मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले आव्हान देणार आहे. अभिजीत बिचुकले आज (4 ऑक्टोबर) वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. बिचुकले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करेल.

आदित्य ठाकरे यांनी काल (3 ऑक्टोबर) मोठं शक्तिप्रदर्शन करुन वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब तसंच शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे अ‍ॅड. सुरेश माने यांना उतरवण्यात येणार आहे. तर आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. आता अभिजीत बिचुकले आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहे.

पेशाने व्यावसायिक असलेले आदित्य ठाकरे कोट्यधीश, संपत्ती तब्बल...

दरम्यान अभिजीत बिचुकले साताऱ्यातूनही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकले लढणार आहे. तर त्याची पत्नी अलंकृता बिचुकले नुकतेच भाजपवासी झालेल्या उदयनराजेंविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहे.

कोण आहे अभिजीत बिचुकले?

- साताऱ्यात अभिजीत बिचुकलेचा जन्म झाला
- घरात धार्मिक वातावरण, ज्योतिष हा पारंपरिक व्यवसाय
- बिचुकले सातारा नगरपालिकेत कर्मचारी होता
- पण सुट्ट्यांच्या कारणावरुन 6 वर्षांपूर्वी राजीनामा दिला
- त्यानंतर उपजीविकेसाठी गाण्यांचे शो, ऑर्केस्ट्राचं आयोजन
- त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी जाहीर करणे आणि त्यानंतर ऐनवेळी माघार घेणे हे प्रकार सुरु केले
- उदयनराजेंविरोधात त्याने अनेकदा खासदारकीही लढवली, मात्र दोन हजार मतंही मिळाली नाहीत
- यंदा त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्जही भरला होता
- तसंच पत्नीलाही निवडणुकीत उभं केलं होतं
- अभिजीत बिचुकलेवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत

मी फक्त एकालाच घाबरतो, अभिजीत बिचुकलेला : उदयनराजे भोसले

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या मध्यात अभिजीत बिचुकलेला पोलिसांनी सेटवरुन अटक केली होती. चेऊबाऊन्सप्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर खंडणीचाही गुन्हाही त्याच्यावर झाला होता. जवळपास दीड महिन्यांनी जामीन मिळाल्यानंतर त्याची बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री झाली.

संबंधित बातम्या