LIVE UPDATE : 100 व्या मराठी नाट्य संमेलनासाठी जब्बार पटेल आणि मोहन जोशी रिंगणात
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
30 Sep 2019 11:42 PM
वर्धा : 2 ऑक्टोबरला काँग्रेस सेवादलाची सेवाग्रामात बैठक आणि पदयात्रा, या पदयात्रेला राहुल गांधी येणार होते मात्र अद्यापही राहुल गांधींचा दौरा नाही
,
राहुल गांधींचा दौरा रद्द झाल्याची शक्यता
आचारसंहिता पथकाची धडक कारवाई 20 लाख जप्त ; एका आठवड्यात दुसरी कार्यवाही करत 30 लाख जप्त
येवला विधानसभा मतदारसंघातून संभाजी पवार यांना शिवसेनेची उमेदवारी, छगन भुजबळ शिवसेना प्रवेश चर्चांना पूर्ण विराम
सोलापूर : तब्येत बरी नसल्याने बार्शीतून दिलीप सोपल यांचा AB फॉर्म तानाजी सावंत यांनी स्वीकारला, युतीकडून सोपल यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपचे राजेंद्र राऊत बंडखोरी करणार, राजेंद्र राऊत 4 तारखेला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ची उमेदवारांची पहिली यादी जाहीर
१. सोलापूर मध्य - कॉ. नरसय्या आडम
२. कळवण (अ.ज.) - कॉ. आ. जे. पी. गावीत
३. नाशिक पश्चिम - कॉ. डॉ. डी. एल. कराड
४. डहाणू (अ.ज.) - कॉ. विनोद निकोले
परतीच्या पाऊसाचा धुमाकूळ, जिल्ह्यात धुंवाधार पाऊस ,रस्त्यांना नाल्याचे स्वरूप, अनेक घरांचे पत्रे उडाले
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीला पंढरपूर , अक्कलकोट व फलटणची जागा
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीला पंढरपूर , अक्कलकोट व फलटणची जागा
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना तूर्तास दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास दिलेली मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचा दावा, पुणे जिल्हाधिकारी कोर्टाने आरोपपत्र दाखल करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीला आरोपींकडून हायकोर्टात आव्हान

मुंबई : शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, मुख्यमंत्र्यांकडून हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार : काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई : शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, मुख्यमंत्र्यांकडून हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार : काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 3 ऑक्टोबरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार, काँग्रेसकडून दक्षिण कराड इथून निवडणूक लढवणार
मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 3 ऑक्टोबरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार, काँग्रेसकडून दक्षिण कराड इथून निवडणूक लढवणार
उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाटण्याची शक्यता, वडाळा विधानसभा भाजपला जात असल्याने माजी महापौर श्रद्धा जाधव नाराज, श्रद्धा जाधव खासदार राहुल शेवाळेंसह 'मातोश्री'वर दाखल, वडाळा विधानसभा शिवनेच्या वाट्याला न आल्यास श्रद्धा जाधव बंडाच्या तयारीत, मात्र असं झाल्यास कालिदास कोळंबकरांचीही अडचण वाढणार
पुढच्या काही तासात शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता, प्रसिद्धी पत्रकाद्वारे निर्णय जाहीर होण्याची चिन्ह
पुढच्या काही तासात शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता, प्रसिद्धी पत्रकाद्वारे निर्णय जाहीर होण्याची चिन्ह
नवी दिल्ली : गुजरात दंगल पीडित बिल्किस बानो यांना 50 लाख रुपयांची भरपाई, नोकरी आणि घर देण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश, भरपाई आणि घर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत
धुळ्यामधील शिरपूरमधून विधानपरिषदेचे आमदार अमरीश पटेल भाजपमधे प्रवेश करण्याची शक्यता, आज गरवारे क्लबमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याची शक्यता
जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरुणाला उडवलं. अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतप्त जमावाने सावंतांच्या गाडीची तोडफोड केली. बार्शी तालुक्यातील शेलगाव इथे आज सकाळी हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी तानाजी सावंत गाडीत नव्हते. मी मुंबईला असून पुतण्या गाडी घेऊन बार्शीला जात होता. त्यावेळी अपघात झाल्याची माहिती मला मिळाली. गाडी माझ्या नावावर आहे, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली. दरम्यान, अपघातानंतर गाडीची नंबर प्लेट तोडून नेल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

विधानसभेला मनसे 150 जागा स्वबळावर लढणार, मनसे नेते अभिजीत पानसेंची माहिती, मुंबईतल्या वांद्र्यात आज इच्छुक उमेदवारांचा मेळावा, राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष
राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा आज भाजपमध्ये प्रवेश करणार, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये परळीत होणार पक्षप्रवेश
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याच्या निषेधार्त उमराने येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको, मुंबई-आग्रा महामार्ग जाम
आज फक्त गोपीचंद पडळकर यांचा भाजप प्रवेश, चर्चेतील इतर सहा काँग्रेस आमदारांना दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील नाही, सहा आमदारांचा आजचा प्रवेश बारगळण्याची शक्यता
उदयनराजे भोसले सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तर शिवेंद्रराजे विधानसभेसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरणार, उदयनराजेंची ट्विटरवरून घोषणा
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वयाच्या 78 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा, 300 हून अधिक सिनेमात साकारल्या होत्या विविध भूमिका
अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदारसंघात भाजपकडून गोपिचंद पडळकर निवडणूक लढण्याची शक्यता, सुत्रांची माहिती, गोपिचंद पडळकर आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1.युतीच्या घोषणेपूर्वीच सेना-भाजपला एबी फॉर्म वाटण्याची घाई, सेनेकडून 14 इच्छुकांना एबी फॉर्म, तर पहिली यादी जाहीर होताच भाजपही एबी फॉर्म वाटणार
2. शिवसेनेच्या पहिल्या संभाव्य यादीत आदित्य ठाकरेंचं नाव, वरळीमधून उमेदवारी जवळपास निश्चित, महाडेश्वर, केसरकर,भास्कर जाधवांचही नाव
3. पहिल्या 51 उमेदवारांच्या यादीत काँग्रेसकडून दिग्गजांना स्थान, बाळासाहेब थोरात,अमित देशमुख, प्रणिती शिंदेंची उमेदवारी कायम,भोकरमधून अशोक चव्हाणांना संधी
4. भालके, मेहेत्रेंसह काँग्रेसच्या 6 आमदारांचा भाजपात प्रवेश, पडळकरही भाजपवासी होणार, राणेंच्या भाजपप्रवेशासाठी गांधी जयंतीच्या मुहूर्ताची चर्चा
5.आज नवरात्रोत्सवाचा द्वितीयेचा दिवस, साडेतीन शक्तीपिठांवर भक्तांची मांदियाळी, राज्यभरात स्त्री शक्तीचा जागर
6.पावसानं उघडीप दिल्यानंतर माळशेज घाट धुक्यात हरपला, डोळ्याचे पारणे फेडणारी दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद