LIVE UPDATE : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार, नारायण राणेंची माहिती

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Oct 2019 10:55 PM
मुंबई : कुलाबा विधानसभा मतदारसंघात प्रचाराला गालबोट, फणसवाडी परिसरात राहुल नार्वेकर आणि भाई जगताप आमने-सामने, दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले, एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने परिसरात तणाव
आदित्य ठाकरेंविरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणाऱ्या तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस, अभिजित बिचकुले, विश्राम पाडम आणि महेश खांडेकर यांना नोटीस, निश्चित केलेल्या दैनिक खर्च नोंद वह्या तपासणीस सादर केल्या नसल्याने बजावली नोटीस
पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कणकवलीतील 15 तारखेच्या सभेत स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याची नारायण राणेंची माहिती
भाजपमधून बंडखोरांची हकालपट्टी, चरण वाघमारे (तुमसर), गीता जैन (मीरा भाईंदर), बाळासाहेब ओव्हाळ (पिंपरी चिंचवड), दिलीप देशमुख (अहमदपूर, लातूर) यांची हकालपट्टी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या आदेशानुसार कारवाई
पंढरपूर : माळशिरसमध्ये भाजपला दणका, लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी एकत्र आलेल्या मोहिते पाटील कुटुंबात विधानसभेला पुन्हा फूट, डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचा आज मेळावा घेत राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांना पाठिंबा
पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकार्झुक यांना 2018 तर ऑस्ट्रियाचे लेखक पीटर हॅण्डके यांना 2019 मधला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर

पंजाब आणि महाराष्ट्र मल्टिस्टेट कोऑप बँक ही सहकार खात्याच्या निबंधकांकडे नोंदणी झालेली बँक आणि त्याचं नियमन रिझर्व बँकेमार्फत होत असल्यामुळे त्याचे व्यवहार केंद्र सरकारच्या अखत्यारित येत नाहीत. पीएमसी बँकेच्या संतप्त ठेवीदारांशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती.आज केंद्रीय अर्थ सचिव ग्रामविकास सचिवांची चर्चा करुन या गंभीर मुद्द्याची दखल घेतील. कोऑपरेटिव्ह बँकांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करण्याचीही सरकारची भूमिका असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिलीय. पीएमसी बँकेच्या ठेवीदारांच्या प्रश्नाबाबत आज सायंकाळी केंद्रीय अर्थमंत्र्यांची रिझर्व बँक गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी चर्चा होणार
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल, माळशिरसचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी नातेपुते होणार आहे सभा, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांनी केले मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
नवी मुंबई : अळ्यांमुळे वाहनचालकांची तारांबळ, सिवूड येथे झाडावरील किड्यांमुळे नागरिक त्रस्त, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या अंगावर किडे, अळ्या पडल्याने अंगावर लाल डाग
पीएमसी मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह बँक, केंद्र सरकारच्या अखत्यारीत त्याचा व्यवहार येत नाही : निर्मला सीतारमण
परभणी : सेलूत भाजपच्या महाजनादेश संकल्प सभेला सुरुवात,

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उपस्थिती , योगींच्या सभेला मोठी गर्दी
दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत ट्रॅक्टर घुसल्याने तीन ठार झाल्याची घटना कागवाड तालुक्यातील गणेशवाडी येथे बुधवारी रात्री घडली आहे.कृष्णा नदीत मूर्ती विसर्जन करण्यासाठी निघाले असताना मिरवणुकीतील ट्रॅक्टरला सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टर जमावात घुसला आणि तीन जण चिरडले.
पंढरपूरमध्ये रात्रीत मुसळधार पाऊस , सलग तीन तास पावसाने शहरात पाणीपाणी
ऐन दिवाळीत एस.टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले,
25 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन

पार्श्वभूमी

१. विधानसभेच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्रात, अमित शाहांच्या 4 तर योगी आदित्य़नाथ यांच्या 2  प्रचारसभा, मुख्य़मंत्री 6 तर उद्धव ठाकरे 4 सभांना संबोधणार

२. मुंबईतील सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ईडी, आघाडीबाबत राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष, मुसळधार पावसामुळे पुण्यातील कालची सभा रद्द

३. प्रचारासाठी अखेर राहुल गांधींना मुहूर्त मिळाला, 13 ऑक्टोबरला राहुल गांधींची मुंबईत सभा, तर सोनिया गांधींची राष्ट्रवादीसोबत संयुक्त रॅली,  सूत्रांची माहिती


४. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच ऑक्टोबरचा पगार, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, लोकलमध्ये वायफायही मिळणार


५. मुंबईत मिलन सबवेजवळ रेल्वे ट्रॅकजवळील कचऱ्याला आग तर वडाळ्यात झोपडीला आग लागून 6 जण गंभीर जखमी, आगरीपाड्यातही इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अग्नितांडव

६. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून दुसरा कसोटी सामना, पुण्यातल्या गहूंजे स्टेडियमवर होणाऱ्या मॅचवर पावसाचं सावट, 3 सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0नं सरशी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.