जालन्यातून काँग्रेसचे लोकसभा उमेदवार विलास औताडे यांची प्रचारसभा भोकरदनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाणांनी ही घोषणा केली. विखे हे अहमदनगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखेंचा प्रचार करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली होती. राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचंही म्हटलं जातं.
सुजय विखेंचा भाजपप्रवेशाचा निर्णय योग्यच, वडील राधाकृष्ण विखे पाटलांचं मत
अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला होता. मात्र दिलजमाई झाल्यानंतर सत्तार यांनी अर्ज मागे घेतला. मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटले होते.
VIDEO | भाजपमधून हकालपट्टी केल्याने अनिल गोटेंचा संताप | धुळे
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी साध्वी प्रज्ञासिंगच्या शहीद हेमंत करकरे विषयक वक्तव्याचा निषेध केला आहे. साध्वीचं वक्तव्य अतिशय गंभीर असून यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.