Maharashtra Government Formation | भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली
तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार की राज्य राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल करणार हे पाहावं लागेल.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
12 Nov 2019 08:52 PM
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी, स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
काही पक्षांच्या नेत्यांकडून जनादेशाचा अनादर : मुनगंटीवार
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हा जनादेशाचा अवमान : मुनगंटीवार
राज्यपाल दयावान माणूस, 48 तासांऐवजी सहा महिन्यांची मुदत दिली : उद्धव ठाकरे
भाजप-पीडीपी, भाजप-नीतीश यांचा मिलाफ कसा झाला?, उद्धव ठाकरेंचा सवाल
काल पहिल्यांदा शिवसेनेने आघाडीला संपर्क केला : उद्धव ठाकरे
शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला आहे, त्यावर सविस्तर चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल : प्रफुल्ल पटेल
शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी
राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राज्यपालांच्या शिफारशीवर राष्ट्रपतींकडून स्वाक्षरी
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिल्लीहून मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शरद पवारांसोबत बैठक
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचं आज सकाळी शरद पवार यांच्याशी बोलण झालं. अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि मी शरद पवारांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, पंतप्रधान मोदींनी बोलावली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक - सुत्र
राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी सरकार स्थापन करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. शिवसेना-राष्ट्रवादीसोबत एकत्र बसूनच निर्णय घेऊ, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंचे महाशिवआघाडीबाबात संकेत
सत्तास्थापनेबद्दल सर्व अधिकार शरद पवार यांना देण्यात आले आहे, आत्ताच्या घडीला आमच्याकडे बहुमत नाही - नवाब मलिक
आज सायंकाळी 5 वाजता काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे, 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्तास्थापना अशक्य -नवाब मलिक
राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांकडून शिफारस, राज्यपालांकडून केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र
राष्ट्रावादीनं असमर्थता दर्शवल्यास राजवट शक्य, राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु. राष्ट्रावादीच्या राज्यपाल भेटीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
राष्ट्रावादीनं असमर्थता दर्शवल्यास राजवट शक्य, राष्ट्रपती राजवटीची तयारी सुरु. राष्ट्रावादीच्या राज्यपाल भेटीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
खर्गे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल मुंबईला येणार, दिल्लीत सोनिया गांधीच्या निवासस्थानी हालचालींना वेग
खर्गे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल मुंबईला येणार, दिल्लीत सोनिया गांधीच्या निवासस्थानी हालचालींना वेग
खर्गे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल मुंबईला येणार, दिल्लीत सोनिया गांधीच्या निवासस्थानी हालचालींना वेग
संजय राऊतांनी कमी बोलावं, म्हणजे प्रकृती नीट राहिल : आशिष शेलार
राष्ट्रपती राजवट लागू झाली तर शिवसेना कोर्टात जाण्याची शक्यता
राष्ट्रपती राजवट लागू झाली तर शिवसेना कोर्टात जाण्याची शक्यता
संजय राऊत यांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून संजय राऊत बाहेर
संजय राऊत यांना उद्या डिस्चार्ज मिळणार, अतिदक्षता विभागातून संजय राऊत बाहेर
सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना सत्ता स्थापन करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थानी हालचालींना वेग, अहमद पटेल, वेणुगोपाल राव, ए. के. अॅंटोनी सोनिया गांधींच्या निवासस्थानी
नवी दिल्लीत सोनिया गांधींच्या निवासस्थानी होणारी काँग्रेस कोअर कमिटीची बैठक रद्द, दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक, काँग्रेस नेते महाराष्ट्राच्या दिशेने रवाना
थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक, खासदार सुप्रिया सुळे सिल्वर ओकवर दाखल
संजय राऊत यांच्या भेटीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे लिलावती रुग्णालयाकडे रवाना
संजय राऊत यांच्या भेटीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे लिलावती रुग्णालयाकडे रवाना
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असतानाही संजय राऊत ट्वीट केलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असतानाही संजय राऊत ट्वीट केलं आहे.
'मातोश्री'बाहेर रिपब्लिकन विकास आघाडी पक्षाने एक पोस्टर लावलं आहे. या पोस्टरमध्ये काल, आज आणि उद्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनेल आणि आम्ही सगळे शिवसेनेसोबत असल्याचं म्हटलं आहे. पोस्टरवर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो छापले आहेत.
दिल्लीत सकाळी 10 वाजता काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक, बैठकीनंतर अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार..
पार्श्वभूमी
मुंबई : मुंबईत सोमवारी (11 नोव्हेंबर) घडलेल्या वेगवान आणि नाट्यमट्य घडामोडीनंतर आज राज्यातील जनतेसमोर काय वाढून ठेवलंय हा प्रश्न आहे. राज्यपालांनी दिलेल्या वेळेत पुरेसं संख्याबळ नसल्याने शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही शिवसेनेप्रमाणे 24 तासांची मुदत दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार की राज्य राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल करणार हे पाहावं लागेल. आज कोणत्या घडामोडी घडणार यावर नजर टाकूया.
शिवसेनेची मातोश्री आणि हॉटेल रिट्रीटवर बैठक
पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे आणि राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. परंतु यानंतर रात्री अनेक घडामोडी घडल्या. शिवसेना नेते राजभवनावरुन थेट मातोश्रीवर गेले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पुढची भूमिका ठरवण्यासाठी ‘मातोश्री’वर दोन तास बैठक चालली. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, रामदास कदम, सचिन अहिर, आदेश बांदेकर उपस्थित होते. इथली बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे, रामदास कदम रात्री हॉटेल रिट्रीटमध्ये पोहोचले आणि शिवसेना आमदारांशी पुन्हा एकदा चर्चा केली.
राष्ट्रवादीची आज पुन्हा बैठक
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादीची आज सकाळी 11 वाजता काँग्रेससोबत बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीची सत्ता स्थापन करण्याबाबतची भूमिका स्पष्ट होईल. सत्ता स्थापन करण्यासाठी तीन पक्ष एकत्र येणं आवश्यक असल्याने, ही बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी आपली भूमिका शिवसेनेसमोर मांडेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.
काँग्रेसचे बडे नेते शरद पवारांना भेटणार
राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 वाजता नवी दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल हे काँग्रेसचे बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजपचं वेट अॅण्ड वॉचचं धोरण
भाजपच्या कोअर कमिटीची काल दिवसभरात दोन वेळा बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपने आता वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही, असं सांगण्यात येत आहे.
संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी
शिवसेनेची धडाडती तोफ अर्थात संजय राऊत यांची लीलावती रुग्णलयात अँजिओप्लास्टी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळू शकतो. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सकाळी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतील.
संबंधित बातम्या