Mumbai Rain LIVE | अंधेरी, घाटकोपरसह अनेक रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी, कामावरुन परतणाऱ्या मुंबईकरांचे हाल
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
04 Sep 2019 08:20 PM
हाफिज सईद, दाऊद इब्राहिम, मसूद अझहर आणि जकी-उर-रहमान भारताच्या नव्या युएपीए कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित
राधानगरीचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले, 7112 क्युसेक विसर्ग,
सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पातळी 23.9 इंच
,
कोल्हापूर जिल्ह्यातील 16 बंधारे पाण्याखाली
सायंकाळी 7 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पातळी 23.9 इंच
,
कोल्हापूर जिल्ह्यातील 16 बंधारे पाण्याखाली
LIVE UPDATE | शिवसेना-भाजप जागावाटपाच्या बैठकीला आजपासून सुरुवात, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुभाष देसाई यांच्यात पहिली बैठक, घटक पक्षांच्या वाट्याला कुठल्या आणि किती जागा येतील, सर्व्हे आणि उर्वरित जागांवरच्या वाटाघाटींवर झाली प्राथमिक चर्चा @ritvick_ab
मुंबईत आता काही प्रमाणात पाऊस ओसरला असला तरी कामावरुन परतणाऱ्या मुंबईकरांचे मेगा हाल सुरु आहेत. कारण, पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अंधेरी रेल्वे स्थानकात झालेली गर्दी मुंबईची अवस्था विषद करते... लोकलच नसल्याने या स्थानकावर तुफान गर्दी झाली आहे... ही अवस्था फक्त अंधेरीची नाही...तर घाटकोपरसह अनेक रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
वसई : गेल्या 8 तासांत वसई-विरार भागात पावसाची जोरदार बॅटिंग, नालासोपाराला रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे विरारहून चर्चगेटला जाणारी रेल्वेसेवा ठप्प, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्याही विरार रेल्वेस्थानकावर थांबवल्या, विरारहून डहाणूच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक धीम्या गतीने, प्रवाशांचे हाल
कांजूरमार्ग आणि कुर्ला स्थानकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी ट्रॅकवर आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद ,
ठाणे स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी वाहतुक थांबवली
,
सीएसएमटी कडे जाणारी धीमी आणि जलद दोन्ही वाहतुक थांबवली
,
मध्य रेल्वे पूर्ण पणे ठप्प
ठाणे स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी वाहतुक थांबवली
,
सीएसएमटी कडे जाणारी धीमी आणि जलद दोन्ही वाहतुक थांबवली
,
मध्य रेल्वे पूर्ण पणे ठप्प
शासकीय विश्रामगृहात उदयनराजे आणि राजू शेट्टी यांच्यात बैठक, दोघांमध्ये बंद दाराआड बैठक, भाजप प्रवेशावर उदयनाजेंसोबत राजू शेट्टींची चर्चा सुरू,
राजेंना रोखण्यासाठी राजू शेट्टींकडून मनधरनी सुरू
मुंबई- भांडुप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी रेल्वे ट्रॅकवर साचले आहे, पाऊस असाच सुरू राहिला तर गेल्या वेळेप्रमाणे आताही गाड्या बंद पडू शकतात, ठाणे स्थानकाच्या दोन्ही एन्ट्री पॉईंट्सला पाणी साचले आहे, पण गाड्या सुरू आहेत, सायन-कुर्ला दरम्यान पाणी साचले आहे, पण अजून ट्रॅकवर पाणी गेले नाही म्हणून गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत, पाऊस जर असाच राहिला तर गेल्या वेळ प्रमाणे आज देखील मध्य रेल्वे बंद पडू शकते
भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाची चर्चा आज सुरु होणार, सूत्रांची माहिती, भाजपतर्फे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई चर्चा करणार , सेना - भाजपच्या जागावाटपाच्या अधिकृत चर्चेला आजचा मुहूर्त
मुंबईत पडणारा पाऊस आणि पावसाच्या इशाऱ्यानंतर सरकारचा सर्व शाळांना सुटी देण्याचा निर्णय,
मुंबई, ठाणे आणि कोकण भागातील सर्व शाळांना सुटी जाहिर,शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची माहिती
मुंबई, ठाणे आणि कोकण भागातील सर्व शाळांना सुटी जाहिर,शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची माहिती
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या पुलाजवळ पाणी साचण्यास सुरूवात , चेंबूरच्या बाजुने पाणी साचले
पालघर : चिंचणी वाणगाव रस्ता देदाळे येथे पाणी साचल्याने बंद
कोल्हापुरातून गगनबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत,
भुईबावडा घाटात दरड कोसळली, दरड हटविण्याचे काम सुरु
,
गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची अडचण
भुईबावडा घाटात दरड कोसळली, दरड हटविण्याचे काम सुरु
,
गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची अडचण
