Ganesh Sugar Factory Election Result 2023 : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या 19 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या कलामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसलाय. 19 जागांपैकी 11 जागांवर थोरात कोल्हे युतीने बाजी मारली आहे.  तर विखे गटाला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे.  विखे पाटलांच्या ताब्यात असलेली सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या विवेक कोल्हे गटाची 18 जागांवर आघाडी झाली होती. आज सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली, सुरुवातीचे कल पाहाता गुलाल थोरात आणि कोल्हे गट उधाळणार असे चित्र आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या विजयासह भाजपचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत  जोरदार मुसंडी मारली आहे.


गेल्या काही दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजधानी दिल्लीमध्ये वजन वाढले होते. त्याशिवाय भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी पुढील उमेदवार म्हणूनही विखेंच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळेच भाजपच्याच लोकांनी विखेंचा पराभव केला, अशी चर्चा अहमदनगरमध्ये सुरु आहे. गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांचा पराभव जवळपास निश्चित मानला जातोय. थोरात कोल्हे युतीची मोठ्या आघाडीकडे वाटचाल सुरु आहे. 19 पैकी 11 जागांवर थोरात कोल्हे युतीचा विजय झालाय तर विखे गटाला अवघी 1 चा जागा मिळाली आहे. उर्वरित 7 जागांवर सुद्धा थोरात-कोल्हे आघाडीची वाटचाल विजायकडे सुरु आहे. सातही जागांवर विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव होण्याची शक्यता आहे, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.


भाजपच्या युवा नेत्याने केला भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा पराभव


अहमदनगर जिल्ह्यातील गणेशनगर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 19 जागांसाठी मतमोजणी सुरू असून 11 जागांवर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या युतीने विजय मिळवलाय तर विरोधात असणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना 1 जागेवर समाधान मानण्याची वेळ आलीय.. उर्वरित 7 जागांवर सुद्धा कोल्हे थोरात युती आघाडीवर असून विखे पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय.. दिल्ली दरबारी वजन आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणार अहमदनगर जिल्ह्यातील नाव म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील.. राहाता मतदार संघातील  गणेश नगर सहकारी साखर कारखान्यात मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातातील 8 वर्षांची सत्ता सोडण्याची वेळ आलीय.. भाजपचे युवा नेते व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची साथ घेत हा विजय संपादन केलाय