Lok Sabha Election LIVE BLOG | गडचिरोलीतील चार केंद्रांवरील मतदान पुढे ढकललं

नक्षलवादाची झळ सोसणारा गडचिरोली-चिमूर हा लोकसभा मतदारसंघ अनुसचित जमातीसाठी राखीव आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Apr 2019 11:32 PM

पार्श्वभूमी

मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी मतदान होणार आहे.महाराष्ट्रात...More

चार महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन वर्ध्यातील दाम्पत्याने मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणं एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी शेख दाम्पत्याने पूर्ण केली. त्यामुळे 5 वर्षातून एकदा होणाऱ्या या उत्सवात सहभागी होत मतदानाचा हक्क त्यांनी बजावून दाम्पत्याने आई-वडिलांसह मतदानाचं कर्तव्यही पार पाडलं. जिल्हा परिषद येथे चार महिन्याच्या चिमुकलीला घेऊन येत त्यांनी मतदान केले. आफ्रिन शेख असे या महिलेचे नाव असून शहाबाज असे मुलीच्या वडिलांचे नाव आहे. सहकुटुंब 42 अंश सल्सिअस तापमानात या दाम्पत्याने चिमुकलीसह येत मतदान केलं.