नालासोपारा : वसई विरार क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
गडचिरोली: हवामान खात्याने दिला अतिवृष्टीचा इशारा,
जिल्ह्यात 24 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत,
भामरागड तालुक्याला पुन्हा एकदा पुराचा फटका,
पर्लकोटा नदीला पूर
जिल्ह्यात 24 तासापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत,
भामरागड तालुक्याला पुन्हा एकदा पुराचा फटका,
पर्लकोटा नदीला पूर
कोकण रेल्वे तीन तासांपासून ठप्प, मालगाडीचं इंजिन बंद पडल्याने वाहतूक खोळंबली
नवी मुंबई - मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत अनेक भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. खारघरच्या सेक्टर 10 मध्ये पाणी साठलं
पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पालघर बोईसर रोडवर सरावली येथे पाणी भरले आहे. तर वाणगाव भागातही रस्त्यावर पाणी आलं असून काही ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. नदी नाल्यांनाही पूर यायला सुरुवात झाली आहे. वाणगाव डहाणू रोडवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाला आहे तर बोईसर चिल्हार रोडवर बेटेगाव येथे पाणी आल्याने रस्ता बंद आहे.
गणेश मंडळांना पावसाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना,
बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची गणपती मंडळांना सूचना,
कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी टाळण्यासाठी केल्या सूचना
मंडपात पाणी शिरल्य़ास महापालिका कर्मचाऱ्यांना संपर्क कऱण्याच्या सूचना,
बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची गणपती मंडळांना सूचना,
कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी टाळण्यासाठी केल्या सूचना
मंडपात पाणी शिरल्य़ास महापालिका कर्मचाऱ्यांना संपर्क कऱण्याच्या सूचना,
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग,
राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला
सहा नंबरच्या दरवाजातून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग
,
तर मुख्य दरवाजातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग
राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला
सहा नंबरच्या दरवाजातून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग
,
तर मुख्य दरवाजातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग
भिवंडी : भिवंडी शहरात साईबाबा ते कल्याण नाका या नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू असताना उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याने एकच खळबळ उडाली
,
उड्डाणपुलाच्या किल्ल्यांवरील दोन रॅम्पला जोडतांना काही भाग कोसळला
,
उड्डाणपुलाच्या किल्ल्यांवरील दोन रॅम्पला जोडतांना काही भाग कोसळला
7 सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो प्रवास करण्याची शक्यता..
पंतप्रधान सुभाष नगर ते सीताबर्डी दरम्यान मेट्रो प्रवास करण्याची शक्यता..
पंतप्रधान सुभाष नगर ते सीताबर्डी दरम्यान मेट्रो प्रवास करण्याची शक्यता..
पूरग्रस्त भागाच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला आणखी 3000 कोटींचा प्रस्ताव पाठवणार
रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील धरणं पुन्हा तुडुंब भरून वाहू लागलीयत. त्यामुळं धरणांमधुन पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येतंय. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग सत्तावीस हजार क्युसेक्स वेगाने वाढविण्यात आलाय.
पार्श्वभूमी
- लालबागच्या राजाच्या दानपेटीत भक्तांच्या इच्छांचा महापूर, चांगल्या बायकोपासून ते बिअर शॉपीचं लायसन्स मिळण्यासाठी बाप्पाला साकडं
2. दीड दिवसाच्या गणपतीला भावपूर्ण निरोप, पुण्यात कृत्रिम तलावांचा वापर, तर गणपती दर्शनासाठी नेत्यांनी चढली विरोधकांच्या घराची पायरी
3. जोरदार पावसामुळे मुंबईत किंग्स सर्कल, दादर, हिंदमाता परिसरात पाणी तुंबलं, कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप
4. मुंबईलगतच्या उरणमधील ओएनजीसी प्लँटची आग आटोक्यात, चौघांचा मृत्यू, गळतीमुळं लगतच्या वस्तीलाही आगीच्या झळा
5. वर्षा बंगल्यावर रात्री 10 वाजता भाजप कोअर कमिटीची बैठक, तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 229 जागा मिळणार, भाजपच्या सर्व्हेचा दावा
6. जीडीपीची घसरण आणि वाहन कंपन्यांच्या विक्रीत झालेल्या घटीचा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स 800 अंकांनी घसरला, तर निफ्टीच्या अंकातही 225 अंकांची घसरण
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -