Maharashtra Election Results 2019 Live Updates : मनसेची आघाडीवर आगपाखड
Maharashtra Election Results 2019 Live : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये कोण विजयी होणार, कोण आपला गड टिकवणार? कोणाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार याबाबत अचूक आणि सुपरफास्ट अपडेट्स
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
23 May 2019 06:57 PM
राज ठाकरेंचा फायदा उचलण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी, राज ठाकरेंनी तयार केलेल्या वातावरणात आघाडीचे कार्यकर्ते अपयशी, मनसे नेते संदिप देशपांडेंची प्रतिक्रिया, निवडणुकीत आघाडीला विखे-पाटील, मोहिते पाटीलांना सांभळता आलं नाही, मनसेची आघाडीवर आगपाखड

उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि रामदास आठवले 'मातोश्री'वर

नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव, भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर 50 हजार मतांच्या फरकाने विजयी
रायगड : सुनील तटकरेंच्या विजयानंतर शेकाप नेत्यांचा उन्माद, शेकाप नेते जयंत पाटील यांची लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण, जयंत पाटील यांनी कानशिलात लगावली, मतमोजणी केंद्रातील प्रकार
रायगड : सुनील तटकरेंच्या विजयानंतर शेकाप नेत्यांचा उन्माद, शेकाप नेते जयंत पाटील यांची लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण, जयंत पाटील यांनी कानशिलात लगावली, मतमोजणी केंद्रातील प्रकार
लातूरमध्ये भाजपचे सुधाकरराव शिंगारे एक लाखाच्या मताधिक्याने पुढे, अमरावतीत नवनीत कौर राणा यांना 39 हजारांची आघाडी, उस्मानाबादेत शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनाही मोठी लीड
*उत्तर मुंबई* गोपाळ शेट्टी (भाजप) 466731 उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) 154964 विद्यमान आमदार गोपाळ शेट्टी तब्बल 311767 मतांच्या फरकाने आघाडीवर
*उत्तर मुंबई* गोपाळ शेट्टी (भाजप) 466731 उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) 154964 विद्यमान आमदार गोपाळ शेट्टी तब्बल 311767 मतांच्या फरकाने आघाडीवर
धुळे : भाजप उमेदवार सुभाष भामरे यांना एक लाखाहून जास्त मताधिक्य, काँग्रेस उमेदवार कुणाल रोहिदास पाटील पराभवाच्या छायेत
धुळे : भाजप उमेदवार सुभाष भामरे यांना एक लाखाहून जास्त मताधिक्य, काँग्रेस उमेदवार कुणाल रोहिदास पाटील पराभवाच्या छायेत
भाजप प्रदेश कार्यालयात जनतेला नतमस्तक होऊन सर्व नेत्यांनी मिळालेलं यश समर्पित केलं
भाजप प्रदेश कार्यालयात जनतेला नतमस्तक होऊन सर्व नेत्यांनी मिळालेलं यश समर्पित केलं
भाजप प्रदेश कार्यालयात जनतेला नतमस्तक होऊन सर्व नेत्यांनी मिळालेलं यश समर्पित केलं
काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची ईव्हीएम विरोधात तक्रार
जळगाव : राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर एक लाखाहून अधिक मतांनी पिछाडीवर, भाजपचे उन्मेष पाटील यांना मोठी आघाडी
माढा: राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक यांच्यात काटे की टक्कर
दिंडोरीतून भाजपच्या भारती पवार आघाडीवर, धनराज महाले 30 हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवलं, गोपाळ शेट्टींचा आरोप, संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी उर्मिलांचा बळी दिला, पण फटका दोघांना बसेल, शेट्टींना विश्वास, माझी लढाई उर्मिला यांच्याशी नाही तर काँग्रेसशी असल्याचंही उत्तर
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना प्रताप पाटील चिखलीकर यांची तगडी फाईट
मावळमधून श्रीरंग बारणे यांची मोठी आघाडी, पार्थ पवार एक लाखाहून अधिक मतांनी पिछाडीवर
अहमदनगर : भाजप उमेदवार सुजय विखे 64 हजार मतांनी आघाडीवर बीड : भाजप उमेदवार प्रीतम मुंडे 37 हजार मतांनी आघाडीवर
