LIVE BLOG | रस्त्यातील झाडाला दुचाकी धडकून नाशकात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
12 Jun 2019 10:53 PM
शैक्षणिक २०१९ -२० वर्षी भाषा, समाजशास्त्र विषयाचे अंतर्गत परीक्षा सुरु करावीत आणि सध्या सुरु होणाऱ्या ११वी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी तुकड्या वाढव्यात. या दोन मागणीसाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 'वर्षा'वर दाखल, युवासेनेच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक, शिक्षण विभागातील विषयांवर चर्चेसाठी बैठक असल्याची शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची माहिती
मुंबई : भातसा धरणातील विसर्ग झडपेत तांत्रिक बिघाड, दुरुस्तीच्या कामामुळे तीन दिवस मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 25% कपात, बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु, महापालिका प्रशासनाचं मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन
मुंबई : भातसा धरणातील विसर्ग झडपेत तांत्रिक बिघाड, दुरुस्तीच्या कामामुळे तीन दिवस मुंबईच्या पाणी पुरवठ्यात 25% कपात, बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु, महापालिका प्रशासनाचं मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन
शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांच्याविरोधात सरकारनं दाखल केलेल्या कागदपत्रांत काही आक्षेपार्ह वाटत नाही - हायकोर्ट. १८ जूनपर्यंत नवलखा यांना दिलेला दिलासा कायम ठेवत कोणतीही कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सीआरपीएफ आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, हल्ल्यात सीआरपीएफचे 5 जवान शहीद, तर 2 जवान जखमी, या चकमकीत एका दहशतावाद्याचा खात्मा, अद्याप या ठिकाणी गोळीबार सुरु, अनंतनागमधील एका बस स्थानकावर हा हल्ला झाला
दहावी-बारावीसाठी जुलै-ऑगस्ट 2019 पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, एसएससी परीक्षा 17 जुलै 2019 ते 31 जुलै 2019, तर एचएससी परीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार
दहावी-बारावीसाठी जुलै-ऑगस्ट 2019 पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, एसएससी परीक्षा 17 जुलै 2019 ते 31 जुलै 2019, तर एचएससी परीक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान होणार
मुंबई : वांद्रे पश्चिम भागातील एसव्ही रोडवर स्कायवॉकच्या पत्र्याची शेड खाली कोसळून अपघात, दोन महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार, जोरदार वाऱ्यामुळे स्कायवॉकला लावण्यात आलेली पत्र्याची शेड निखळून पादचाऱ्यांवर पडल्याची पोलिसांची माहिती
मुंबई : प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पानवरची फाशी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द, आरोपीला दोषी ठरवत सुनावली जन्मठेपेची शिक्षा, अॅसिड हल्ला प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला देशातील पहिला खटला
मंत्रिपदावरुन शिवसेनेत अंतर्गत कलह, कॅबिनेट विस्ताराआधी उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, उपमुख्यमंत्रीपदासाठी सुभाष देसाईंच्या नावाला काही नेत्यांचा विरोध, राष्ट्रवादीमधून आलेल्या जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्यास विरोध, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई : चर्चगेट स्टेशनला होर्डिंग कोसळून एकाचा मृत्यू, मधुकर नार्वेकर (62) असं मृत व्यक्तीचं नाव
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहणार, रणदीप सुरजेवनाला यांची माहिती
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात दोन ट्रकची धडक, 3 ठार, दुधाची वाहतूक करणारा ट्रक, मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक, महामार्गावरची वाहतूक विस्कळीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी,
मुंबईतल्या कृष्णकुंज या निवासस्थानी कोल्हे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली,
भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट
मुंबई : पावसाळ्यात बंद ठेवण्यात येणाऱ्या मुंबईतील पुलांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी बोलावली संयुक्त बैठक, महापालिका, रेल्वे, आपत्कालीन विभाग, एमएमआरडीए, पोलीस व वाहतूक पोलीस यांची संयुक्त बैठक
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात होणारे खासगी अभिषेक आजपासून बंद,
केवळ देवस्थान समिती आणि हक्कदार पुजार्यांकडूनच गरुड मंडपात अभिषेक होतील
बीड : कंदुरीच्या जेवणातून 60 जणांना विषबाधा, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु, बीडच्या गोविंद नगर येथील घटना, 10 ते 15 लहान मुलांचाही समावेश, अनेकांची पृकृती गंभीर
डोंबिवली : पाण्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये जुंपली, नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांची नगरसेविका आशालता बाबर यांना मारहाण, कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयाबाहेरच घडला प्रकार
पुणे : दुसऱ्या तरुणाची प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन प्रेयसीचा खून, प्रियकर फरार, पुण्याच्या चंदननगर परिसरातील घटना
मुंबई : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही मध्य रेल्वे उशिराने, मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने, सततच्या विलंबामुळे लोकल प्रवासी वैतागले, सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी दिलं डीआरएमना पत्र, 80 लाख प्रवाशांना दररोज वेठीस न धरण्याची केली मागणी
भिवंडीत ऑटो पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग,
आगीत चार दुकान जळून खाक,
इमारतीतील 200 ते 250 नागरिकांना सुखरुप स्थळी हलवण्यात आले
पार्श्वभूमी
1. वायू चक्रीवादळामुळे मान्सून आठवडाभर लांबणीवर, महाराष्ट्राची चिंता वाढवणारी हवामान विभागाची माहिती, तर भारतातला मान्सून पाकिस्तानात सरकण्याची शक्यता
2. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, सुत्रांची माहिती, विखे, सत्तार आणि मोहिते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शेलार आणि क्षीरसागरांच्या वर्णीची शक्यता
3. फक्त लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीला प्रवेश द्या, माझाच्या बातमीनंतर राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव, निर्णयाकडे लाखो विद्यार्थ्यांचे डोळे
4. जमीन खरेदी प्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, देवस्थानाच्या जमिनीची अवैध खरेदी केल्याचा आरोप
5. दादरच्या चैत्यभूमीवर भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारची मान्यता, 15 दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन
6. धवनच्या दुखापतीवर भारतीय संघव्यवस्थापनाचे वेट अँड वॉच धोरण; भारतीय सलामीवीर दोन आठवड्यात तंदुरुस्त होण्याचा फिजियोना विश्वास