- मुख्यपृष्ठ
-
Election
-
निवडणूक
LIVE BLOG : मानखुर्द स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब पडल्याची माहिती, स्लॅब ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे हार्बर मार्ग ठप्प
LIVE BLOG : मानखुर्द स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब पडल्याची माहिती, स्लॅब ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे हार्बर मार्ग ठप्प
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
03 Aug 2019 11:05 PM
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद -
मुंबई गोवा महामार्गावरील वांद्रीनजीकच्या बावनदी पुलावरील वाहतूक बंद,
बावनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद
हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु
तीनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक पूर्ववत होत असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या टी20 सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला
मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ, 9 मीटर पर्यत पाण्याची पातळी गाठली आहे,
सध्या वाहतूक बंद आहे
भंडारदरा धरणाचे दरवाजे उघडले, धरणातून सध्या वीजनिर्मितीद्वारे 825 क्यूसेक, तसेच स्पिलवे द्वारे 3600 क्यूसेक असे एकूण 4425 क्यूसेकने धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे
भंडारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निषेध फलक दाखवत घातला गोंधळ, नागपुरच्या नागनदीचे दूषित पानी भंडाराच्या वैनगंगा नदीत सोडत असल्याच्या कार्यकर्त्यांचा आरोप
टिक टॉकच्या नादात पुलावरून उडी मारणाऱ्या युवकापैकी एक जण वाहून गेला, साताऱ्यातील मर्डे येथील घटना, धिरज शिर्के असे त्या युवकाचे नाव
शिर्डी : भंडारदरा धरण ओव्हर फ्लो,
उत्तर नगर जिल्ह्यातील 11 टीएमसी क्षमतेचे धरण,
10500 साठा झाल्यावर धरण भरल्याची घोषणा,
धरणाच्या स्पिल वे गेट मधून 2400 क्यूसेक वेगानं विसर्ग सुरू
विसर्ग सुरू झालेले पाणी आता निळवंडे धरणात होणार जमा....
दरवर्षी 15 ऑगस्ट पूर्वी धरण भरण्याची परंपरा यंदाही कायम
मानखुर्द स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब पडल्याची माहिती, हा स्लॅब ओव्हरहेड वायर वर पडल्यामुळे हार्बर मार्ग ठप्प
नवी मुंबई - पांडवकडा धबधब्यावरुन चार तरुणी वाहून गेल्या, नेरुळच्या एस आय एस कॉलेजच्या विद्यार्थिनी, एकीचा मृतदेह सापडला, तिघी अद्याप बेपत्ता, शोधकार्य सुरु
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील मौजे इटे गावातील शेतकऱ्याचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू,
केशव बाळू पाटील वय 55 असे मृत शेतकऱ्याचे नाव
,
जांभूळ शेताचा ओढा पात्रात शेतातून माघारी येत असताना वाहून जाऊन मयत झाले आहेत.
