LIVE RAIN UPDATE | मुंबईसह उपनगरातील सर्व शाळांना उद्या (05 ऑगस्ट) सुट्टी

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं, सांगली, सातारा, नंदुरबारमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने मुंबईत सीएसएमटी ते वाशी रेल्वेसेवा बंद आहे. तर कल्याण आणि बदलापुरात रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने अंबरनाथपासून कर्जतकडे जाणारी लोकल वाहतूकही बंद आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Aug 2019 09:41 PM
मुंबईसह उपनगरातील सर्व शाळांना उद्या (05 ऑगस्ट) सुट्टी :
हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी
कोल्हापूर : राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले, नदीपात्रात प्रतिसेकंद 11400 क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच, भोगावती, पंचगंगा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
सीएसएमटी-ठाणे लोकल वाहतूक तब्बल 12 तासांनी पूर्ववत, सायन स्थानकात पाणी साचल्याने ठप्प झालेली वाहतूक, हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्पच
ठाणे : कल्याण-कर्जत रेल्वे वाहतूक दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता, सिग्नस यंत्रणा पूर्णपणे पाण्यात, दुरुस्तीसाठी किमान दोन दिवस लागण्याची शक्यता
ठाणे : कल्याण-कर्जत रेल्वे वाहतूक दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता, सिग्नस यंत्रणा पूर्णपणे पाण्यात, दुरुस्तीसाठी किमान दोन दिवस लागण्याची शक्यता
पुणे : जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या (5 ऑगस्ट) सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा निर्णय
पुणे : जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या (5 ऑगस्ट) सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा निर्णय
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे विस्कळीत, पेणजवळ रेल्वे मार्गावर दरड कोसळली, रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा
पूर बघण्यासाठी गर्दी केल्यास होणार गुन्हे दाखल, नाशकात पोलिसांचा मनाई आदेश
वसईच्या मिठागरात चारशे कुंटुंब अडकली, दोनशे नागरिकांना बाहेर काढण्यात यश

नंदुरबार : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मुसळधार पाऊस, सातपायरी, काळापाणी घाटात दरळ कोसळली, राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळचा संपर्क तुटला, परिसरात मुसळधार पाऊस पर्यटक अडकले, सुट्टीचे दिवस असल्याने मोठ्या संख्येत पर्यटक अडकले असल्याची माहिती
'रात्रीस खेळ चाले'वाड्याबाहेर पाणीच पाणी, मालिकेचे आऊटडोअर चित्रिकरण रद्द
कल्याण मधील शहाड ब्रिज परिसरात मुरबाड रोडवर सहा फुटांपेक्षा अधिक पाणी वाढल्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
नाशिक | त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पश्चिम द्वारातून पाणी मंदिर परिसरात शिरले, नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर वाढला
पालघर : महाराष्ट्राच्या सीमेवरील गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यात सरीगाम येथे मुसळधार पावसाने अनेक नागरिकांच्या घरात शिरले पाणी,
तर फणसा, पुनाट, मोहन गाम ,दमन यांना जोडणारा रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम होऊन वाहनांच्या रांगा लागल्या
तळोदा तालुक्यात पूर स्थिती धवलीविहिर येथील नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, बोरद पुनर्वसन वसाहतीत पाणी शिरले, तळोदा शहरातील सकळ भागात साचले पाणी
कुर्ला बैल बाजारजवळील क्रांतीनगर येथील रहिवाशांना काल रात्री पासूनच बचाव कार्य सुरु, क्रांतीनगरच्या घरांमध्ये तीन ते सहा फूट पाणी शिरलं, रहिवाशांचे हाल
पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पाणी शिरलं, रहिवासी अकडले, पोलिस आणि अग्निशामन दलाने जवळपास 70 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढलं
वसई : वसईत पुराचा पहिला बळी, मोरी गावात 14 वर्षांचा पावन प्रजापती नावाचा मुलगा वाहून गेला, शोधकार्य सुरू , वसई पश्चिमपट्टितील कामण, साराजामोरी, मोरी, नागले या गावात पूरसदृश्य परिस्थिती
पिंपरी | वाकड येथे नदी लगत असलेल्या लेबर कॅम्पमध्ये मुळा नदीच्या प्रवाहात दोघे अडकले, पवनानगर परिसरातील एका बंगल्यातील 7 ते 8 लोक अडकले , बचावकार्य सुरू
मुळा नदीच्या प्रवाहात दोघे अडकले. वाकड येथे नदी लगत असलेल्या लेबर कॅम्पमध्ये मजूर झोपलेले होते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने सर्व मजूर बाहेर आले, पण अडकलेले हे दोघे झोपूनच राहिले. नंतर त्या झोपडीला पाण्याने चार ही बाजूने वेढले, तेंव्हा हे दोघे पत्राच्या झोपडीवर जाऊन बसलेत. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय, त्याने सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू.
पश्चिम रेल्वेला देखील पावसाचा फटका, वसई-विरार दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी ट्रॅकवर,
सर्व लोकल्स आणि एक्सप्रेस धीम्या मार्गावर वळवल्या,

जलद मार्ग केला बंद,

15 ते 20 च्या स्पीडने गाड्या सुरू
सांगलीत कृष्णां नदी पात्राने अखेर इशारा पातळी ओलांडली आहे. आज पहाटे आयर्विन पुलाजवळ 40 फुटावर पाणी पातळी पोहोचली आहे. यामुळे सांगलीला पुराचा धोका वाढला आहे. कोयना आणि चांदोली धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सातत्याने सुरू आहे.
भिवंडी : भिवंडी शहरात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने कामवारी नदीची पातळी वाढली असून नदी दुथडी वाहत आहे. भिवंडी शहरात अनेक ठिकाणी घरात, दुकानात पाणी शिरलं आहे.
भिवंडी : भिवंडी शहरात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने कामवारी नदीची पातळी वाढली असून नदी दुथडी वाहत आहे. भिवंडी शहरात अनेक ठिकाणी घरात, दुकानात पाणी शिरलं आहे.
साताऱ्यातील संगम माहुलीला आलेल्या नदीच्या पुराचा देवांनाही फटका, संगम माहुली येथील असलेली शंकराची मुर्ती नदीच्या पुरात वाहून जाऊ नये म्हणून रस्सीने बांधली
कसारा-मुंबई मार्गावर पाणी भरल्याने नाशिक - मुंबई रेल्वेसेवा ठप्प
नंदुरबारच्या नवापूर शहरातील रंगावली नदीला पूर आलाय, त्यामुळे नागपूर सुरत महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता, पुरामुळे दोन लहान पूल पाण्याखाली , तर महामार्गावरील पूल पाण्याखाली जाण्यासाठी फक्त एक फुटाचे अंतर बाकी
नंदुरबारच्या नवापूर शहरातील रंगावली नदीला पूर आलाय, त्यामुळे नागपूर सुरत महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता, पुरामुळे दोन लहान पूल पाण्याखाली , तर महामार्गावरील पूल पाण्याखाली जाण्यासाठी फक्त एक फुटाचे अंतर बाकी
कोयणा धरणाचे दरवाजे सहा फुटांवर, पावसाचा जोर कायम,
धरणातून 41 हजार क्युसेस पाण्याचा नदीपात्रात विसर्ग,
कोयणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली,
आणखी दरवाजे वर उचलणार,
कोयाणा धरणात 94 हजार क्युसेसने पाण्याची आवक
नालासोपारा रेल्वे स्थानकावर ट्रॅकवर साचलं पाणी
घाट परिसरात मूसळधार पाऊस सुरु असल्याने कसारा घाटात रेल्वे ट्रॅकवर पाणी, ट्रेन रेल्वेस्थानकात उभ्या ,
दुरंतो इगतपुरीला तर सिंहगड कसाऱ्याला उभी
गोरेगाव, दहिसरच्या रस्त्यांवर पाणी
महापारेषणच्या वसई येथील 100MVA उपकेंद्रात पाण्याची पातळी वाढली, सुरक्षेच्या कारणास्तव सबस्टेशनमधील विद्युतयंत्रणा बंद, वसई, गिरीज, संदोर, कौलार, नवघर औद्योगिक वसाहत, सातीवले औद्योगिक वसाहत, अग्रवाल औद्योगिक वसाहत, सनसिटी, वसई पश्चिम, मानवेलपाडा परिसर अंधारात
दुरंतो एक्सप्रेस तीन तासापासून इगतपुरी स्टेशनवर अडकली
दुसऱ्या दिवशीही कोसळधार, कल्याण-कर्जत आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद

पार्श्वभूमी

मुंबई : मुंबई, ठाणे, कल्याण परिसरात रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. काल सकाळपासून सुरु झालेल्या पावसानं अद्याप विश्रांती घेतलेली नाही. कुर्ला, सायन, सांताक्रूझ भागातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. जोरदार पावसाचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे. हार्बर मार्गावरची रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. वाशी ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागातही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी याचा लोकलसेवेवर परिणाम झालाय. बदलापूर आणि कल्याणमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आलंय. त्यामुळे अंबरनाथमधून कर्जतकडे जाणारी लोकल वाहतूक सध्या बंद आहे.

रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुलुंडमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आताही मुलुंडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे.  सायनच्या गांधी मार्केटमधल्या रस्तावर पाणी साचलंय. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे.

भिवंडीतील भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली 

भिवंडीतील भातसा नदीवरील वालकस पूल पाण्याखाली गेल्यामुळे वालकस, बेहरे, कोशिंबी, वावेघर या चार गावातील हजारो नागरिकांचा संपर्क तुटलाय. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून खवडलीच्या दिशेने प्रवास करावा लागत आहे. तसेच, खडवली स्थानकापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पर्याय म्हणून जीव धोक्यात घालून रेल्वे रुळांवरुन नागरिकांना चालत जावे लागत आहे.



नाशिकमध्ये गोदावरी नदीला मोठा पूर

दुसरीकडे, नाशिकमध्ये गोदावरी नदीला मोठा पूर आल्यानं दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसंच गोदावरी नदीवरील रामसेतू पुलही पाण्याखाली गेला आहे. तर दुसरीकडं रामकुंडाच्या बाहेरील रस्त्यावर पाणी येऊन पोहोचलं असून, गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागतेय. तसंच परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.  गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या एका तरुणाला नागरिकांच्या मदतीनं वाचवण्यात यश आलंय. अमरधाम जवळील नदीपात्रात अडकलेल्या युवकाला साड्या, दोरीच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात यश आलं. नदीकिनारी फिरताना पाण्याचा अंदाज न आल्यानं हा तरुण नदीत वाहून जात होता. मात्र एका खांबाला धरल्यानं त्याचा जीव वाचला.

राज्यातली प्रमुख धरणं ओव्हरफ्लो

पावसाच्या जोरदार हजेरीमुळं राज्यातली प्रमुख धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. साताऱ्यातल्या कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. कोयना धरणातून जवळपास 2 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशकात देखील जोरदार पावसामुळं नांदूर मध्यमेश्वर धरण भरलं असून, प्रकल्पातून जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडण्यात आलंय. अर्थात याचा फायदा औरंगाबादला होणार आहे. मुंबईतला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि शहापूरमध्ये असलेल्या भातसा धरणातून देखील विसर्ग सुरू आहे. डोळ्याचे पारणे फेडणारी ही दृश्य आहेत.  तिकडे विदर्भात देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं भंडारा धरणातून पाणी सोडण्यात आलंय.

सिंधुदुर्गात किनारपट्टीला समुद्राच्या उधाणाचा फटका

जिल्ह्यातील किनारपट्टीला समुद्राच्या उधाणाचा फटका बसला आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड या तिन्ही तालुक्यात उधाणाचे पाणी किनारपट्टीलगत सकल भागात घुसले आहे.
देवगड तालुक्यातील मळई, विरवाडी, गिर्ये आणि आनंदवाडी आदी भागांत समुद्राच्या उधानाचे पाणी शिरले आहे. आनंदवाडी भागात बंदर प्रकल्पाचे भराव टाकण्याचे काम सुरू आहे. हा भराव समुद्रातील गाळ न काढता टाकण्यात येत असल्यामुळे समुद्राच्या उधानाचा पाणी यावर्षी अधिक प्रमाणात भरले आहे. समुद्राच्या उधानाचा पाणी किनाऱ्यावर आणून ठेवलेल्या नौकांपर्यंत व त्याठिकाणी असलेल्या मच्छिमारांच्या झोपड्यापर्यंत पोहचले.  काही प्रमाणात स्थानिक मच्छिमारांचे नुकसानही झाले आहे. आनंदवाडी येथील रहिवासी ज्योती वरडकर यांच्या घराला पाण्याने तीन बाजूने वेढले  असल्यामुळे त्यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे.  समुद्राच्या उधाणाचे पाणी किनारपट्टी शेजारी असलेल्या घरांमध्ये घुसल्यामुळे तसेच किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या नौकांपर्यंत पोहचल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व मच्छिमार हवालदिल झाले आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीला पूर

विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा कालपासून सुरु असलेल्या पावसामुळं ओसंडून वाहत आहे. काही दिवसांपूर्वी पुरेशा पावसाअभावी धबधबा कोरडाठाक पडला होता. मात्र, आता उमरखेड तालुक्यात 73 मिलीमीटर पाऊस झाल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय.  संततधार पावसामुळं यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीय. त्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्यावर मन मोहून टाकणारी दृश्य सध्या पाहायला मिळत आहेत.

 कराड तालुक्याचा इस्लामपूरशी संपर्क तुटला, कृष्णा नदीला पूर 
कृष्णा नदीवरील बहे(ता.वाळवा) येथील पुलावरुन होणारी वाहतूक शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर  हा पुल जुना असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा  निर्णय घेण्यात आला असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगीतले. यामुळे वाळवा तालुक्यातील काही गावांचा व कराड तालुक्याचा इस्लामपूरशी संपर्क तुटला आहे. जोरदार पावसामुळे व कोयणा धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने  सध्या कृष्णा नदीला पूर आला आहे. बहे येथील हा पुल  जुना झाल्याने पुरामुळे पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणुन हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  यामुळे नरसिंहपूर , शिरटे, येडेमच्छिंद्र, कोळे, लवंडमाची या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.