LIVE BLOG : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
08 Jul 2019 11:09 PM
मुंबई : यावर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार, सूत्रांची माहिती
मुंबई : रिक्षाचालकांचा उद्याचा प्रस्तावित संप मागे, ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांची माहिती, प्रवाशांची गैरसोय टाळण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर निर्णय
ठाणे : विविध मागण्यांसाठी ठाणे ऑटो मेन्स रिक्षा युनियन उद्या होणाऱ्या संपात सहभागी होणार, मात्र रिक्षा बंद न ठेवता काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार, राज्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय
'प्रकल्प जरी लोकहिताचा असला तरी पर्यावरणाचं नुकसान अटळ'. मुंबई मेट्रोच्या २ए आणि २बी या प्रकल्पांमुळे पश्चिम उपनगरांतील खाडी परिसराचं नुकसान होणारच #MCZMA ची हायकोर्टात भुमिका. पश्चिम उपनगराच्या ३ हेक्टरवरील ८६ खारफुटी तोडण्याच्या परवानगीसाठी #MMRDA हायकोर्टात
CSMT पूल दुर्घटना : नीरज देसाईचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला, पूल कमकुवत झाल्याची कल्पना असतानाही त्याच्या वापरास परवानगी दिल्याचा देसाईवर आरोप, 14 मार्चच्या दुर्घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर 33 जण जखमी
मुंबई : बेस्ट बसचे किमान प्रवास भाडे आता फक्त पाच रुपयांवर, बेस्टच्या भाडेकपातीच्या प्रस्तावाला राज्य शासनाची मान्यता, राज्य शासनाचं परिपत्रक जारी, उद्यापासून होणार लागू
रत्नागिरी : चिपळूण तिवरे दुर्घटनेतील आणखी एक मृतदेह सापडला, मृतदेह 20 वर्षीय मुलीचा, ओळख अद्याप पटलेली नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला, दोघांमध्ये सोनिया गांधींच्या निवासस्थानी चर्चा सुरु
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली, डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक बंद, ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान दुपारी सव्वातीनच्या सुमारासची घटना, मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे ठिकठिकाणी थांबल्याची लोहमार्ग प्रशासनाची माहिती
मालेगाव ब्लास्टमध्ये वापरलेली साध्वी प्रज्ञाची मोटरसायकल साक्षीदारांनी ओळखली, कोर्टाखाली आणलेल्या टेम्पोत शिरून एनआयए कोर्टाच्या न्यायाधीशांनीही केली पुराव्यांची पाहणी, मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने पुरावे तपासताना न्यायाधीश विनोद पाडाळकरांच्या कपड्यांवर ग्रीसचे डाग

औरंगाबाद : औरंगाबादमधील वामन हरी पेठेतील सोनेचोरी प्रकरणात आणखी नऊ किलो सोनं चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वामन हरी पेठेमधून एकूण 67 किलो सोन्याची चोरी झाल्याचं ऑडिटमध्ये स्पष्ट झालं आहे. औरंगाबादच्या निराला बाजारमधील दुकानातून हे नऊ किलो सोनं चोरीला गेलं आहे. यातील आरोपी राजेंद्र जैन आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे 24 बँकेत तब्बल 72 अकाऊंट असल्याचंही उघड झालं आहे. राजेंद्र जैनकडे 14 चार चाकी गाड्या, शहरात तीन फ्लॅट आहेत. तसंच त्याने तीन बनावट कंपन्यांचीही स्थापना केली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज चिपळूणच्या तिवरे धरण दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली आणि घटनास्थळाची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा हीच मृतांना श्रद्धांजली असेल अशी मागणी ग्रामस्थांनी पवारांकडे केली. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टमधून एक लाखांची मदत देण्यात येणार आहे.
नर्सने मारहाण केल्याने अर्भकाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
,
सोलापूर महापालिका आरोग्य केंद्रामधील प्रकार
नर्सने मारहाण केल्याने अर्भकाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
,
सोलापूर महापालिका आरोग्य केंद्रामधील प्रकार
कर्नाटक मंत्रिमंडळातील 9 मंत्री राजीनाम्याच्या तयारीत, मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती
कोल्हापूर : कृष्णा-पंचगंगा संगमावर असलेल्या नृसिंहवाडी मंदिरात पुराचे पाणी शिरले, मंदिराच्या मांडवापर्यत पुराचे पाणी, पावसाचा जोर वाढला तर सायंकाळपर्यत मंदिराच्या गाभाऱ्यापर्यत पाणी जाण्याची शक्यता
मुंबई : पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत, मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं, हार्बर रेल्वे 10 मिनिटं, पश्चिम रेल्वे 5 मिनिटं उशिराने, तर ट्रान्सहार्बर वेळेवर धावत आहे
मुंबई : पावसामुळे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत, मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं, हार्बर रेल्वे 10 मिनिटं, पश्चिम रेल्वे 5 मिनिटं उशिराने, तर ट्रान्सहार्बर वेळेवर धावत आहे
लालबाग पुलावर मोठा अपघात टळला, ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक लालबाग पुलाच्या कठड्यावर, वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक हटवला, दादारहून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक हळू हळू पूर्वपदावर, सकाळी 8.30च्या सुमाराला झाला होता अपघात
मराठा आरक्षण प्रकरणी हायकोर्टाच्या निकालाविरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू होणार,12 जुलै सुनावणीची पहिली तारीख, हायकोर्टात आरक्षण टिकल्यानंतर सुप्रीम कोर्टात काय होणार याची उत्सुकता

चंद्रपूर : चिमुर तालुक्यातील मेटेपार शिवारात तीन वाघांचा मृत्यू, शेतशिवारातील नाल्याजवळ आढळले मृतदेह

मुंबई : राज्यातील अभियंत्यांचं लेखणी बंद आंदोलन स्थगित, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतर निर्णय
LIVE BLOG:कर्नाटकातल्या घडामोडीं, काय साधणार? शिवराजसिंग चौहान म्हणतात काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात पण तोडफोड करुन सरकार बनवणार नाही, कर्नाटकात वेगळी भूमिका आणि मध्यप्रदेशमध्ये दुसरी हे का?कर्नाटकातल्या राजकीय घडामोडींवर शिवसेनाचा सवाल
नागपूर - उमरेड रोडवर कुही फाट्याजवळ ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात, उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने धडक दिली, अपघातात तिघांचा मृत्यू, 8 प्रवाशी गंभीर जखमी, घटनास्थळी पोलिसांचे बचाव कार्य सुरु
नवी दिल्ली : गृहमंत्रालयात वरिष्ठ लेखा परीक्षा पदावर तैनात अधिकऱ्याची घरात घुसून हत्या, जैतपूर परिसरातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरु
नवी दिल्ली : गृहमंत्रालयात वरिष्ठ लेखा परीक्षा पदावर तैनात अधिकऱ्याची घरात घुसून हत्या, जैतपूर परिसरातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून तपास सुरु
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. रविवार दिवसभर नाशिक, कोल्हापूर, साताऱ्याला झोडपल्यानंतर पावसाची अल्पशी विश्रांती, गोदावरी, पंचगंगा आणि मुळासह अनेक नद्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती
2. गुजरातच्या वलसाड, वापी आणि वडोदरामध्ये पावसाचा कहर, मुंबई-अहमदाबाद मार्गावरची वाहतूक विस्कळीत, तर एमपीतही अनेक जिल्हे पाण्याखाली
3. मनसेप्रमुख राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, मुख्य निवडणूक आयुक्तांची घेणार भेट, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्याची करणार मागणी
4. दिल्लीवारीसाठी मिलिंद देवरांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, संजय निरुपमांचा गंभीर आरोप, तर ज्योतिरादित्य शिंदेंकडूनही सरचिटणीसपदाचा राजीनामा
5. कर्नाटकातल्या आमदारांचं वास्तव्य असलेल्या मुंबईतल्या सोफीटेल हॉटेलबाहेर काँग्रेसची निदर्शन, तर काँग्रेस जेडीएसचं सरकार कायम राहणार, सिद्धरमय्यांचा दावा
6. उद्यापासून राज्यभरातले 18 लाख रिक्षाचालक संपावर, ओला, उबरवर बंदी घालण्याची मागणी, हकीम समितीच्या शिफारशींसाठी उपसणार बंदचं हत्यार