Anushakti Nagar Vidhan Sabha constituency: मुंबईतील महत्त्वाच्या लढतींपैकी एक मानली जाणारी अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाची (Anushakti Nagar Vidhan Sabha constituency) लढत ही यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (Sana Malik) या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अभिनेत्री स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद (Fahad Ahmed) यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण सना मलिक यांनी या निवडणुकीत बाजी मारत विजय खेचून आणला. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढतीमध्ये अजित पवार गटाची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय.  


2019 च्या निवडणुकांचं चित्र


नवाब मलिक यांनी 2019 साली अणुशक्तिनगर या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी या जागेवरून शिवसेनेचे (संयुक्त) उमेदवार तुकाराम काटे यांना पराभूत केलं होतं. मलिक यांना 65217 तर काटे यांना 52466 मतं मिलाली होती. या दोघांनाही मिळालेल्या मतांची टक्केवारी अनुक्रमे 46.8 आणि 37.7 टक्के एवढी होती. 2009 सालच्या निवडणुकीतही नवाब मलिक यांनी याच जागेवरून निवडणूक लढवत विजय संपादन केला होता. आता मात्र कन्येसाठी त्यांनी हा मतदारसंघ सोडला. सना मलिक या अणुशक्तिनगर येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्दमधून येथून निवडणूक लढवली होती.


ही बातमी वाचा : 


Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Constituency: मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अबू आझमी की नवाब मलिक, कोण मारणार बाजी?