LIVE BLOG | मुंबई गोवा महामार्ग ठप्प, लांजाजवळच्या वाकेड घाटात मोरी खचली

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jun 2019 11:17 PM
बेळगाव : इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतल्याबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा कन्नड संघटनांकडून निषेध, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्ग ठप्प

, लांजा जवळच्या वाकेड घाटात मोरी खचली

, अर्ध्यातासापासून वाहतुक ठप्प

, मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला दणका,

महामार्गाच्या कामाच्या हलगर्जीपणाचा फटका,

वाहतुक कोंडी, प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी
बिदर एक्सप्रेस रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना तळेगाव ते मावळ दरम्यान ही रेल्वे बंद पडली, नऊ वाजता लोणावळा येथे ही रेल्वे पोहचणे अपेक्षित होतं. यामागे पुण्याहून सुटलेली अन लोणावळ्यात 9 वाजून 20 मिनिटांनी पोहचणारी लोकलही अडकली
अकोला : मोहाळा येथील भाजप कार्यकर्ते मतीन पटेल हत्या प्रकरण, मुख्य आरोपी हिदायत पटेल यांचा अकोट न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज केला मंजूर, पटेल महिनाभरापासून फरार, हिदायत पटेल काँग्रेसचे लोकसभेतील पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष
सिंधुदुर्ग :

तळकोकणात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात

गेल्या तासभरापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस
,
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने, महामार्गावर चिखलाचे साम्राज्य
मला शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमात जाताना दुसरीकडे जातोय असे वाटत नाही, आपल्या घरी येतोय असेच वाटते : मुख्यमंत्री
कार्यक्रमाला मी आलोय ते बाळासाहेबांचा आशीर्वाद, उद्धवजींचं प्रेम घ्यायला आणि शिवसैनिकांची ऊर्जा घ्यायला आलोय : मुख्यमंत्री
शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रम : शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेचे उपनेतेपद

- टीम इंडियाला धक्का, सलामीवीर शिखर धवन विश्वचषकाबाहेर ,
- अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे धवन बाहेर
मुंबई : विदर्भातील कृषी समृद्धी प्रकल्प (केम) गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. राज्याचे पणन मंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत याची घोषणा केली. 108 कोटी रुपयांच्या प्रकल्पात 9 कोटी 88 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
मुंबई : विदर्भातील कृषी समृद्धी प्रकल्प (केम) गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. राज्याचे पणन मंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत याची घोषणा केली. 108 कोटी रुपयांच्या प्रकल्पात 9 कोटी 88 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी -
फुटलं रे फुटलं, बजेट फुटलं,
ट्विटरवर बजेट फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,
फुटलेल्या बजेटची सायबर क्राईमकडून चौकशी झालीच पाहिजे,
प्रसिद्धीसाठी हापापलेल्या मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांचा धिक्कार असो
अकरावी प्रवेशासाठी SSC विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत 8 टक्के तर इतर शाखेत 5 टक्के जागा वाढवणार, आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात
विश्वचषकात इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 150 धावांनी उडवला धुव्वा, इंग्लंडनं आपला चौथा विजय साजरा करत गाठलं गुणतालिकेतील अव्वल स्थान

पार्श्वभूमी

 




    1. नवी मुंबईतल्या सुधागड कॉलेज परिसरात स्फोटकांचा बॉक्स ठेवणारा कॅमेऱ्यात कैद, माझाच्या हाती सीसीटीव्ही फुटेज, आरोपीला बेड्या ठोकण्याचं आव्हान





    1. 11वी प्रवेशासाठी SSC विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत 8 टक्के तर इतर शाखेत 5 टक्के जागा वाढवणार, आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात





    1. अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या घोषणा, 2021पर्यंत आंबेडकर स्मारक पूर्ण करण्याचं आश्वासन, तर सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटींचा निधी





    1. व्हॉट्सअॅपसाठी फिंगरप्रिंट फिचर कार्यन्वित करण्याचा केंद्राच्या सूचना, फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी प्रयत्न





    1. वसईत समाजकंटकांनी पेटवलेल्या 3 दुचाकी जळून खाक, कृष्णा टाऊनशीपमधली घटना, सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा शोध सुरू





    1. विश्वचषकात इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 150 धावांनी उडवला धुव्वा, इंग्लंडनं आपला चौथा विजय साजरा करत गाठलं गुणतालिकेतील अव्वल स्थान



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.