LIVE BLOG : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

दिवसभरातील घडामोडींचा सुपरफास्ट आढावा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jul 2019 11:07 PM
उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या चिमुकल्या दिव्यांश सिंहचा शोध थांबवला
48 तास उलटून गेल्यानंतरही दिव्यांश सापडला नाही
नाईलाजाने मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागाने शोधमोहिम थांबवली
#Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गरीब विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेतील पैशांवर माजी विद्यार्थ्यांचा डल्ला
3 लाख 46 हजार रुपये लुबाडले
दीड हजार बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने पैसे काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भारतात येण्याची शक्यता, 25 जुलै रोजी गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात शिरोमणी गुरुद्वारा कमिटीकडून इम्रान खान यांना आमंत्रण?
एसईबीसी प्रवर्गातील 13 टक्के आरक्षणानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातील नियुक्त्या जाहीर, मराठा आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवण्यात बांधकाम विभागाची आघाडी
नाशिक : जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकारीचे आदेश, मोठे मध्यम धरण प्रकल्प, लघु पाटबंधारे प्रकल्प, बंधाऱ्याची होणार तपासणी, गळती आहे की नाही याचा शोध घेणार, तीन अधिकाऱ्याकडे सोपवली जबाबदारी
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारला जाग, पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात समिती, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरच्या नऊ अधिकाऱ्यांची समिती
मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मुंबईतील नामांकित कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार, यामध्ये पहिला पसंतीक्रम मिळालेले 48 हजार 872 विद्यार्थी
मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मुंबईतील नामांकित कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार, यामध्ये पहिला पसंतीक्रम मिळालेले 48 हजार 872 विद्यार्थी
मुंबई : मराठी कलाकारांना एमएमआर रिजनमध्ये घर देणार, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची घोषणा, विरारमधील घरं मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांना मिळणार, तसंच पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिकमधल्या कलाकारांनाही (13/2) कायद्यानुसार घर देणार
कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे राजीनामे लटकले
,
बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुनावणी आता मंगळवारी

, मंगळवारपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
कर्नाटकातील बंडखोर आमदारांचे राजीनामे लटकले
,
बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुनावणी आता मंगळवारी

, मंगळवारपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
#MarathaReservation : मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही, राज्य सरकारला दोन आठवड्यात उत्तर देण्यासाठी सुप्रीम कोर्टाची नोटीस




महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा, अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला पूजेचा मान, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं साकडं

पार्श्वभूमी

 




    1. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा, अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला पूजेचा मान, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं साकडं



 




    1. आषाढी एकादशीनिमित्त पंढरीत वैष्णवांचा मेळा, विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या 10 किमीपर्यंत लांब रांगा तर वडाळ्याच्या प्रतिपंढरपुरात तावडेंच्या हस्ते पूजा



 




    1. आषाढीच्या मुहूर्तावर सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी, तर सर्व वैद्यकीय प्रवेशासाठी या वर्षांपासूनच मराठा आरक्षण लागू, हायकोर्टाचा दिलासा



 




    1. बंडखोरांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी वेळ घेणार, कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका, राजकीय नाट्य सुरूच राहणार



 




    1. पुणे, नाशिक आणि कोकणात मुसळधार, महत्त्वाची धरणं ओव्हरफ्लो, तर तहानलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पावासाच्या प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत



 




    1. इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवून फायनलमध्ये मारली धडक; अंतिम सामना न्यूझीलंडशी, विश्वचषकाला मिळणार नवा विजेता





 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.