- मुख्यपृष्ठ
-
Election
-
निवडणूक
LIVE BLOG | मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार, 16 ऐवजी 18 ऑगस्टपासून रेल्वेसेवा सुरू होणार
LIVE BLOG | मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार, 16 ऐवजी 18 ऑगस्टपासून रेल्वेसेवा सुरू होणार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
15 Aug 2019 07:40 PM
पुणे-कोल्हापूर रेल्वे सेवा सुरु, गेल्या काही दिवसांपासून महापुरामुळे पुण्यातून मिरजपर्यंतच सुरू होती सेवा, रेल्वे रुळांची तपासणी झाल्यावर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
पुणे : मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार, 16 ऐवजी 18 ऑगस्टपासून रेल्वेसेवा सुरू करणार असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी या गाड्या राहणार बंद, प्रवाशांचे आरक्षणही रद्द
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 21 आणि 22 ऑगस्टला कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार
गोवा : राज्यात गेल्या बारा तासात पावणे सहा इंच पाऊस, यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यात आतापर्यंत 116.36 इंच पावसाची नोंद, हवामान खात्याकडून दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे आणखी 2 दरवाजे उघडले, सध्या धरणाच्या चार दरवाज्यातून 4 हजार 500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु
नांदेड : चुलत बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन सख्या भावांचा लिंबगाव जवळ अपघातात मृत्यू, परभणीमधील कमळापूर येथील संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे या दोघांचा मृत्यू
कोल्हापूर : राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला, सहा नंबरच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु, एका दरवाजातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा फारसा परिणाम जाणवणार नाही
कोल्हापूर : राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला, सहा नंबरच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु, एका दरवाजातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा फारसा परिणाम जाणवणार नाही
अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास
अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास
नाशिक : गोदावरी नदीवरील गंगापूर रोड ते मखमलाबादला जोडणाऱ्या कटारिया पुलाला आज सकाळी मोठं भगदाड
पडलं. 12 फूट खोल, 15 फूट रुंद हा खड्डा आहे. पुराचं पाणी साचल्याने खड्डा पडल्याचा संशय वर्तवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद केली आहे. मात्र या प्रकारामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
नागपूर : पूरग्रस्त भागात 4 लाख 50 हजार वीज जोडण्यांचा पुरवठा खंडित झाला होता. मात्र, आम्ही 500 खास पथकांच्या मदतीने तब्ब्ल 4 लाख 73 हजार वीज जोडण्या जोडल्याचा अजब दावा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते नागपुरात स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केल्यानंतर बोलत होते.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगी रंगात आकर्षक फुलांची सजावट
भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगी रंगात आकर्षक फुलांची सजावट
एबीपी माझातर्फे देशवासियांना 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पार्श्वभूमी
1.आज देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन, सकाळी 7.30 वाजता दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा सोहळा, दिवसभर माझावर खास कार्यक्रम
2. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर, महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेनापदक तर स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगुलचं डुडुल
3. कलम 370 रद्द केल्यानं बिथरलेल्या पाकिस्तानच्या पोकळ धमक्या, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं कारवाई केल्यास युद्ध पुकारू, इम्रान यांची दर्पोक्ती
4. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर औरंगाबादमध्ये हाय अलर्ट जारी, एका संशयीताचा स्केचद्वारे शोध सुरु, संशयीताच्या हालचालींवर पोलिसांचं लक्ष
5. पुणे-सोलापूर महामार्गानजीक दौंड एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग,केमिकल कंपनी असल्याची माहिती, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश
6. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर आकर्षक रोषणाई, सीएसटी, महापालिका, मंत्रालयासह सिद्धिविनायक मंदिरात दिव्यांची आरास