Amit Thackeray Sada Sarvankar मुंबई: गेल्या काही दिवसांपासून माहीम विधानसभा मतदारसंघाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. माहीम विधानसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) निवडणुकी लढवत आहेत. त्यामुळे माहीम विधानसभेत अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. याचदरम्यान माहीम विधानसभेचा एक ऑनलाईन पोल समोर आला आहे.
आता आमची मुंबई (_aamchi_mumbai_) आणि दादर मुंबईकर (dadarmumbaikar) या इन्स्टाग्राम पेजवरुन ऑनलाईन पोल घेण्यात आला आहे. यामध्ये अमित ठाकरे (मनसे), महेश सावंत (ठाकरे गट), सदा सरवणकर (शिवसेना) आणि नोटा/इतर/अपक्ष असे पर्याय देण्यात आले आहेत. 8 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या या ऑनलाईन पोलचे 10 नोव्हेंबर सकाळी 8.00 वाजेपर्यंतचे अंदाज समोर आले आहेत. यात अमित ठाकरे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
सदा सरवणकरांनी सर्वांत कमी मतं-
आमची मुंबई (_aamchi_mumbai_) आणि दादर मुंबईकर (dadarmumbaikar) या इन्स्टाग्राम पेजवरुन ऑनलाईन 6,562 जणांनी ऑनलाईन मतं दिली. यामध्ये अमित ठाकरेंना 54 टक्के लोकांनी मतं दिली आहे. तर महेश सावंत यांना 32 टक्के लोकांनी मतं दिल्याचं दिसून येत आहे. यामध्ये धक्कादायक म्हणजे विद्यामान आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना 12 टक्के लोकांनी ऑनलाईन मतं दिल्याचं समोर आलं आहे. या ऑनलाईन निकाल कोणत्याही क्षणी बदलू शकतो. विशेष म्हणजे ऑनलाईन व्होटिंग असल्यामुळे यात मतदारसंघाबाहेरील युजर्सनीही आपली मतं नोंदवली आहेत. त्यामुळे हे आकडे प्रत्यक्ष मतदानाचे अजिबात निदर्शक नाही. एबीपी माझा या ऑनलाईन पोलबाबत कोणताही दावा करत नाही.
मला मतदान करायचं की नाही हे लोकांच्या हातात- अमित ठाकरे
सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. त्यामुळे तुम्ही आता माहीमधील तिरंगी लढतीकडे कसे पाहता?, असा प्रश्न अमित ठाकरेंना विचारण्यात आला. यावर ते समोर असते-नसते, तरी मी निवडणूक माझ्या पद्धतीनेच लढवली असती. मी लोकांमध्ये गेलोच असतो. मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मला मतदान करायचं की नाही हे लोकांच्या हातात आहे, तर जिंकणार की नाही, हे देवाच्या हातात आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. तसेच मला अजिबात आव्हान वाटत नाही, असंही अमित ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
संबंधित बातमी:
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!