National Election Results Live Blog : लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Election Results 2019 Live : नरेंद्र मोदी 26 मे रोजी सत्ता स्थापनेचा दावा करणार
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 23 May 2019 08:15 PM

पार्श्वभूमी
मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सांगता आज 23 मे रोजी होणार आहे. देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की...More
मुंबई : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सांगता आज 23 मे रोजी होणार आहे. देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस 2014 मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणार? हे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.11 एप्रिल ते 19 मे दरम्यान लोकसभेच्या 542 जागांच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडली. या सात टप्प्यात 90.99 कोटी मतदारांपैकी जवळपास 67.11 टक्के मतदारांनी आपल्या मताचा वापर केला. देशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण 8040 उमेदवार मैदानात उतरले होते. त्यापैकी टॉप 10 श्रीमंत उमेदवारांची एकूण संपत्ती जवळपास 2,218 कोटी आहे.निवडणूक लढणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, अनेक केंद्रीय मंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.2019 लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये- 29 राज्य 7 केंद्रशासित प्रदेश- 39 दिवस चाललेली सात टप्प्यात पार पडलेली निवडणूक- 8040 नशीब आजमावणारे उमेदवार- तब्बल 91 कोटी 1 लाख मतदार, 47 कोटी 16 लाख पुरुष आणि 43 कोटी 84 लाख स्त्री मतदार तर 39 हजार तृतीयपंथी- 10 लाख 38 हजार 96 मतदान केंद्र- विक्रमी 67.10 टक्के मतदानAbp Result 2019 | एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकालांचे अपडेट्स कसे पाहाल?| ABP Majhaदेशात पहिल्यांदाच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी होणार असल्याने निकाल उशिरा येण्याची शक्यता आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटीही लावली असून सगळ्यांना याबाबत प्रशिक्षणही दिलं आहे. मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यावेळी इथे निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार, निवडणूक एजंट, मोजणी एजंट उपस्थित असतील. शिवाय मतमोजणीची व्हिडीओग्राफीही होईल.ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची मोजणी कशी होणार?लोकसभा मतदारसंघनिहाय 22 पासून 40 पर्यंत मतमोजणीचा ईव्हीएम फेऱ्या होणार आहेत.ईव्हीएमची एक फेरी पूर्ण होण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी लागेल.यानंतर व्हीव्हीपॅटचा मोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 650 आणि जास्तीत जास्त 1250 मतदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी. म्हणजे एकूण लोकसभा मतदारसंघातल्या 30 व्हीव्हीपॅटची मोजणी होईल.चिठ्ठ्या टाकून व्हीव्हीपॅटची निवड होईल. व्हीव्हीपॅटचा एका मशिनच्या मोजणीला 45 मिनिटांचा कालावधी लागेल. उमेदवाराने आक्षेप घेतले तर हा कालावधी वाढेल. असा एकूण प्रत्यक्षात निकाल यायला 12 तासापासून 14 तासांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.प्रादेशिक पक्षांमध्ये लढतही सार्वत्रिक निवडणूक असली तर काही राज्यांमध्ये मुख्य लढत प्रादेशिक पक्षांमध्ये आहे. काही राज्यात काँग्रेस आणि भाजप सामन्यातून बाहेर आहेत. उदाहरणार्थ तामिळनाडूमध्ये मुख्य सामना द्रमुक आणि अन्नाद्रमुक यांच्यात आहे. आंध्र प्रदेशात टीडीपी आणि वायएसआर यांच्यात मुख्य सामना आहे. तर तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्ष टीआरएस सत्तेत आहे.उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा यांचं महागठबंधन सत्ताधारी भाजपला आव्हान देत आहे.देशात सात टप्प्यात असं झालं मतदान11 एप्रिल, पहिला टप्पा : 20 राज्यात 91 मतदारसंघात 69.61 टक्के मतदान झालं18 एप्रिल, दुसरा टप्पा : 13 राज्यात 95 मतदारसंघात 69.44 टक्के मतदान झालं23 एप्रिल, तिसरा टप्पा : 15 राज्यात 117 जागांसाठी 68.40 टक्के मतदान झालं29 एप्रिल, चौथा टप्पा : 9 राज्यात 71 जागांसाठी 65.51 टक्के मतदान झालं6 मे, पाचवा टप्पा : 7 राज्यात 51 मतदारसंघासाठी 64.16 टक्के मतदान झालं12 मे सहावा टप्पा : 7 राज्यात 59 जागांसाठी 64.58 टक्के मतदान झालं19 मे सातवा टप्पा : 8 राज्यात 59 जागांसाठी 65.16 टक्के मतदान झालंसंबंधित बातम्याLoksabha Elections 2019 Results : मतदारसंघांचे राज्यनिहाय अचूक निकाल, कुठे आणि कसे मिळवाल?निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज, व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांच्या मोजणीमुळे निकाल उशीरात्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास बिगर भाजप सरकार स्थापण्याची विरोध पक्षांची तयारीलोकसभा निवडणूक निकाल : 'माझा'च्या खास डायरीतून निकालाबाबत दिग्गजांचे एक्सक्लुझिव्ह अंदाज