Amit Satam on Uddhav Thackeray: मुंबईचे ममदानीकरण होऊ देणार नाही, अशी  टिप्पणी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी प्रचारसभेतून केली. या टीकेला उत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया हा कोण चाटम? असे म्हणत खिल्ली उडवली. यानंतर अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांनी मला शिवी नाही दिली, तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली. मराठी माणसाचा अपमान केला. मी सामान्य कुटूंबातून आलो आहे, कोणाच्या आशीर्वादाने आलो नाही, अशी प्रतिक्रिया दिली. 

Continues below advertisement

त्यामुळे संस्कृती खालावत आहे

शिवसेना भवनात आज (4 डिसेंबर) ठाकरे बंधूंच्या हस्ते शब्द ठाकरेंचा म्हणत वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी बोलताना उद्धव आणि राज यांनी मुंबईच्या विकासावर मुद्दे मांडताना भाजपवर तोफ डागली. दोघांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडल्यानंतर भाजपकडून अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली. अमित साटम म्हणाले, त्यांचा महापौर झाला तर महाराष्ट्रचा पाकिस्तान होईल. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते ज्या प्रमाणे मारामारी करतात त्यामुळे संस्कृती खालावत आहे. मुंबईकरांचा निर्णय पक्का आहे. येणाऱ्या निवडणुकीत भगवा फडकणार असून महायुतीचा महापौर बसणार आहे. पुढील वर्षी गणपतीला हे दिसणार नाहीत, दिवाळीला एकत्र दिसणार नाहीत. मराठी माणसासाठी 25 वर्षात उद्धव मामुने केलेलं एक तर काम दाखवावं, आम्ही 10 काम दाखवतो. बीडीडी चाळीत आम्ही लोकांना घर दिलं. तुम्ही मातोश्री 2 बनवलं, अशी टीका साटम यांनी केली. 

ठेवी या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायलाही नसतात

दरम्यान, उद्धव ठाके म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या ठेवी सुमारे ९२ हजार कोटींपर्यंत नेल्या होत्या. कोस्टल रोड याच पैशातून बांधण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे ‘ठेवी चाटायला नसतात’ हे विधान अशोभनीय आहे. ठेवी या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायलाही नसतात. सध्या महापालिकेचे साधारणतः 15 हजार कोटींचे बजेट आहे, पण कॉन्ट्रॅक्टरना ३ लाख कोटींचे देणं करून ठेवले आहे. हा खोकासुरानी केलेला ३ लाख कोटींचा घोटाळा आहे.

Continues below advertisement

ते पुढे म्हणाले की, मुंबईचा महापौर मराठीच होणार. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. महाराष्ट्रात मराठीचा मान राखलाच पाहिजे.वचननाम्यामध्ये मुंबईकर हा शब्द वापरला आहे, कारण जर मराठी माणूस हा शब्द वापरला असता, तर निवडणूक आयोगाने तो रिजेक्ट केला असता; परंतु मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच. 2017 मध्ये गारगाई पिंजाळ धरणाचे वचन दिले होते, पण मुख्यमंत्री झाल्यावर लक्षात आले की त्यासाठी 5.5 ते 6 लाख झाडांची कत्तल करावी लागेल, म्हणून तो प्रकल्प थांबवून डिसलिनेशन ऑफ वॉटर (समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे) हा प्रकल्प सुरू केला. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्याचा पायलट प्रोजेक्ट (400 एमएलडी प्रतिदिन) यांनी मारून टाकला आणि पर्यावरणचा ऱ्हास करणारे गारगाई पिंजाळ प्रकल्प परत आणले. यांनी मराठी रंगभूमीचे दालन, वरळी दुग्ध डेरी, देवनार डंपिंग ग्राउंड, कुरला मदर डेअरी (आणि कांजूरची मिठागरे) हे बिल्डरच्या किंवा अदानीच्या घशात घातले आहेत, असे ते म्हणाले. 

 

इतर महत्वाच्या बातम्या