RAIN LIVE UPDATE | मध्य रेल्वे अर्धा ते पाऊण तास उशिराने
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. परंतु येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई : मुसळधार पावसानंतर मुंबईतील मोनोरेल ठप्प झाली आहे. वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने मोनोरेलला मोठा ब्रेक लागला आहे. मोनोरेलला डीसी वीजपुरवठा करणारी यंत्रणा जोरदार पावसानंतर कुचकामी ठरल्याने, मोनोरेलचं संचलन तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. नवी यंत्रणा वडाळा डेपोत दाखल झाल्यानंतरच मोनोरेलचं पुढील भविष्य ठरणार आहे. ही नवी यंत्रणा पुण्यातील कंपनीकडून तयार करुन घेतली जात आहे.
मुंबई : मुसळधार पावसानंतर मुंबईतील मोनोरेल ठप्प झाली आहे. वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने मोनोरेलला मोठा ब्रेक लागला आहे. मोनोरेलला डीसी वीजपुरवठा करणारी यंत्रणा जोरदार पावसानंतर कुचकामी ठरल्याने, मोनोरेलचं संचलन तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. नवी यंत्रणा वडाळा डेपोत दाखल झाल्यानंतरच मोनोरेलचं पुढील भविष्य ठरणार आहे. ही नवी यंत्रणा पुण्यातील कंपनीकडून तयार करुन घेतली जात आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. परंतु मुंबईसह उपनगर आणि ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
लाईफलाईन हळूहळू पूर्वपदावर
दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर मुंबईची कोलमडलेली लाईफलाईन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण-सीएसएमटी अप दिशेकडील वाहतूक आता पूर्ववत झाली असून सीएसएमटी-कसारा वाहतूही सुरु झाली आहे. परंतु कल्याण ते कर्जत मार्ग अद्यापही बंद आहे. तर पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक सुरळीत आहे.
एलटीटी स्थानकावर 2000 पेक्षा जास्त प्रवाशांचा खोळंबा
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले आहे.तर या पावसाचा फटका मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनाही बसला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर दोन हजारांपेक्षा जास्त प्रवासी काल (4 ऑगस्ट) सकाळपासून अडकून पडले आहेत. इथून निघणाऱ्या जवळजवळ सर्वच एक्स्प्रेस गाड्या मुसळधार पावसामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे ज्या प्रवाशांना इतर राज्यात जायचे होते त्यांना गाड्या पुन्हा सुरु होण्याची वाट पाहत रात्र याच स्थानकात काढावी लागली.
शाळांना सुट्टी जाहीर
मुसळधार पावसामुळे आज अनेक जिल्ह्यातल्या शाळांना सट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर पावसाचा अंदाज घेऊन इतर जिल्ह्यातल्या शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात येऊ शकते.
बारवी धरणाचे दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा
बारवी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने मुंबईलगतच्या कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमधल्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आला आहे. सरकारी यंत्रणांचं पथक रहिवासी इमारत्यांमध्ये फिरुन सतर्कतेचा इशारा देत आहे.
पुण्यात मुळा-मुळा नदीला पूर; हॉस्टेल, हॉस्पिटलमध्ये पाणी
दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या मुळा-मुठेला पूर आला. नदीपात्रातला रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. तर, लोणी-काळभोर इथल्या एमआयटी कॉलेजच्या हॉस्टेलला पावसाच्या पाण्याने वेढा घातल्याने जवळपास 150 विद्यार्थी अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी अग्निशमन दल रवाना झाल्याची माहिती आहे. तर, पुण्यातील बाणेर इथल्या ज्युपिटर हॉस्पिटलचे दोन तळमजले पाण्याखाली गेल्याने रुग्णांच्या स्थलांतराचं काम सुरु आहे. अग्निशमन दल आणि प्रशासनाने रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम सुरु आहे.
कोयनाचं पाणी पाटण, कराडमध्ये घुसलं
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे दरवाजे 14 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे कोयना धरणातून 90 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोयना धरणाचं पाणी पाटण, कराड शहरांमध्ये घुसलं. त्यामुळे कराड-कोयना रोडवर अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालं आहे. तरी, कराडचा जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कृष्णा नदीने 44 फुटांची पाणी पातळी गाठली
मुसळधार पावसाने सांगलीत कृष्णा नदीने आयर्विन पुलाजवळ 44 फुटांची पातळी गाठली आहे. शहरानजीकच्या बायपास पुलावर पुराचं पाणी पोहोचलं आहे. त्यामुळे बायपास पुलावरुन फक्त अवजड वाहतूक सुरु आहे.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले
कोल्हापुरात राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात प्रतिसेकंद 11 हजार 400 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
वशिष्ठी नदीच्या पाण्यामुळे एसटीच्या सर्व 214 फेऱ्या रद्द
रत्नागिरीच्या वशिष्ठी नदीच्या पुराचे पाणी सखल भागात शिरलं असून त्याचा फटका एसटी वाहतुकीला बसला आहे. एसटीच्या सर्वच्या सर्व म्हणजे 214 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एसटी आगाराला 8 ते 10 लाखाचं नुकसान झालं आहे. शिवाय, वशिष्ठी नदीचा पूलही सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -