मुंबई : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे  अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 11 डिसेंबरला सर्वच विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये मतदार राजाचा कौल पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थान दर पाच वर्षांनी सत्तापालट करण्याची पद्धत यंदाही कायम ठेवण्याची चिन्हं आहेत. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर असली, तरी काँग्रेस सत्ता काबीज करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मोठा धक्का बसू शकतो.


वसुंधरा राजे थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत : शरद यादव

राजस्थान विधानसभेत 200 जागा असून बहुमताचा आकडा 101 आहे. मात्र 199 जागांवर निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस 101 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. भाजपच्या पारड्यात 83 जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 15 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.


विधानसभा निवडणूक 2013 आणि एक्झिट पोलची तुलना

2013 मधील निवडणुकीत 163 जागांवर विजय मिळवून भाजपने शानदार पुनरागमन केलं होतं. काँग्रेसला अवघ्या 21 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र एक्झिट पोलनुसार येत्या निवडणुकीत भाजपची दाणादाण उडू शकते. भाजपला तीन अंकी जागाही मिळवता येणार नसल्याचं एक्झिट पोलची आकडेवारी सांगते. भाजपच्या जागा जवळपास निम्म्यावर जाण्याची चिन्हं आहेत. तर काँग्रेसच्या जागा पाचपट होण्याचे संकेत आहेत.

संबंधित बातम्या:

Assembly Election Exit Polls: भाजपच्या हातून दोन राज्यं निसटण्याचा अंदाज

Madhya Pradesh Exit Poll: भाजपची हार, काँग्रेस सत्ता मिळवण्याचा अंदाज

Chhattisgarh Exit Poll: रमण सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसण्याची चिन्हं