LIVE UPDATE : मनसेची पहिली यादी जाहीर मनसेच्या पहिल्या यादीत 27 उमेदवारांची नावं घोषित

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Oct 2019 10:43 PM
कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी
विधानसभेसाठी काँग्रेसची 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
अनिल मटाले यांचा नाशिक मनसे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा, पक्षालाही दिली सोडचिट्ठी. नाशिक पश्चिम मधून होते ईच्छुक मात्र शिवसेनेतून मनसेत प्रवेश केलेल्या दिलीप दातीर यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने मटाले नाराज. राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून मटाले यांची ओळख
मनसेची पहिली यादी जाहीर, मनसेच्या पहिल्या यादीत 27 उमेदवारांची नावं घोषित
मनसेची पहिली यादी जाहीर, मनसेच्या पहिल्या यादीत 27 उमेदवारांची नावं घोषित
ठाणे : शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरण्यास जाताना त्यांच्या सोबत व्याही रणजीत पाटील तर होतेच पण त्यांची सून देखील आज या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका असलेल्या प्रतीशा सरनाईक आणि अनाहीता सरनाईक ही सासू-सूनेची जोडगोळी एकत्र प्रचार करताना आज दिसली.

विधानसभा निवडणुकीत भाजपचं पुन्हा एकदा मोदी कार्ड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण 10 प्रचार सभा तर अमित शाह यांच्या एकूण 20 सभांचे नियोजन
शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 164 तर शिवसेना 124 जागांवर निवडणूक लढवणार, मित्रपक्षांसाठी भाजप त्यांच्या कोट्यातून जागा सोडणार
शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप 164 तर शिवसेना 124 जागांवर निवडणूक लढवणार, मित्रपक्षांसाठी भाजप त्यांच्या कोट्यातून जागा सोडणार
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यलयात भाजप कार्यकर्त्यांचा गोधळ, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या फॉर्म भरायला जाणाऱ्या प्रवीण दरेकर यांना भाजप कार्यकर्त्यांनी अडवले, युतीची उमेदवारी प्रकाश सुर्वेंना मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तसेच प्रवीण दरेकरकडे नाराजीचा सूर
विधानसभा निवडणूक 2019, भाजपची पहिली यादी दुपारी 12.45 वाजता भाजप मुख्यालयात जाहीर होणार
राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलंबित झालेले आमदार रमेश कदम यांना हायकोर्टाकडून तात्पूरता जामीन मंजूर. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाकडून दिलासा. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठाचा निर्णय
सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी जाहीर, उदयनराजे भोसलेंविरोधात श्रीनिवास पाटील तीन तारखेला उमेदवारी अर्ज भरणार
सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी जाहीर, उदयनराजे भोसलेंविरोधात श्रीनिवास पाटील तीन तारखेला उमेदवारी अर्ज भरणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, 2014 च्या प्रतीज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप, खटला चालवण्याचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, 2014 च्या प्रतीज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप, खटला चालवण्याचे आदेश
धुळे : मनसेत प्रवेश केलेले नरेंद्र धर्मा पाटील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या जयकुमार रावल यांच्याविरोधात निवडणूक लढवणार, नरेंद्र पाटील 3 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार
धुळे : मनसेत प्रवेश केलेले नरेंद्र धर्मा पाटील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या जयकुमार रावल यांच्याविरोधात निवडणूक लढवणार, नरेंद्र पाटील 3 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार
रत्नागिरी : चिपळूण-खेड रेल्वे मार्गावरील वाहतूक आज तीन तास बंद, अंजनी रेल्वे स्टेशनवर नवीन लूप लाईन कार्यान्वित करण्याचं काम आज संध्याकाळी 5 ते रात्री 8 दरम्यान केलं जाणार
काँग्रेसचे आमदार नितेश राणे आज दुपारी आमदारकीचा राजीनामा देणार, उद्याच्या भाजप प्रवेशाबाबत संभ्रम कायम
नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदारसंघ भाजपाला सोडल्याने 200 शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांचा राजीनामा, विधानसभेनंतर तीन महिन्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाअसल्याने पक्षाला मोठे नुकसान होणार असल्याने नाराजी
नवी मुंबई : अग्निशमन अधिकाऱ्याची गळफास लावून आत्महत्या, रमेश शिंदे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव, पनवेलमधील खारघर अग्निशमन केंद्रातील घटना, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

जयंत पाटील इस्लामपूर विधानसभा जागेसाठी अर्ज भरणार
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले आज अर्ज दाखल करणार, तर शिवेंद्रराजे भोसले जावळी विधानसभा जागेसाठी अर्ज दाखल करणार

पार्श्वभूमी

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

1.संयुक्त पत्राद्वारे महायुतीची घोषणा, मात्र जागावाटपाचा सस्पेन्स कायम, उपमुख्यमंत्रिपदाचं ठरलं नसल्याचं चंद्रकांतदादांकडून स्पष्ट

2.आदित्य ठाकरेंच्या रुपात ठाकरे घराण्यातला पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, वरळीमधून लढणार, शिवसैनिकांचा जल्लोष

3. जागांच्या अदलाबदलीची मागणी करत अनेक शिवसेना इच्छुकांची खदखद चव्हाट्यावर, मातोश्रीवर तातडीची बैठक, संभाव्य बंडखोरी रोखण्याचं आव्हान

4. भाजपप्रवेशानंतर गोपीचंद पडळकरांना अजित पवारांविरोधात बारामतीतून उमेदवारी, तर काट्यानं काटा काढणार म्हणत अजित पवारांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर

5. पाच ऑक्टोबरला राज ठाकरेंची पहिली सभा, यंदा कुणावर तोफ डागणार याकडे लक्ष, मनसे 100 ते 120 जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.