ठाण्यातील श्रीरंग, वृंदावन सोसायट्यांमध्ये पाणी, संभाजीनगरही पाण्याखाली
कुर्ला आणि वडाळा दरम्यान पाणी भरले, त्यामुळे गाड्या बंद , हार्बर मार्ग कुर्ला ते वडाळा दरम्यान ठप्प
मध्य रेल्वे - सायन आणि कुर्ला येथे कल्याण दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर पाणी भरले, एका मार्गावरील वाहतूक केली बंद, कल्याणकडे जाणारा जलद मार्ग सध्या बंद,गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या
पालघर : सूर्या नदीत धामणी धरणाचा पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढविला, पाचही गेट 1 मीटरने उघडले, 42500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदी पात्रात सुरु, नदीकाठावरील गावांना पुराचा धोका, सतर्कतेचा इशारा
नाशकात पावसाचा जोर वाढला , 12 वाजता गंगापूर धरणातून 13 हजार क्यूसेस विसर्ग
#BREAKING रायपूर : राजनांदगाव जिल्ह्यातील बागनदी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सीमेवरील शेरपाल आणि सीटगोटाच्या डोंगरावर चकमक, सात माओवाद्यांचा खात्मा, मोठ्या प्रमाणात शत्रसाठा जप्त
मुंबईमध्ये आज सकाळ पासून पावसाने जोर धरला आहे, सकाळपासून होत असलेल्या पाऊसा मुळे ट्रेन, वाहतूक आणि रस्ते वाहतूक यांचा वेग मंदावला आहे , किंगसर्कल येथे पाणी साचलं असून वाहतूक ब्रिज वरून वळवण्यात आली आहे
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेकडून सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांना सतर्कतेचा इशारा
भिवंडी : भिवंडी शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत असल्याने भिवंडी शहरात अनेक ठिकाणी पाणी भरलं, शहरातील अनेक शाळांना विद्यार्थ्यांना सुट्टी
भिवंडी : भिवंडी शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत असल्याने भिवंडी शहरात अनेक ठिकाणी पाणी भरलं, शहरातील अनेक शाळांना विद्यार्थ्यांना सुट्टी
सातारा : तापोळा महाबळेश्वर रोडवर दरड कोसळली
केळघर घाटातील यश ढाबा जवळ (रेंगडी) शेजारी दरड कोसळून मेढा ते महाबळेश्वर जाणारा रस्ता पूर्ण बंद
केळघर घाटातील यश ढाबा जवळ (रेंगडी) शेजारी दरड कोसळून मेढा ते महाबळेश्वर जाणारा रस्ता पूर्ण बंद
मुंबईतल्या मुसळधार पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पातळीत वाढ, गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या पाणीच साठ्यात तब्बल 1 लाख 16हजार 351 दशलक्ष लिटरने वाढ
मुलुंड पश्चिम स्थानकाजवळ पाणी भरलं, हॉटेलं, दुकानं पाण्यात
मुलुंड पश्चिम स्थानकाजवळ पाणी भरलं, हॉटेलं, दुकानं पाण्यात
नाशिक : दुतोंडया मारुतीच्या मानेपर्यंत पाणी, रामसेतू पुलाला पाणी
ठाण्यात अवघ्या 2 तासात 100 मिलिमीटर पावसाची नोंद , रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल सेवेवर परिणाम, ठाण्यातील शाळांना सुट्टी देण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्णय
ठाण्यात अवघ्या 2 तासात 100 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
ठाण्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी आलं आहे. त्यामुळे लोकल सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. संभाजीनगरमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे नागरिकांचं आता हाल होत आहे. पावसामुळे ठाण्याती शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतलाय.
गोरेगाव, अंधेरी सबवे, मालाड सबवे आणि कांदिवलीच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. गुडघ्याहून अधिक पाणी तिथं साचलं आहे.
मुलुंड स्टेशनच्या तिकीटघरातही पाणी शिरलंय..स्थानकाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय...रेल्वे प्रवाशांचं मात्र प्रचंड हाल होताना दिसतायत
- गंगापूर धरणातून 9 वाजता 11358 क्युसेस पाण्याचा विसर्ग
- गोदावरीला नदृीला पूर सदृश्य परिस्थिती
- नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस.
रोहा शहरात कुंडलिका नदीच्या पुराचे पाणी.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
बेळगाव-मुसळधार पावसाने शहराला झोडपले,अनेक भागात रस्त्यावर पाणी साठले.
नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरुच असून पहाटे 6 वाजता धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू,
गंगापूर धरणातून 7830 क्यूसेस,
दारणा धरणातून 19002 क्यूसेस
नांदूरमध्यमेश्वरमधून 43739 क्यूसेस
भावली धरणातून 948 क्यूसेस
आळंदी धरणातून 687 क्यूसेस
पालखेड धरणातून 751 क्यूसेस विसर्ग
कोयणा धरणाचे दरावाजे काही तासात उघडणार, कोयणेचे सर्व दरवाजे सर्व उघडणार, कोयणा धरणात तब्बल 88 टीएमसी साठा,
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
नागपूर - उमरेड आणि भिवापूर तालुक्यात रात्री दमदार पाऊस ,
नागपूर गडचिरोली मार्गावरील मरू नदीचा पाणी प्रवाह वाढला असून या मार्गावरील मरू नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे
भंडारा गोंदियात रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु
पालघर-सफाळे रस्त्यावर माहिम- रेवाळे येथे दोन झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद
पुणे शहर आणि धरण क्षेत्रात रात्रभर पाऊस, पण सकाळी पाऊस थांबला. पानशेत धरण क्षेत्रात रात्रभरात 122 मिमी, वरसगाव ११६ मिमी , टेमघर १७८ मिमी तर खडकवासला धरण क्षेत्रात ३० मिमी पावसाची नोंद झालीय. पानशेत आणि खडकवासला ही धरणं आधीच पूर्णपणे भरली असून वरसगाव 90 टक्के तर टेमघर 80 टक्के भरलं.
सिंधुदुर्ग -
तिलारी घाटात दरड कोसळली, वाहतूक पूर्णपणे बंद
,
मुसळधार पावसामुळे तिलारी घाटात दरड कोसळली
चंद्रपूर : चंद्रपूर वीज केंद्र आणि चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणारे इरई धरण ९८ टक्के भरले, आगामी पावसाळा बघता प्रशासनाने घेतला सर्व दरवाजे उघडण्याचा निर्णय, धरणाची ७ ही दारे 0.25 मीटरने उघडली, धरणातून १२७.३३ क्युबिक मीटर प्रति सेकंद वेगाने विसर्ग सुरू
पालघर -
मच्छीमारांना मासेमारीस तूर्तास जाण्यास बंदी . समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र शासनाचा आदेश . 1 ऑगस्ट रोजी मासेमारी बंदी उठत असताना देखील हवामान खात्याच्या अंदाजामुळे मासेमारांना सतर्कतेचा इशारा . पुढील आदेश येई पर्यंत समुद्रात मासेमारी करण्यास बोटीतून जाण्यास मज्जाव .
वसई विरार क्षेत्रात ही पावसाचा जोर वाढला आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात ब्रिजच्या खाली, सेंट्रल पार्क येथे पाणी साचण्यास सुरुवात
नंदुरबार: नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारा रंगवली प्रकल्प ओसंडून वाहु लागला, शहराचा पाणी प्रश्न मिटला, दोन वर्षांनी समाधानकारक परिस्थती
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीस बंद ,
महामार्गावरील खेड जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने
,
वाहतूकीसाठी पूल बंद
पालघर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस
हवामान खात्याकडून किनारपट्टी भागात अलर्ट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला पूरसदृश्य परिस्थिती ,
नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांना प्रशासनाच्यावतीने सतर्क राहण्याचे आदेश
,
विविध ठिकाणी प्रशासनाच्या वतीने लाऊड स्पीकर वरून नागरिकांना सतर्क राहण्याचे दिले आदेश
पुणे | बुधवार पेठ, मोती चौकाजवळ पायगुडे वाड्याची एका बाजूची भिंत कोसळली; जखमी कोणी नाही
राज्यभरात पावसाची संततधार, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडले, हतनूर धरणाच्या 36 दरवाजांमधून विसर्ग सुरु, नाशिक चंद्रपुरातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला
पार्श्वभूमी
1. राज ठाकरे ईडीच्या रडारवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, कोहीनूर मिलचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
2. ईव्हीएमबाबत भूमिका घेण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आज पत्रकार परिषद, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार
3. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं मिशन विधानसभा सुरु तर शिवसेनेसाठी आजपासून बांदेकर भावोजींचा माऊली संवाद, जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य आज नांदेड, परभणीत
4. राष्ट्रवादी सोडणाऱ्यांचं हृदय तपासावं लागेल, गयारामांना शरद पवारांचा टोला, तर कुरघोड्या थांबल्या नाहीत म्हणून पक्ष सोडल्याचा शिवेंद्रराजेंचा पलटवार, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेची शपथ
5. राज्यभरात पावसाची संततधार, राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे उघडले, हतनूर धरणाच्या 36 दरवाजांमधून विसर्ग सुरु, नाशिक चंद्रपुरातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला
6. पाकिस्तानच्या ताब्यातील कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासाची मदत मिळणार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानचा निर्णय