LIVE BLOG | गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या बाजूला बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी कॉल

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jun 2019 10:52 PM
बांगलादेशने वेस्ट इंडिजला लोळवलं, सात विकेट्स राखून केला पराभव, शाकिब अल हसनचे शानदार नाबाद शतक
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील सोनाले ग्रामपंचायत हद्दीतील पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलाय या पाइपलाइनच्या माध्यमातून मुंबई ठाणे सारख्या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा केला जातो

सांगली : कुपवाड भागातील तानंग फाटयावर लकी प्लॅस्टिक कंपनीस भीषण आग ,

मिरज फायरबिग्रेडच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या
मुंबई : येत्या ३ दिवसात कोकण आणि गोव्यात जोरदार पाऊस, 21 तारखेपर्यंत मान्सून कोकणात येणार, तर 24 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, हवामान विभागाची माहिती
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज अर्थसंकल्पावरून शेवटचा हात फिरवला. उद्या दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असल्यानं सरकार घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता वर्तवली जातेय..
अभिनेता करण ओबेरॉयच्या विरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला अटक. सदर महिलेने स्वतःवर हल्ला करवून घेत करण ओबेरॉयवर आरोप केले होते. पोलिसांच्या तपासात ही महिला दोषी आढळल्याने तिला अटक करण्यात आले आहे.
नाशिक :
संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे पंढरपूर च्या दिशेने प्रस्थान सकाळी दहा सव्वादहाला होणार प्रस्थान
पुणे : साखर आयुक्त कार्यालयावर प्रहार शेतकरी संघटनेचं ताबा आंदोलन, शेतकऱ्यांच्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी आंदोलन
पुणे : साखर आयुक्त कार्यालयावर प्रहार शेतकरी संघटनेचं ताबा आंदोलन, शेतकऱ्यांच्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी आंदोलन
पुणे : साखर आयुक्त कार्यालयावर प्रहार शेतकरी संघटनेचं ताबा आंदोलन, शेतकऱ्यांच्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी आंदोलन
नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात दाखल, 'आयाराम गयाराम, जय श्री राम!!!' विखेंनी उद्देशून विरोधकांच्या घोषणा
मुंबई: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याण-ठाकुर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड

पार्श्वभूमी

1. विश्वचषकात भारताविरोधात पाकिस्तानचा सलग सातव्यांदा पराभव,  मँचेस्टरमध्ये टीम इंडियाचा 89 धावांनी विजय, रोहित शर्मा मॅन ऑफ द मॅच

2. राज्यमंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंकडे गृहनिर्माण मंत्रिपदाची धुरा, अनिल बोंडेंच्या खांद्यावर कृषी मंत्रालयाचा भार तर राम शिंदेंचं जलसंधारण शिवसेनेच्या तानाजी सावंतांकडे

3. विनोद तावडेंचं खातं विभागून आशिष शेलारांकडे शालेय शिक्षणाची जबाबदारी, चंद्रकांत पाटलांच्या खात्यांमध्येही कपात

4. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेसमध्ये चढाओढ, बैठकीत बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवारांमध्ये जुंपल्याची सुत्रांची माहिती

5. विस्तारावर टोला हाणताना एकनाथ खडसेंचं पक्षबदलू विखेंकडे बोट, मंत्रिपदाचा उत्साह राहिला नसल्याची प्रतिक्रिया, एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

6. मोदी सरकार- 2 च्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 'वन नेशन, वन इलेक्शन'वर चर्चा होण्याची शक्यता

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.