Assam Exit Poll Results 2021 : आसाममधील विधानसभा निवडणुकीत यूपीए आणि एनडीएने आपली संपूर्ण ताकत पणाला लावली आहे. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आसाममध्ये विधानसभा यूपीएला 53 ते 66 जागा मिळणार आहे तर एनडीएला 58 ते 71 जागा मिळणार आहेत. मागील 2016 च्या विधानसभा निवडणुकीत युपीएला 26 आणि एनडीएला 86 जागा मिळाल्या होत्या. इतर पक्षांना 14 जागा मिळाल्या होत्या.
कुणाला किती मतांचा टक्का
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आसाम निवडणुकीत युपीएच्या वाट्याला 42.3 टक्के मतं येतील तर एनडीला 48.2 टक्के मतं येतीस. तर इतर पक्षांनी 8.3 टक्के मतं येतील.
आसामला 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल असे तीन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. आसाममध्ये एनडीए आणि यूपीएमध्ये लढत होती. कॉंग्रेस येथे महाआघाडी करून उतरली होती. एआईयूडीएफ, बीपीएफ, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (माले), आंचलिक गण मोर्चा (एजीएम), आरजेडी, आदिवासी नॅशनल पार्टी (एएनपी) आणि जिमोचयन (देओरी) पीपुल्स पार्टी (जेपीपी) सोबत होते.
मुख्य उमेदवार आणि मतदारसंघ कोणते आहेत?
माजुली : भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल - राजीब लोचन पेगु, कॉंग्रेस
2016 मध्ये सर्बानंद सोनोवाल यांनी ही जागा जिंकली. परंतु यापूर्वी 2001, 2006 आणि 2011 मध्ये कॉंग्रेसचे राजीव लोचन पेगू इथे जिंकलेले
जोरहाट : आसाम विधानसभा स्पिकर आणि बीजेपी नेता हितेंद्र नाथ गोस्वामी – राणा गोस्वामी, काँग्रेस
[DISCLAIMER: बंगालमध्ये 8 टप्प्यातील मतदान आज संपलं. तर तामिलनाडु, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमधील मतदान 6 एप्रिलला पूर्ण झालं होतं. एबीपी न्यूजसाठी सी वोटर या संस्थेनं पाच निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये सर्वे केला. या सर्व्हेमध्ये 1 लाख 88 हजार 473 मतदात्यांची मतं जाणून घेण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पश्चिम बंगालमधील 85 हजार मतांचा समावेश आहे. या एक्झिट पोलमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 टक्के आहे.