Uddhav Thackeray BMC Election 2026: भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी आमच्या छोट्या आणि साध्या कामांचं श्रेय घेण्याऐवजी आपलं मोठं काम सांगावं, जसं पंतप्रधान मोदींनी (PM Modi) कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली, अरबी समुद्र मिंध्यांनी बांधला. ही त्यांची कामे मागे पडताय. अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांनी बांधला ज्या अरबी समुद्रात मोदीजींनी शिवस्मारकाचे जलपूजन केलं, ते शिवास्मारक समुद्रातून नेमकं कधी बाहेर काढणार? त्यामुळे त्यांनी समुद्रमंथन करून हे शिवस्मारक बाहेर काढावं, अशीबोचरीटीकाशिवसेनाप्रमुखउद्धवठाकरेंनी (Uddhav Thackeray)केलीय.
Uddhav Thackeray : मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांना कोणी ओळखत नव्हतं, त्यावेळेस...
पंतप्रधान मोदींनी कैलास पर्वत बांधलाय. स्वर्गातून गंगा त्यांनीच आणली आहे. समुद्रमंथही त्यांनीच केलं होतं. अरबी समुद्र मिंधे आणि फडणवीसांनी तयार केला आहे. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेऊ नये. आम्ही 25 वर्षांत मुंबईत फार साधी-साधी कामं केली आहेत. साधं कोस्टल रोडचं काम केल, साधं मध्य वैतरणा धरण बांधलं, करोनाकाळात लहानसहान कामं केली आहेत. गेल्या 25 वर्षात आम्ही मुंबईत अतिशय साधी साधी कामे केली आहेत आणि तीच काम आम्ही आता मुंबईमध्ये होर्डिंगवर दाखवत आहोत. ज्यामध्ये साधं कोस्टल रोडचे काम, साधं वैतरणा धरणाचं काम, कोरोना काळातील साधी आणि छोटी छोटी कामे केली आहेत. ज्यावेळी मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांना कोणी ओळखत नव्हतं, त्यावेळेस कोस्टल रोडच्या बांधकामचे प्लॅनिंग, वैतरणा धरण, अनेक हॉस्पिटल आम्ही बांधण्याचं काम केलंय. ही अतिशय छोटी कामे आम्ही केली आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं मोठं श्रेय जनतेला सांगावं, आमचंकसलंश्रेयघेताय? असेही उद्धव ठाकरे म्हणाले
Uddhav Thackeray on Rahul Narwekar: अध्यक्षांच वर्तन उद्दाम, त्यांना तत्काळ निलंबित करूनगुन्हादाखलकरा
संपूर्ण महाराष्ट्रमध्ये एक नवचैतन्य सळसळतंय, साहजिकच आनंद आहे. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने शिवशक्तीचा वचननामा आम्ही जाहीर करतो आहे. शिवशक्तीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आहे, शिवसेना (Shivsena) आहे, शरद पवारांचा ओरिजनल पक्ष राष्ट्रवादी (NCP) आहे. त्यांच्या प्रतिनिधी म्हणून विद्या चव्हाण या आलेले आहेत. एकूणच लोकशाही संपून झुंडशाही सुरु झाल्यासारखीपरिस्थितीआहे. मतचोरीनंतर आत्ता उमेदवारांची पळावापळवी सुरु केली आहे. बिनविरोध निवडणूकहोताय. राहुल नार्वेकर धमक्या देतोय. हा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे आणि अध्यक्ष म्हणून निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारणविधानसभा अध्यक्ष कोणत्या पक्षाचे नसतात, ते आमदार सारखे वागू शकत नाही. विधानसभाअध्यक्षअधिकारांचागैरवापरकरतआहेत. मंत्र्यांनादेखील आपला लावाजवाघेऊननिवडणुकांच्याप्रचारातफिरतायेतनाही. तेस्वतालानायकपिक्चरमधलेअनिलकपूर समजताय. अध्यक्षांच वर्तन उद्दाम, त्यांना तत्काळ निलंबित करूनगुन्हादाखलकरावा, अशीमोठीमागणीशिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनीकेलीआहे.
संरक्षणकाढूनघेण्याचाअधिकारविधानसभाअध्यक्षांनासभागृहातअसतो. सभागृहाबाहेरतेआमदारअसतात. राहुल नार्वेकर धमक्या देतोय. त्यामुळे हा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे आणि अध्यक्ष म्हणून त्यांना निलंबित केलं पाहिजे. सोबतच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
इतरमहत्वाच्याबातम्या