महायुतीला 40 पेक्षा अधिक जागा निश्चित, गिरीश महाजन यांना विश्वास
अकोला- भाजपचे संजय धोत्रे 35,844 मतांनी आघाडीवर, प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर
अकोला- भाजपचे संजय धोत्रे 35,844 मतांनी आघाडीवर, प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर
अकोला- भाजपचे संजय धोत्रे 35,844 मतांनी आघाडीवर, प्रकाश आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर
सोलापूर : प्राथमिक कल भाजप : जय सिध्देश्वर महास्वामी - 61 हजार 846 मतं कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे - 44 हजार 134 मतं वंचित : प्रकाश आंबेडकर - 18 हजार 252 मतं
मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी, पार्थ पवार तब्बल 54 हजार मतांनी मागे
अमरावती :
तिसऱ्या फेरीनंतर अपडेट
आनंदराव अडसूळ (महायुती) - 67 हजार 340 मतं
नवनीत राणा (महाआघाडी) - 63 हजार 109 मतं
मुंबईत युतीच्या उमेदवारांना मोठी आघाडी, कीर्तिकर 16 हजार मतांनी, तर अरविंद सावंत 17 हजार मतांनी पुढे
पार्थ पवार यांना तब्बल 44 हजार मतांची पिछाडी
मतमोजणी पहिली फेरी उत्तर मुंबई - एनडीए आघाडीवर भाजप - गोपाळ शेट्टी २६ हजार मतांनी आघाडीवर काँग्रेस - उर्मिला मातोंडकर
मतमोजणी पहिली फेरी उत्तर मुंबई - एनडीए आघाडीवर भाजप - गोपाळ शेट्टी २६ हजार मतांनी आघाडीवर काँग्रेस - उर्मिला मातोंडकर
उत्तर-मध्य मुंबई मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर एनडीए आघाडीवर भाजप- पूनम महाजन : 18593 कांग्रेस - प्रिया दत्त :10530 पूनम महाजन 8063 मतांनी पुढे
पहिल्या फेरीतील मतमोजणी उत्तर-पश्चिम मुंबई - एनडीए आघाडीवर शिवसेना - गजानन किर्तिकर ५५०० मतांनी पुढे काँग्रेस - संजय निरूपम
महाआघाडीची विभागनिहाय आघाडी
मुंबई - 0/6
कोकण-ठाणे - 1/6
मराठवाडा - 0/8
विदर्भ - 0/10
पश्चिम महाराष्ट्र - 3/10
उत्तर महाराष्ट्र - 3/8
महायुतीची विभागनिहाय आघाडी मुंबई - 6/6 कोकण-ठाणे - 5/6 मराठवाडा - 7/8 विदर्भ - 10/10 पश्चिम महाराष्ट्र - 8/10 उत्तर महाराष्ट्र - 3/8
विदर्भात दहाही जागांवर भाजप-शिवसेना युती आघाडीवर
ठाणे : शिवसेनेच्या राजन विचारे यांना पहिल्या फेरीनंतर 13 हजाराची लीड, आघाडीचे आनंद परांजपे पिछाडीवर
मावळमध्ये पार्थ पवार ९ हजार मतांनी पिछाडीवर
प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर दोन्ही जागांवरुन पिछाडीवर
औरंगाबादेत चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर, इम्तियाल जलील चार हजार मतांनी पुढे
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे ८ हजार मतांनी पिछाडीवर
पवार कुटुंबाला धक्का, सुप्रिया सुळे 8 हजार मतांनी, तर पार्थ पवार 9 हजार मतांनी मागे
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आघाडीवर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मागे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आघाडीवर
पहिली फेरी पूर्ण, ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे 5 हजार मतांनी उमेदवार आघाडीवर
पोस्टल मतदानाची आकडेवारी - सकाळी ९ वाजता उत्तर मुंबई - एनडीए आघाडीवर भाजप - गोपाळ शेट्टी काँग्रेस - उर्मिला मातोंडकर एकूण पोस्टल मतांची संख्या १९०६
पुण्यात मतमोजणी थांबवली, ईव्हीएमला व्यवस्थित सील नसल्याचा आरोप करत काँग्रेसचा आक्षेप
औरंगाबादमध्ये वंचितचे इम्तियाज जलील पुढे, रायगडमध्ये सुनील तटकरेही आघाडीवर
उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर बारा हजार मतांनी आघाडीवर
नागपुरात नितीन गडकरी, धुळ्यात सुभाष भामरे पुढे, सुजय विखे यांनाही पुन्हा आघाडी, नंदुरबारमधून हीना गावित मागे
नागपुरात नितीन गडकरी, धुळ्यात सुभाष भामरे पुढे, सुजय विखे यांनाही पुन्हा आघाडी, नंदुरबारमधून हीना गावित मागे
मुंबईत सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर, तीन शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार पुढे
नाशिकमधून हेमंत गोडसे पुढे, तर समीर भुजबळ मागे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर, मावळमधून पार्थ पवार पिछाडीवर, तर श्रीरंग बारणे पुढे
हातकणंगलेतून राजू शेट्टी यांना पुन्हा आघाडी
उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी आघाडीवर, उर्मिला मातोंडकरला पिछाडी
महाराष्ट्रात आघाडीवरील उमेदवार
माढा - संजय शिंदे
सोलापूर - सुशिल कुमार शिंदे
नांदेड - अशोक चव्हाण
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
कोल्हापूर - संजय मंडलिक
सिंधुदुर्ग - विनायक राऊत
हातकणंगले - धैर्यशील माने
अमरावती - आनंदराव अडसूळ
शिरुर - अमोल कोल्हे
माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे, सोलापुरात काँग्रेस सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
हातकणंगलेमध्ये स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टीू पिछाडीवर
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आघाडीवर
नागपुरात मतमोजणी थांबवण्याची मागणी, काँग्रेसकडून ईव्हीएमला आक्षेप
आतापर्यंतचे कल भाजप - 12 शिवसेना - 03 काँग्रेस - 06 राष्ट्रवादी - 03
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेना उमेदवार विनायक राऊत एक हजार मतांनी आघाडीवर
महाराष्ट्रात अकरा जागांचे कल हाती, सात जागांवर भाजप पुढे, कोल्हापूरसह दोन जागांवर शिवसेना आघाडीवर, नांदेडसह दोन जागांवर काँग्रेसला आघाडी
कोल्हापुरात शिवसेना आघाडीवर, राष्ट्रवादीला पिछाडी
महाराष्ट्रात 3 जागांवर भाजपची आघाडी तर नांदेडमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण आघाडीवर
महाराष्ट्रात 3 जागांवर भाजपची आघाडी तर नांदेडमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण आघाडीवर
मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने
मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने
अमरावती : नवनीत कौर राणा यांना विजयाची खात्री
अमरावती : नवनीत कौर राणा यांना विजयाची खात्री
अमरावती : नवनीत कौर राणा यांना विजयाची खात्री
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं कुटुंबीयांकडून औक्षण
जालना : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं कुटुंबीयांकडून औक्षण
निवडणूक मतमोजणीसाठी सुरक्षाव्यवस्था काय? पोलिस अधिकारी रश्मी करंदीकर यांची माहिती
निवडणूक मतमोजणीसाठी सुरक्षाव्यवस्था काय? पोलिस अधिकारी रश्मी करंदीकर यांची माहिती
चंद्रपूर : भाजप उमेदवार आणि मंत्री हंसराज अहिर यांना विजयाचा विश्वास
चंद्रपूर : भाजप उमेदवार आणि मंत्री हंसराज अहिर यांना विजयाचा विश्वास
कल्याणमध्ये मतमोजणीपूर्वीच भाजपची बॅनरबाजी, युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या विजयाचे बॅनर, तर पिंपरीत अमोल कोल्हे खासदार झाल्याचे फ्लेक्स कार्यकर्त्यांनी झळकवले
कल्याणमध्ये मतमोजणीपूर्वीच भाजपची बॅनरबाजी, युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या विजयाचे बॅनर, तर पिंपरीत अमोल कोल्हे खासदार झाल्याचे फ्लेक्स कार्यकर्त्यांनी झळकवले
बारामतीतून भाजप उमेदवार कांचन कुल निवडणूक निकालापूर्वी सारसबागेत गणपतीच्या दर्शनाला
कुठला नेता पास, कुठला नापास? कोण गड टिकवणार? कोणाच्या बालेकिल्ल्याला लागणार सुरुंग? 'एबीपी माझा'वर सर्वात जलद आणि अचूक निकाल पाहा, न्यूजरुममधील भव्य पडद्यावर दिवसभर
पार्श्वभूमी
मुंबई : 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 543 पैकी 542 जागांचे निकाल जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
देशात पहिल्यांदाच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी होणार असल्याने अंतिम निकाल लागण्यासाठी गुरुवारची मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतचा वेळ लागण्याची शक्यता असली तरी निकालाचा कल दुपारपर्यंत समोर येईल.
