LIVE BLOG : कांदा निर्यातीवरील दहा टक्के अनुदान केंद्राकडून बंद

कांदा निर्यातीवर मिळणारे 10 टक्के अनुदान केंद्र सरकारने काढून टाकले, निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी डिसेंबर महिन्यापासून लागू झालेले अनुदान सहा महिन्यात बंद करण्याचा निर्णय, भविष्यात निर्यातीवर विपरीत परिणाम होऊन बाजारभाव पुन्हा कोसळण्याची शक्यता

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jun 2019 11:02 PM
दादर चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य शासनाची मान्यता, हुतात्मा चौकाच्या धर्तीवर अखंड भीमज्योत, येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महापालिका अधिकारी, आंबेडकरी संघटना, आमदारांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक
शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागरांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेने सेनेत धुसफूस, विस्तारातील संभाव्य मंत्रिपदामुळे शिवसेनेतील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा
शिर्डीत अल्पवयीन मुलाची गोळ्या घालुन हत्या, शिवाजीनगर भागातील हॉटेल पवनधाम मधील घटना, हत्या करून करुन हल्लेखोर पसार , शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 13 जून रोजी ब्लॉक, मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास रोखली जाईल, ओव्हरहेड गँट्री बसवण्यासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई लेनवर कामशेतजवळ गँट्री बसवण्यात येणार
कांदा निर्यातीवर मिळणारे 10 टक्के अनुदान केंद्र सरकारने काढून टाकले, निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी डिसेंबर महिन्यापासून लागू झालेले अनुदान सहा महिन्यात बंद करण्याचा निर्णय, भविष्यात निर्यातीवर विपरीत परिणाम होऊन बाजारभाव पुन्हा कोसळण्याची शक्यता
अकरावी प्रवेशाठी सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी चर्चा करणार, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, एसएससी विद्यार्थ्यांना विनोद तावडे यांचा दिलासा
मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आणि गिरीश महाजन यांची मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात बैठक सुरु, रणजितसिंह मोहिते पाटील बंडखोर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर आणि अब्दुल सत्तार ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
रसभंग करणाऱ्या मोबाईलला मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर लावा, शिवसेनेची मागणी
मुंबईसह उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, पहिल्याच पावसात लोकलसेवेचे तीनतेरा, ठिकठिकाणी झाडं पडली

पार्श्वभूमी

महत्त्वाच्या हेडलाईन्स




    1. मुंबईसह उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी , तिन्ही मार्गावरच्या लोकसेवा विस्कळीत, विमान वाहतुकीवरही परिणाम





 




    1. काँग्रेसची पारंपरिक मतं फोडण्यासाठी प्लॅन आखा, अमित शाहांचा नेत्यांना कानमंत्र, तर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपनं रणनीती आखल्याने शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा





 




    1. आतापर्यंत ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या शरद पवारांचं निवडणूक अधिकाऱ्यांकडेही बोट, तर ईव्हीएम पुराण सोडून विधानसभेच्या कामाला लागा, अजित पवारांचा घऱचा आहेर





 




    1. देशभर गाजलेल्या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील 3 नराधमांना जन्मठेप, तर इतर तिघांना 5 वर्षांचा कारावास, पठाणकोट न्यायालयानं फाशीची मागणी फेटाळली





 




    1. सिक्सर किंग युवराज सिंहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, घोषणा करताना युवराज भावूक, मात्र टी-20 लीगमध्ये खेळत राहणार





 




    1. राजधानी दिल्ली तापली, तब्बल 48 अंश सेल्सियस तापमानाची नोंद, तर केरळात मान्सूनच्या जोरदार सरी, देवभूमीतले पर्यटक सुखावले





 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.