LIVE BLOG | आज दिवसभर...19 जून 2019
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jun 2019 06:41 AM
पार्श्वभूमी
नवी मुंबईतल्या सुधागड कॉलेज परिसरात स्फोटकांचा बॉक्स ठेवणारा कॅमेऱ्यात कैद, माझाच्या हाती सीसीटीव्ही फुटेज, आरोपीला बेड्या ठोकण्याचं आव्हान 11वी प्रवेशासाठी SSC विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत 8 टक्के तर इतर शाखेत 5 टक्के...More
नवी मुंबईतल्या सुधागड कॉलेज परिसरात स्फोटकांचा बॉक्स ठेवणारा कॅमेऱ्यात कैद, माझाच्या हाती सीसीटीव्ही फुटेज, आरोपीला बेड्या ठोकण्याचं आव्हान 11वी प्रवेशासाठी SSC विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत 8 टक्के तर इतर शाखेत 5 टक्के जागा वाढवणार, आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या घोषणा, 2021पर्यंत आंबेडकर स्मारक पूर्ण करण्याचं आश्वासन, तर सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी 775 कोटींचा निधी व्हॉट्सअॅपसाठी फिंगरप्रिंट फिचर कार्यन्वित करण्याचा केंद्राच्या सूचना, फेक मेसेज व्हायरल करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी प्रयत्न वसईत समाजकंटकांनी पेटवलेल्या 3 दुचाकी जळून खाक, कृष्णा टाऊनशीपमधली घटना, सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा शोध सुरू विश्वचषकात इंग्लंडनं अफगाणिस्तानचा 150 धावांनी उडवला धुव्वा, इंग्लंडनं आपला चौथा विजय साजरा करत गाठलं गुणतालिकेतील अव्वल स्थान