इंदापूर: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाची आज इंदापुरात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, काहींना तिकीट द्यायचं होतं आणि पक्ष प्रवेश करायचा होता म्हणून उशीर झाला. सगळ्यांना आमदार व्हायचं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी झाली, तिसरी आघाडी झाली आहे. राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. 


पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची पहिली 38 आणि आज 7 जणांची यादी जाहीर झाली आहे. आणखी नावांची यादी जाहीर होणार आहे. याचा पत्ता कट आणि त्याला उमेदवारी असे काही लिहू नका. काही जागांबाबत आमची दिल्लीत चर्चा सुरू आहे. महायुतीत 288 पैकी 11 जागा कुणी लढायचं हे ठरवायचं बाकी आहे. बाकी सगळं ठरलं आहे. आम्ही एकत्र असलो तरी आम्ही विचारधारा सोडली नाही. माझ्यातील 10 टक्के जागा अल्पसंख्याक उमेदवारांना देणार आहे. आम्हाला सगळ्यांना सोबत घ्यायचं आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी आमच्या सोबत काम करणार आहे, असंही यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे. 


दिवाळी झाल्यावर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल. पाटी कोरी आहे. ते सांगत आहेत की संधी दिल्यावर पाटी भरून काढू. राहिलेले दोन दिवसांत उमेदवार जाहीर करू. आम्ही या निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेऊन लोकांपर्यत जाणार आहोत. आम्ही टप्पा टप्याने पुढं चाललो आहे, मी बारामतीतून अनेकदा लढलो आहे बारामतीकर मला ओळखतात. बारामतीकरांना मी माझी भूमिका समजून सांगेन. महाराष्ट्रात ताठ मानेने फिरेल असं मला मतदान होईल, लीड कितीचे असेल हे सांगायला मी जोतिषी नाही. लोकसभेला काय झालं त्यावेळी मला बोलायचं नाही ही लोकशाही आहे, असंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणालेत. 


लाडकी बहीण योजना बंद केल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण


तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार? इथं काही लोकांनी भाषणा केली आणि सांगितलं दादा ही योजनेवर स्टे आणला आहे.ज्यांनी म्हटलं स्टे आणला, त्यांनी माझ्यासमोर यावं, समोर खरं खोटं करू. तुझ्याकडे पण बघतो आणि योजना बंद करणाऱ्यांकडे पण बघतो असं म्हणत लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. लाडकी बहीण योजना बंद केल्याचे सांगतात स्टे दाखवा असं आव्हानही अजित पवारांनी यावेळी दिलं आहे.