UP Election 2022 : सध्या देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज उत्तर प्रदेशमध्ये पार पडत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील 58 जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दुपारी 11 वाजेपर्यंत 22.6 टक्के मतदान झाले होते. दरम्यान,मतदानावेळचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 105 वर्षाच्या वृद्ध महिलेने मतदानाचा हक्का बजावला आहे. या वृद्ध महिलेने मुजफ्फरनगर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
विकास आणि सुरक्षिततेसाठी मतदान
दरम्यान, मतदानानंतर 105 वर्षाच्या महिलेने माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे. मतदान किती महत्त्वाचे आहे, हे त्या महिलेने सांगितले. मी विकास आणि सुरक्षिततेसाठी मतदान केले आहे. मुझफ्फरनगरमध्ये आपला मतदानाा हक्क बजावल्यानंतर या वृद्ध महिलेने प्रतिक्रिया दिली आहे.
आत्तापर्यंत कुठे किती मतदान झाले?
मुझफ्फरनगरमध्ये आत्तापर्यंत 22.6 टक्के
हापूर जिल्ह्यात 22.8 टक्के
हापूर नगर विधानसभेत 22.4 टक्के
धौलाना विधानसभेत 22.5 टक्के
गढमुक्तेश्वर विधानसभेत 23 टक्के
नोएडामध्ये 15 टक्के
दादरीमध्ये 20 टक्के
जेवरमध्ये 22.7 टक्के
बुलंदशहरमध्ये 21.62 टक्के
आग्रामध्ये 20.42 टक्के
दरम्यान, मेरठ जिल्ह्यातील सात विधानसभांमध्ये सकाळी 11 वाजपर्यंत 17 टक्के मतदान झाले आहे. सध्या मतादानाला चांगला प्रतिसाद मिळत असून, या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, पश्चिम उत्तर प्रदेशात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून मोठी आघाडी घेतली होती. मात्र यावेळी ते तितकेसे सोपे मानले जात नाही. यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडीचे जयंत चौधरी या निवडणुकीत एकत्र आले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेश हा आरएलडीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, वडील अजित सिंह यांच्या निधनानंतर जयंत चौधरी यांची ही पहिलीच परीक्षा आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधून भाजप, बसपा आणि काँग्रेसने 58 उमेदवार उभे केले आहेत. तर समाजवादी पक्षाचे 28, आरएलडीचे 29 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार रिंगणात आहे. या तिन्ही पक्षांची युती आहे.