LIVE BLOG : राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
09 Jun 2019 11:17 PM
मुंबई : चेंबूर, घाटकोपर परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
अंबरनाथ : कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील प्रकार, सोनू अग्रहरी कामगाराचं नाव, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद, संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत साशंकता, कंपनीच्या मॅनेजरकडून पत्रकारांना वार्तांकन करताना धक्काबुक्की
मुंबई : महाराष्ट्रभरातील रिक्षा चालक-मालक संपावर जाण्याच्या तयारीत,
सरकारने जून महिन्याच्या अखेरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास, 9 जुलैपासून राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संपावर जाणार
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीपासून सुरु रक्तपात सुरुच, भाजप उद्या काळा दिवस पाळणार, राज्यपाल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार
मुंबई: मरीन ड्राईव्ह आणि जुहू बीचवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
सातारा : वाई, महाबळेश्वर परिसरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, अनेक झाडांची पडझड, महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठले, महामार्गावरील वाहतूक संतगतीने
औरंगाबाद शहरात काही भागात जोरदार पावसाची हजेरी, तर ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा
शिर्डी : संगमनेर तालुक्यात जोरदार पाऊस, धांदरफळ परिसरात पावसाची हजेरी, पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावले, उकाड्यापासून हैरान झालेल्या जनतेला काहीसा दिलासा
मुंबई : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज, प्रशासनाकडून समुद्र किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा,
पुणे, पिंपरीतील अस्वच्छतेच्या कारणास्तव सिनेमागृहात समोसा बंद, एफडीएचे आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलिस थिएटर्सना आदेश
सातारा वाई महाबळेश्वर परिसरात अवकाळी पासाचा धुमाकूळ, अनेक झाडे उन्मळून पडली, अनेकांच्या घरात पाणी ,
महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साठले
अंबरनाथमध्ये जिवंत मासळीसोबत दम्याचं औषध,
औषध घेण्यासाठी दम्याच्या रुग्णांची मोठी गर्दी,
औषधामुळे मोठा फरक पडत असल्याची रुग्णांची माहिती
नवी दिल्ली : थोड्याच वेळात भाजप कोअर कमिटीची बैठक, राज्यातले ज्येष्ठ नेते बैठकीसाठी दिल्लीत दाखल, मंत्रिमंडळ विस्तार, राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष पदावर चर्चा होण्याची शक्यता
ठाणे- ठाण्याच्या नितीन कंपनी जवळील दर्यासागर हॉटेल समोर रस्त्याचे काम चालू असताना गॅस पाईप लाईन फुटली,
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल,
तब्बल अर्धा तास गॅस लिकेज,
व्हॉल्व न मिळाल्याने तात्पुरती माती टाकून लिकेज बंद करण्याचा प्रयत्न
World Cup 2019 : टीम इंडियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, लंडनच्या ओव्हल मैदानात भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार, भारतीय संघात कुठलाही बदल नाही
नागपूर : नागपूर जवळील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत लोणखैरी येथे शेतात पडलेल्या उघड्या तारांचा स्पर्श झाल्याने प्रकाश अंजनकर या शेतकऱ्याचा मुत्यू तर प्रमोद अंजनकर गंभीर जखमी
नागपूर : नागपूर जवळील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत लोणखैरी येथे शेतात पडलेल्या उघड्या तारांचा स्पर्श झाल्याने प्रकाश अंजनकर या शेतकऱ्याचा मुत्यू तर प्रमोद अंजनकर गंभीर जखमी
जालना: उद्धव ठाकरेंनी दुष्काळ दौऱ्यात उरकले रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन, कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून स्वागत, बॅनरबाजी
नागपूर :
बैद्यनाथ चौकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी चेन स्नेचिंग, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
नाशिक : जेलरोडवरील नारायणबापू नगर परिसरात गाव गुंडांचा दारू पिऊन धिंगाणा, 2 चारचाकी तसेच 3 दुचाकी वाहने फोडली, पोलीस चौकीवरही केली दगडफेक
नाशिक : जेलरोडवरील नारायणबापू नगर परिसरात गाव गुंडांचा दारू पिऊन धिंगाणा, 2 चारचाकी तसेच 3 दुचाकी वाहने फोडली, पोलीस चौकीवरही केली दगडफेक
उद्धव ठाकरे यांच्याकडून जालन्यातील गायक पोलीस योगेश गायके आणि किशोर दिवटे यांचा अर्जुन खोतकर यांच्या घरी पुष्पगुच्छ देऊन सत्कार, उद्धव ठाकरेंकडून गायक पोलीस योगेश गायके यांची प्रशंसा
वर्धा : जिल्ह्यातील जाम येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, श्वेता प्रशांत ढेपे असे मृत महिलेचे नाव
सिंधुदुर्ग : दोडामार्ग-मोर्लेतील युवकांवर टस्कर हत्तीचा हल्ला, भयभीत लोकांनी रात्र काढली जागून
उद्धव ठाकरेंचा दुष्काळ दौरा, जालना दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर आणि नव्याने पक्ष प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर
साताऱ्यातील मायणी येथे रूग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे साप चावलेल्या पेशंटचा उपचाराविना मृत्यू, काल संध्याकाळी सात वाजेची घटना, संतप्त नातेवाईक मृतदेहासह रूग्णालयाबाहेर
सांगलीतील संजयनगरमध्ये काल रात्री साडे आठच्या सुमारास बिल्डिंग मटेरीयल सप्लायरचा निर्घृण खून
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. विश्वचषकात आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सुपर सामना, 3 वाजता लंडनच्या ओवल मैदानात मॅच
2. मान्सून केरळात दाखल, महाराष्ट्रात आठवडाभरानंतर धडकणार, सरकारच्या सूचनेनंतरच पेरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला
3. ईव्हीएमवर विधानसभा निवडणूक झाल्यास बहिष्कार टाकणार, प्रकाश आंबेडकरांचं माझा कट्टयावर मोठं विधान, राहुल गांधींच्या नेतृत्त्वावरही घणाघात
4. दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी वडील आणि वहिनीची हत्या केली, चंद्रकांत खैरेंचा आरोप, लोकसभेतील पराभवामुळं खैरे भावूक
5.गेल्या वर्षीच्या तुलनेत दहावीचा निकाल 12 टक्क्यांनी घसरला, अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांची फरफट अटळ
6. चंद्रावरचा बर्फ वितळवून पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी, अॅमेझॉनच्या जेफ बेजॉस यांची भन्नाट कल्पना, 'री मार्स' कार्यक्रमादरम्यान मिशनची माहिती