अमित शाह यांनी बुलडाण्यातील सभेत चोफेर टीका केली. शरद पवार फक्त आपल्या परिवाराचा विकास करत आहेत. त्यांनी जनतेसाठी काही केलं नाही असही अमित शाह म्हणाले. तसेच या परिवारवादी पार्ट्या विकास करु शकतात का? अस प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 15 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीनं महाराष्ट्राला लुटलं असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
UNCUT | काँग्रेस-राष्ट्रवादी कुटुंब चालवणारी पार्टी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं भाषण | बुलडाणा | ABP Majha
बुलडाणा जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या सात उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेतली.
बुलडाण्यातील सभेनंतर शाहांनी वाशिममध्येही सभा घेतील. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जगदंबा देवीचं दर्शन घेतलं. नंतर संत सेवालाल महाराज यांच्या समाधीच दर्शनही अमित शहा यांनी दर्शन घेतलं. या वेळी बंजारा बांधवांच्या हस्ते शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी त्याच्या सोबत चंद्रशेखर बावनकुळे आमदार राजेन्द्र पाटणी आमदार निलंय नाईक हे उपस्थित होते.