Ajit Pawar Baramati Vidhan Sabha Election 2024: आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जातेय. दमदाटी करुन बोगस मतदान करण्यात येत आहे, असा आरोप बारामती विधानसभा मतदारसंघाचे (Baramati vidhansabha Election) शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या आई शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी केला आहे. शर्मिला पवार यांच्या आरोपानंतर अजित पवार यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन भेट दिली. सर्व माहिती घेऊन अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. 


शर्मिला पवार यांनी केलेला आरोप धादांत खोटा आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी कोणालाच धमक्या दिलेल्या नाही. इतके वर्षे निवडणूक होतेय, तेव्हापासून असे आरोप झाले नाही. सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण राहतो. आमचे कार्यकर्ते असं करणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्ट केले. शर्मिला ठाकरेंनी तक्रार केली असेल तर पोलीस याबाबत चौकशी करतील. कुठेही बोगस मतदान झालेलं नाही. मी देखील 50 कार्यकर्त्यांना सांगेल द्या, तक्रारी, पण त्याला काय अर्थ आहे. त्यामागे काहीतरी तथ्य असायला हवं, असं अजित पवार म्हणाले. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटेल त्याला मतदान करा. पण सर्वांनी येऊन मतदान करावं, असं आवाहन देखील अजित पवारांनी केली. 


अजित पवारांनी तीन बोटं दाखवली- 


अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बोट दाखवून इशारा करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला, असा सवाल पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. यावर अरे वेड्यांनो...तुम्हीच दाखवता मतदान केल्याचं बोट दाखवा...मग मतदान केल्यानंतर शाई लावलेलं बोट दाखवणार ना...दुसऱ्या बोटावर शाई लावली असती असती तर ते दाखवलं...असं म्हणत अजित पवारांनी मिडल फिंगरसह करंगळी दाखवली. शर्मिला पवारांच्या या आरोपामागे नेमकं कारण काय?, असा प्रश्नही अजित पवारांना विचारण्यात आला. यावर तुझेही केस गेलेत, माझेही गेलेत, तरी अजून यामागचे कारण समजले नाही, असं मिश्किल विधान अजित पवारांनी केले. यानंतर पत्रकारांमध्ये देखील एकच हशा पिकला. 


बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?


शर्मिला पवार या मतदान केंद्रात गेल्या होत्या. बाहेर येऊन त्यांनी अजित पवार गटाच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघाची राज्यभर चर्चा होत आहे. कारण या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युग्रेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. या चुलत्या पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, तसेच दमदाटी केली जात असल्याचा आरोप शर्मिला पवार यांनी केला. यानंतर अजित पवार त्याठिकाणी दाखल झाले आणि सर्व माहिती घेऊन शर्मिला पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. 


मिडल फिंगर ते करंगळी, दादांच्या स्टाईलने एकच हशा, Video:



संबंधित बातमी:


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?