- मुख्यपृष्ठ
-
Election
-
निवडणूक
LIVE BLOG : सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला आग्रह : बाळासाहेब थोरात
LIVE BLOG : सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला आग्रह : बाळासाहेब थोरात
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
28 Sep 2019 09:48 PM
जुगार खेळणारे पोलीस 4 पोलीस कर्मचारी पकडले,
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी टाकली पोलीस वसाहतीत धाड
सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला आग्रह
मुंबई वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कांदिवली पूर्व या याठिकाणी समता नगर पोलिसांनी रात्री साडे 11 च्या सुमारास नाकाबंदी करून 1 करोड रुपयांची रोकड पकडली
पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नाही : अजित पवार
ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे मी राजीनामा दिला : अजित पवार
शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे मी व्यथित झालो : अजित पवार
शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे मी व्यथित झालो : अजित पवार
ठेवीच्या रकमेपेक्षा मोठ्या रकमेचा घोटाळा कसा?
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचा सवाल
माझ्या राजीनाम्यामुळे सर्व नेते व्यथित झाले, मी त्यांची माफी मागतो : अजित पवार
मी माझ्या विवेकबुद्धीला स्मरुन राजीनामा दिला : अजित पवार
मी माझ्या सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या भावना दुखावल्या : अजित पवार
70 हजार कोटींचा कथित घोटाळा देखील खोटा आरोप : अजित पवार
पत्रकार परिषदेसाठी अजित पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. अजित पवार यांची पत्रकार परिषद दुपारी 3.30 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरला होणार, विधानसभा निवडणुकीची आचार संहिता असल्याने सदर पत्रकार परिषदेच्या जागेत बदल करण्यात आला, धनंजय मुंडे यांचे शासकीय निवासस्थान असल्याने येथे राजकीय पत्रकार परिषद घेता येत नाहीत
भंडारा : तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या विनयभंगप्रकरणी अटक, 18 सप्टेंबरला विनयभंगाचा गुन्हा दाखल
अहमदाबाद : अमित शाह यांचा गुजरात क्रिकेट असोसिएशनचा राजीनामा, अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह सह सचिव पदी कायम, अध्यक्षपदासाठी धनराज नाथवानी यांच्या नावाची चर्चा
मुंबई : सिल्वर ओक येथे केवळ पवार कुटुंबिय उपस्थित, सुप्रिया सुळे, अजित पवार, श्रीनिवास पवार यांच्यात बैठक, कौटुंबिक चर्चा सुरु, बाहेरचे कुणीही बैठकीत नाही
अजित पवार ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पोहोचले, अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवासही सिल्व्हर ओक येथे पोहोचले
BIG BREAKING : LIVE : अजित पवार मुंबईत असण्याची शक्यता, खात्रीशीर सूत्रांची माहिती
अजित पवार थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अकुंश काकडे यांची 'एबीपी माझा'ला माहिती
जालना : 5 वर्षाच्या मुलासह रेल्वेखाली उडी घेऊन एकाची आत्महत्या, जालना शहरालगत सिरसवाडी जवळील घटना, मयतांची नावे सय्यद सुलतान (30 वर्ष) सय्यद अनिस (5 वर्ष)
अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर रात्री उशीरा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक, बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती, बैठकीत अजित पवारांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती, बैठकीला शरद पवार अनुपस्थित
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. गलिच्छ राजकारणामुळे अस्वस्थ होत अजित पवारांनी राजीनामा दिल्याचा शरद पवारांचा दावा, तर अजितदादांनी मुलांना राजकारण सोडण्याचा सल्ला दिल्याचीही माहिती
2. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाही, गृहकलहामुळं अजितदादांनी राजीनामा दिल्याच्या चर्चेचं शरद पवारांकडून खंडन, माझाचं शब्द अंतिम असल्याच पवारांकडून स्पष्ट
3. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक, शदर पवार मात्र बैठकीला गैरहजर.
4. निवडणुकीच्या तोंडावर लक्ष वेधण्यात पवार यशस्वी, ईडीच्या विनंतीनंतर चौकशीला जाण्याचा निर्णय पवारांकडून रद्द, राष्ट्रवादीचा इव्हेंट असल्याची भाजपची टीका
5. भारतानं जगाला बुद्ध दिला युद्ध नाही, संयुक्ता राष्ट्राच्या व्यासपीठावरून मोदींकडून पाकला सूचक इशारा, भारताच्या कामगिरीचाही पंतप्रधानांनी वाचला पाढा
6. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या बेस्ट ऑफ लता पुस्तकाचं अमित शाहांच्या हस्ते प्रकाशन, तर आज दिवसभर एबीपी माझावर सुरेल कार्यक्रमांची मेजवानी