यांनी वडील गणेश नाईक यांच्यासाठी माघार घेतली आहे. ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढणार आहेत.


भाजपच्या पहिल्याच यादीच नवी मुंबईतील दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले होते. ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली होती. तर बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक इच्छुक होते. मात्र त्यांना वगळून भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे गणेश नाईक नाराज दिसत झाले होते.




आज सकाळी सीबीडी येथील महापौर बंगल्यात गणेश नाईक समर्थक नगरसेवकांची बैठक पार पडली. आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक हे बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत गणेश नाईक यांनी ऐरोलीतून निवडणूक लढवावी, असा निर्णय झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.


विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी नवी मुंबई महापालिकेतील 52 नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले होते.



संबंधित बातम्या