LIVE BLOG | संख्यावाचनाबाबत तज्ज्ञांची समिती नेमून विचार करणार : मुख्यमंत्री
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
20 Jun 2019 11:41 PM
मुंबई : संख्यावाचनाबाबत तज्ज्ञांची समिती नेमून विचार करणार, संख्यावाचनाबाबत तज्ञ्जांची समितीने शिफारस केली होती
सातारा : विखळे कलेढोण दुष्काळी भागात मुसळधार पाऊस, दुष्काळी भागाला दिलासा, अनेकांचे नुकसान, रस्त्यावर पाणीच पाणी
राज्यातील दुष्काळी भागात मुसळधार पावसाला सुरुवात,
साताऱ्यातील विखळे कलेढोण भागात ढगफुटी
साताऱ्यातील विखळे कलेढोण भागात ढगफुटी
पंढरपूर : यंदा आषाढी एकादशीच्या दिवशी नित्यपूजा व पाद्यपूजा नियोजनात बदल होणार, यामुळे 40 मिनिट वेळ कमी होऊन तब्बल 2500 ज्यादा भाविकांना दर्शन घेता येणार
#BREAKING हिमाचल प्रदेश : कुल्लूमध्ये 500 फूट दरीत बस कोसळली, 15 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
लातूर : फरार आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जबर मारहाण, दोन पोलीस कर्मचारी जखमी, लातूर शहरातील बुऱ्हाणनगर भागातील घटना, दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु
मुंबई : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा कोर्टातील कायमची गैरहजेरी स्वीकारण्याबाबतचा अर्ज एनआयए कोर्टानं फेटाळला, संसदेत नियमित हजेरी लावण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर यांना हवी असलेली कोर्टतील सुट्टी देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार
भारतीय संरक्षण दलासह, महाराष्ट्र पोलिस दलाचे तब्बल 98 अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात, गोपनिय माहिती लिक होण्याचा मोठा धोका
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधानसभेत विधेयक मंजूर,
राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून हे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले
राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून हे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले
सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक, त्यासाठी कठोर कायदा करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
एमएमआरडीएचं क्षेत्र वाढवण्याचा ठराव विधानसभेत मंजूर, मुंबई महानगर प्रदेश आता यापुढे बृहन्मुंबईचं संपूर्ण क्षेत्र, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे मिळून होणार
एमएमआरडीएचं क्षेत्र वाढवण्याचा ठराव विधानसभेत मंजूर, मुंबई महानगर प्रदेश आता यापुढे बृहन्मुंबईचं संपूर्ण क्षेत्र, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे मिळून होणार
मुंबई : चित्रीकरणादरम्यान वेब सीरिजच्या कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण : अभिनेत्री माही गिल आणि वेब सीरिज क्रू मेंबर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधानभवनात, दोषींवर कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
विधानभवनाच्या कँटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचा तुकडा आढळल्याचं प्रकरण, जबाबदार व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा द्या, अजित पवार यांची विधानसभेत मागणी
ठाणे : होमगार्ड भरती परीक्षा परस्पर रद्द केल्यामुळे परीक्षार्थी आक्रमक, ठाण्यातील साकेत भागात परीक्षार्थींचा रास्तारोको
सातारा जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, 4.8 रिश्टर स्केल क्षमतेचा धक्का बसल्याची माहिती
मुंबईत नो पार्किंग झोनमध्ये चारचाकी पार्क केल्यास दहा हजारांचा दंड, बेशिस्त वाहनधारकांना लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय
पार्श्वभूमी
- काही दिवसांवर असलेला मान्सूनच्या हजेरीला जुलै उजाडणार, वायु वादळाचा फटका, शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
- मुख्यमंत्रिपदाबाबत सेना-भाजपत ठरलंय, सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य, तर सर्व समसमान पाहिजे, उद्धव यांचा सूचक इशारा
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधणार, देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक योजनांची माहिती देशासमोर मांडण्याची शक्यता
- मुंबईत नो पार्किंग झोनमध्ये चारचाकी पार्क केल्यास 10 हजारांचा दंड, बेशिस्त वाहनधारकांना लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय
- विधानभवनाच्या कँटिंगमध्ये मटकीच्या उसळमध्ये चिकनचे तुकडे, कँटिन कंत्राटदाराविरोधात तक्रार
- न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर सनसनाटी विजय, पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -