Ahmedpur Vidhan Sabha constituency : विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. अशातच आज आपण अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची (Ahmedpur Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे विनायकराव पाटील मैदानात उतरले आहेत. तर भाजपचे बंडखोर गणेश हाके हे देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी सामना
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी सामना होत आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. पक्ष फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यावेळी अजित पवार गटाकडून त्यांना पुन्हा उमेदनवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विनायकराव पाटील तर भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश हाके हे देकील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं या मतदारसंघात रंगत वाढली आहे.
2019 च्या निवडणुकीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यापैकी एक अहमदपूर आहे. लातूर जिल्ह्यातील ही सीट आहे. सध्या या मतदारसंघात बाबासाहेब मोहनराव पाटील हे विद्यमान आमदार आहे. पाटील यांना मागच्या निवडणुकीत 84 हजार 636 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे विनायकराव किशनराव जाधव पाटील यांचा 29,191 हजार मतांनी पराभव केला होता. लातूर जिल्ह्यापासून अहमदपूर 45 किलोमीटरवर आहे. अहमदपूरमध्ये हिंदू, मुस्लिम, जैन आणि लिंगायत समुदायातील लोक अधिक आहेत. टेक्स्टाईल आणि साखर कारखाने अहमदपूरमध्ये आहेत. या भागात ऊस, कापूस आणि सोयाबीन आदी पिके घेतली जातात.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ शिवाजी काळगे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव केला आहे. यावेळी देखील काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, शरद पवार गटाला या मतदारसंगाचे तिकीट मिलाले आहे. त्यामुळं या मतदारसंघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना होत आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळं 23 तारखेलाच खरं चित्र स्पष्ट होमार आहे.
महत्वाच्या बातम्या:
Latur Assembly Election : लातूर जिल्ह्याकडं सर्वांचं लक्ष, 6 मतदारसंघातील चित्र स्पष्ट, कोण मारणार मैदान?