बहुतांश एक्झिट पोलनी वर्तवलेल्या अंदाजांमुळे भाजप आणि रालोआमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-रालोआने दुसऱ्यांदा पूर्ण बहुमतासह सत्तेत परतण्याची जय्यत तयारी केली आहे.
महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये एकूण 60.80 टक्के मतदान झालं. म्हणजेच एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 592 मतदारांपैकी 5 कोटी 38 लाख 45 हजार 197 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यावेळी इथे निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार, निवडणूक एजंट, मोजणी एजंट उपस्थित असतील. शिवाय मतमोजणीची व्हिडीओग्राफीही होईल.
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची मोजणी कशी होणार?
लोकसभा मतदारसंघनिहाय 22 पासून 40 पर्यंत मतमोजणीचा ईव्हीएम फेऱ्या होणार आहेत. ईव्हीएमची एक फेरी पूर्ण होण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागेल. यानंतर व्हीव्हीपॅटचा मोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 650 आणि जास्तीत जास्त 1250 मतदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघातल्या 30 व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.
चिठ्ठ्या टाकून व्हीव्हीपॅटची निवड होईल. व्हीव्हीपॅटचा एका मशिनच्या मोजणीला 45 मिनिटांचा कालावधी लागेल. उमेदवाराने आक्षेप घेतले तर हा कालावधी वाढेल. असा एकूण प्रत्यक्षात निकाल यायला 12 तासापासून 14 तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदानाची आकडेवारी
पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, आणि यवतमाळ-वाशिम या सात जागांसाठी 63.04 टक्के मतदान झालं.
गडचिरोलीत सर्वाधिक 71.98 टक्के तर नागपूरमध्ये सर्वात कमी 54.74 टक्के मतदान झालं. या टप्प्यात 1 कोटी 30 लाख 35 हजार 335 मतदारांपैकी 82 लाख 17 हजार 609 मतदारांनी आपला हक्क बजावला
दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर हे 10 मतदारसंघ होते. इथे 62.88 टक्के मतदान झालं.
हिंगोलीत सर्वाधिक 66.52 तर सोलापुरात सर्वात कमी 58.45 टक्के मतदान झालं. या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार 472 मतदारांपैकी 1 कोटी 16 लाख 61 हजार 830 मतदारांनी आपला हक्क बजावला
तिसरा टप्पा
तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले हे 14 मतदारासंघ होते. या जागांवर 62.36 टक्के मतदानाची नोंद झाली.
कोल्हापुरात सर्वाधिक 70.70 टक्के मतदानाची नोंद झाली तर पुण्यात सर्वात कमी 49.84 टक्के मतदान झालं. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 945 मतदारांपैकी 1 कोटी 60 लाख 81 हजार 856 मतदारांनी मतदान केलं.
चौथा टप्पा
चौथ्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 जागांसाठी 57.33 टक्के मतदान झालं.
नंदुरबारमध्ये सर्वाधिक 68.33 टक्के मतदानाची नोंद झाली तर कल्याणमध्ये सर्वात कमी 45.28 टक्के मतदानाची नोंद. या टप्प्यात 3 कोटी 11 लाख 92 हजार 840 मतदारांपैकी 1 कोटी 78 लाख 83 हजार 902 मतदारांनी आपला हक्क बजावला.
6 मे, पाचवा टप्पा : 7 राज्यात 51 मतदारसंघासाठी 64.16 टक्के मतदान झालं
12 मे सहावा टप्पा : 7 राज्यात 59 जागांसाठी 64.58 टक्के मतदान झालं
19 मे सातवा टप्पा : 8 राज्यात 59 जागांसाठी 65.16 टक्के मतदान झालं