LIVE UPDATE | उदयनराजेंचं ठरलं, 14 तारखेला मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Sep 2019 07:25 PM
उदयनराजेंचं ठरलं, 14 तारखेला मोदी आणि शहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित, 15 तारखेला सातारच्या महाजनादेश यात्रेत होणार सहभागी होणार
रत्नागिरी : भास्कर जाधव उद्या सकाळी 11 वाजता विधानभवनात जाऊन राजीनामा देणार, तर दुपारी दोन वाजता शिवसेनेत प्रवेश करणार
महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या तीन राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची आज बैठक,
निवडणूक जाहीर करण्याआधी शेवटची आढावा बैठक
धरणातून पाणी सोडल्याने चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली,
पंढरपुरात बाप्पाचे नदीत उतरुन विसर्जन न करण्याचे आवाहन
खासदार उदयनराजे भोसले पुण्यात शरद पवारांची भेट घेणार
खासदार उदयनराजे भोसले पुण्यात शरद पवारांची भेट घेणार
सातारा : पुणे-बंगळुरु महामार्गावर डी-मार्टसमोर बसची ट्रकला मागून जोरदार धडक, अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू, 20 प्रवासी जखमी, सर्व प्रवासी कर्नाटक राज्यातील असल्याचा अंदाज

पार्श्वभूमी

1. बाप्पाच्या निरोपासाठी मुंबई-पुण्यासह नाशिकमध्ये जय्यत तयारी, नैसर्गिक तलावांसह कृत्रिम तलावांचीही सोय, सीसीटीव्ही यंत्रणा, पोलिसांचा फौजफाटा तैनात

2. महाराष्ट्रात तूर्तास जुन्या आरटीओ नियमांप्रमाणेच दंड वसुली, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची माहिती, गडकरींच्या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीला महाराष्ट्रातच ब्रेक

3. हर्षवर्धन पाटील यांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा, मुख्यमंत्र्यांकडून इंदापूरच्या उमेदवारीचे संकेत, तर 48 नगरसेवकांसह गणेश नाईकांचाही भाजपात प्रवेश

4. ओम आणि गाय शब्द उच्चारताच विरोधकांचे कान टवकारतात, मथुरेतील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा, विरोधकांनी देशाला उद्ध्वस्त केल्याची टीका

5. बुलडाण्यात पैनगंगेला पूर, येळगाव धरण ओव्हरफ्लो, तर नागपूर जिल्ह्यातलं तोतलाडोह धरण 94 टक्के भरलं

6. ऐन मोहरममध्ये पाकिस्तानमध्ये दूध पेट्रोलपेक्षा महाग, एक लिटर दुधाची किंमत  तब्बल 140 रुपये

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.