सामना, सुपर ओव्हर टाय, बाऊंड्रीजच्या जोरावर 'साहेब' वर्ल्डकप जिंकले

महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स आज दिवसभरातमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jul 2019 12:12 AM

पार्श्वभूमी

महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजरईशान्य भारत आणि बिहारमध्ये पावसाचा कहर, तब्बल 14 लाख नागरिकांना पुराचा फटका, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, लाखो हेक्टरवरील पीक नष्ट पश्चिम बंगालमधले विरोधी पक्षाचे 107 आमदार भाजपच्या वाटेवर,...More

विश्वचषक स्पर्धा 2019 च्या अंतिम सामना अत्यंत रोमहर्षत झाला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 241 धावा काढल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनेदेखील 241 धावा करुन सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने 15 धावा करुन न्यूझीलंडला 16 धावांचे आव्हान दिले. परंतु न्यूझीलंडनेदेखील 15 धावा करुन सुपर ओव्हर बरोबरीत सोडवली. परंतु सामन्यातील बाऊंड्रीजच्या (चौकार आणि षटकार) संख्येच्या बळावर इंग्लंडने हा सामना जिंकला. इंग्लंडने सामन्यात एकूण 24 बाऊंड्रीज ठोकल्या होत्या. तर न्यूझीलंडने केवळ 16 बाऊंड्रीज ठोकल्या होत्या. त्यामुळे हा सामना इंग्लंडने जिंकला.