LIVE BLOG | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jun 2019 04:55 PM
सोलापूर - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या कारचा अपघात,

अपघातात डॉ. राजेंद्र भारुड, चालक भीमाशंकर कोळी दोघेही बचावले मात्र कारचे मोठे नुकसान
अकोला : वर्गातील भांडणातून एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला, वाशिम बायपास परिसरातील गंगानगर भागातील घटना, जखमी विद्यार्थ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु, दोन्ही विद्यार्थी गीतानगर भागातील सेंट एन्स शाळेतील आठवीचे विद्यार्थी
कल्याण बायपास ते मानकोलीदरम्यान वाहतूक कोंडी, जवळपास 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा
कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ सकिना मंजिल या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला, महापालिकेने इमारत रिकामी केली
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटातील घटना, कोणतीही दुर्घटना झाली नसून वाहतुकीवरही परिणाम नाही
पुणे : पुण्यातील कोंढवा भागात सोसायटीची भिंत कोसळून 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.
पावसामुळे तीनही रेल्वे मार्गांवरील लोकलसेवा खोळंबली

मध्य रेल्वे 15 मिनिटे उशिराने सुरु, वाढता पाऊस आणि सुट्टी पाहता लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्याची शक्यता,
हार्बर रेल्वे 10 मिनिटे उशिराने सुरु आहे,
पश्चिम रेल्वे 5 मिनिटे उशिराने,
ट्रान्स हार्बर सुरळीत

पार्श्वभूमी

1. पुण्यात भिंत कोसळून 16 मजुरांचा मृत्यू, कोंढवा परिसरात ह्रदयद्रावक घटना, आणखी लोक ढिगाऱ्याखाली असल्याची भिती

2. पुढील 24 तास मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, ठाणे-नवी मुंबईतही रात्रभर संततधार, मुंबई-पुण्यादरम्यानच्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस रद्द

3. उशिराने दाखल झालेल्या मान्सूनची राज्यभर दमदार एन्ट्री, कोकणातले धबधबे खळाळले, माथेरानसह राज्यातल्या हिल स्टेशन्सचं रुपडं पालटलं

4. विधानसभेच्या तोंडावर भाजप सरकारचा घोषणांचा पाऊस, महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पासाठी वर्षभराचीच डेडलाईन

5. काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या महिन्यानंतर राहुल गांधी पुन्हा सक्रीय, आज महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, विधानसभेची रणनिती ठरणार

6. विश्वचषकातील टीम इंडियाच्या 'अवे' सामन्यासाठी नवी जर्सी लॉन्च, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी निळ्या-भगव्या रंगाची जर्सी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.