LIVE BLOG | भंडाऱ्यात काळी पिवळी गाडी नदीत पडली, पाच मुलींसह सहा जणांचा मृत्यू
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
18 Jun 2019 11:58 PM
त्रंबकेश्वर बरड्याच्या वाडीतील धक्कादायक घटना, पाणी काढण्यासाठी विहिरीत उतरणारी महिला विहिरीत पडली, विहिरीत पडल्याने जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल, गेल्या काही दिवसांपासून गावात पाण्याच्या टॅंकर येत नसल्याने ग्रामस्थांना पुन्हा विहिरीत उतरून भरावे लागतं आहे
8 जूलै 2021 पर्यंत दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडर स्मारकाचे काम पूर्ण होणार,
विधानसभेतील प्रश्नोत्तरांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी माहिती
विधानसभेतील प्रश्नोत्तरांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी माहिती
म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास म्हाडाकडूनच होणार,
खासगी बिल्डरांना बसणार चाप,
इमारत धारकांनी संमतीपत्रक दिल्यास म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच करणार,
म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांचा मोठा निर्णय
खासगी बिल्डरांना बसणार चाप,
इमारत धारकांनी संमतीपत्रक दिल्यास म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच करणार,
म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांचा मोठा निर्णय
नवनिर्वाचित मंत्र्यांचे खातेवाटपानंतर मंत्रालयातील दालन वाटप, राधाकृष्ण विखे पाटलांना सहाव्या मजल्यावर स्थान तर आशिष शेलार पहिल्या मजल्यावर
ज्याप्रमाणे नागपूर आणि मुंबईमध्ये हेल्मेटवर कारवाई केली जाते त्याचप्रमाणे पुण्यातही तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्हीच्या सहाय्यानं कारवाई करा, उगाच नागरिकांना वेठीस धरू नका,
नागरिकांना चलन त्यांच्या ऑफिस किंवा घरी पाठवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नागरिकांना चलन त्यांच्या ऑफिस किंवा घरी पाठवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
उल्हासनगर : उल्हासनगरच्या झुलेलाल शाळेत चालू वर्गात प्लास्टर कोसळलं, घटनेत तीन विद्यार्थिनी जखमी, शाळेकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
,
दहावीच्या वर्गात, क्लासरूम नंबर 24 मध्ये सकाळी घडली घटना
,
दहावीच्या वर्गात, क्लासरूम नंबर 24 मध्ये सकाळी घडली घटना
भंडारा : जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील धर्मापुरी गावालगत असलेल्या पुलावर काळी पिवळी गाडी अनियंत्रित होऊन 80 फूट खाली नदीत पडली, घटनेत पाच मुलींसह एक महीला जागीच मृत्यूमुखी तर सहा प्रवासी गंभीर, साकोलीहून लाखांदुरला जात होते प्रवाशी

गोवा : सभापती राजेश पाटणेकर यांनी अपात्रता याचिकेप्रकरणी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांना बजावली नोटीस,1 जुलै रोजी सभापतींसमोर होणार सुनावणी
राज्यात 1635 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ : सुधीर मुनगंटीवार
नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी 6410 कोटी रुपयांची तरतूद, त्यानंतरही आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करणार : सुधीर मुनगंटीवार
बळीराजा जलसंजिवनी योजनेसाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 531 कोटी एवढी भरीव तरतूद : सुधीर मुनगंटीवार
मागील साडेचार वर्षात 3 लाख 87 हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता आणि 1 हजार 905 दशलक्ष घनमीटर (67 टीएमसी) पाणीसाठा निर्माण : सुधीर मुनगंटीवार
मागील साडेचार वर्षात 140 सिंचन प्रकल्प पूर्ण, प्रामुख्याने बावनथडी मुख्य प्रकल्प, नांदूर मधमेश्वर प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, निम्न पांझरा मध्यम प्रकल्प आणि उर्ध्व कुंडलिका प्रकल्पांचा समावेश : सुधीर मुनगंटीवार
2019 च्या मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगाला मान्यता : सुधीर मुनगंटीवार
राज्यातील 26 अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश, सदर प्रकल्पांची उर्वरित किंमत 22 हजार 398 कोटी असून त्यापैकी 3 हजार 138 कोटी केंद्रीय अर्थसंकल्प प्राप्त होणार : सुधीर मुनगंटीवार
राज्यात 1635 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ : सुधीर मुनगंटीवार
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी 2019-20 या वर्षात 2720 कोटी एवढी भरीव तरतूद : सुधीर मुनगंटीवार
चार कृषी विद्यापीठांना 600 कोटी रुपयांची तरतूद : सुधीर मुनगंटीवार
बळीराजा जलसंजिवनी योजनेसाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 531 कोटी एवढी भरीव तरतूद : सुधीर मुनगंटीवार
राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण क्षेत्राची स्थापना, शेळ्या आणि मेंढ्यांसाठी चारा छावण्यांची निर्मिती : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
केंद्र सरकारने दुष्काळासाठी मोठी मदत केली, दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर 4 हजार 563 कोटींचा निधी मिळाला : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण सुरु, राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता
8946 कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेत खर्च, 260 सुधारित सिंचन प्रकल्पाची कामं प्रगती पथावर, सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात येईल : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
8946 कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेत खर्च, 260 सुधारित सिंचन प्रकल्पाची कामं प्रगती पथावर, सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात येईल : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद, गेल्या 4 वर्षात 140 सिंचन योजना पुर्ण करण्यात आल्या : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
LIVE BLOG | मंदिरात चोरी केल्याच्या संशयावरुन वर्ध्यामधील 8 वर्षाच्या मुलाला केलेल्या मारहाणीची, सरकारने गंभीर दखल घेऊन आरोपीवर योग्य कारवाई करावी, अजित पवार यांची विधानसभेत माहिती
वाड्या, वस्तीवर टँकर पुरवण्याचं सरकारनं काम केलं, चारा टंचाईवर मात करण्यासाठी 30 हजार हेक्टर जमीन करारावर दिली : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
वाड्या, वस्तीवर टँकर पुरवण्याचं सरकारनं काम केलं, चारा टंचाईवर मात करण्यासाठी 30 हजार हेक्टर जमीन करारावर दिली : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, अविनाश महातेकर यांचं मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता, अॅड. सतीश तळेकर यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मंत्रिपद घडनाविरोधी असल्याचा दावा
नवी दिल्ली : देशभरातील सरकारी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकांवर जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे. डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा दाखल देत सुप्रीम कोर्टाने दखल देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. पण पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप मिटला असून तातडीने सुनावणीची गरज नाही, असं मत सुट्टीकालीन खंडपीठाने नोंदवलं आहे.
राजस्थानमधील कोटा मतदारसंघाचे खासदार ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष होणार : सूत्र
राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार, निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांची शक्यता, राज्याचा विकासदर साडेसात टक्के
नवी मुंबईतल्या कळंबोलीत बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं खळबळ, वस्तूमध्ये आयईडी असल्याचा पोलिसांना संशय, बॉम्बशोधक पथकाला पाचारण
मान्सून 21 जूनपर्यंत कोकणात, तर 24 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार, हवामान विभागाची माहिती, पेरण्या खोळंबल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
पार्श्वभूमी
- मान्सून 21 जूनपर्यंत कोकणात, तर 24 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार, हवामान विभागाची माहिती, पेरण्या खोळंबल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
- राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार, निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांची शक्यता, राज्याचा विकासदर साडेसात टक्के
- अमित शाहांकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर जेपी नड्डा भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी, मोदींकडून नड्डांचं अभिनंदन, काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सस्पेन्स कायम
- नवी मुंबईतल्या कळंबोलीत बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यानं खळबळ, वस्तूमध्ये आयईडी असल्याचा पोलिसांना संशय, बॉम्बशोधक पथकाला पाचारण
- बालभारतीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये नवे बदल, 21 ते 99 मधील अंकांना संख्यावाचनानुसार शिकवण्याच्या सूचना
- विश्वचषकामध्ये बांगलादेशचा वेस्ट इंडिजवर सनसनाटी विजय, बांगलादेशकडून 7 विकेट्स राखत 322 धावांचं आव्हान पूर्ण
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -